Child Health: पालकांनो सावधान! मोबाईलच्या लाईटमुळे मुलाच्या डोळ्यात 'असं' काही दिसलं, आईची तब्येतच बिघडली; गंभीर आजार आढळला
Child Health: महिला मोबाईलने आपल्या मुलाचा फोटो काढत असताना त्याच्या डोळ्यात असे काहीतरी दिसले, त्यानंतर तिची प्रकृती आणखीनच बिघडली.
Child Health: आजकालचं युग हे मोबाईल युग आहे. मोबाईल हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनल्याचं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आज आपण सगळेच स्मार्टफोन वापरतो, पण याच स्मार्टफोनचा तुमच्या मुलांच्या आरोग्यावर इतका गंभीर परिणाम होऊ शकतो. ज्याचा तुम्ही विचारही केला नसेल. महिला आपल्या मोबाईलने मुलाचा फोटो काढत असताना त्याच्या डोळ्यात असे काहीतरी दिसले, त्यानंतर त्याची प्रकृती आणखीनच बिघडली. तिला आपल्या मुलाच्या डोळ्यात असं काय दिसलं असेल, जाणून घ्या..
मोबाईलच्या लाईटमुळे मुलाच्या डोळ्यात काहीतरी दिसले..
जगभरात अशी अनेक प्रकरणे वेळोवेळी समोर आली आहेत, जिथे लोक मोबाईलवर काहीतरी क्लिक करत होते आणि अचानक काही गोष्टी समोर आल्या आहेत, ज्याचा त्यांनी विचारही केला नव्हता. आता असेच एक प्रकरण समोर आले आहे, जिथे एक महिला आपल्या स्मार्टफोनने आपल्या मुलाचा फोटो काढत होती, तेव्हा तिला मोबाईलच्या लाईटमुळे मुलाच्या डोळ्यात काहीतरी दिसले, त्यानंतर त्याची प्रकृती आणखीनच बिघडली.
प्रकरण कुठले आहे?
तुम्ही कधी ऐकले आहे की, एखाद्याला स्मार्टफोनद्वारे कर्करोगासारखा गंभीर आजार आढळला आहे. होय, असेच एक प्रकरण इंग्लंडमधील गिलिंगहॅम शहरातून समोर आले आहे. जिथे एका महिलेला तिच्या फोनच्या फ्लॅश लाईटमुळे कर्करोगाचा दुर्मिळ प्रकार आढळला आहे. सारा हेजेस असे या महिलेचे नाव असून ती 40 वर्षांची आहे, तसेच तिला चार मुले आहेत. सारा हेजेस एके दिवशी रात्रीचे जेवण बनवत असताना, तिची थॉमस नावाच्या 3 महिन्यांच्या बाळावर नजर पडली. त्या महिलेला मुलाच्या डोळ्यात एक विचित्र “पांढरी चमक” दिसली, जी मांजरीच्या डोळ्यांसारखीच दिसत होती.
इंटरनेटची घेतली मदत
महिलेने चिंतेत आपला स्मार्टफोन उचलला आणि तो फोटोंमध्ये टिपण्याचा विचार केला, ज्यासाठी त्याने फोनचा फ्लॅश लाईट वापरला. हे पाहून ती थोडी उत्सुक आणि काळजी करू लागली. साराने तिच्या मुलाच्या प्रकृतीबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी इंटरनेटचा आधार घेतला.
Today marks the start of World Retinoblastoma Awareness Week! Would you know the signs and symptoms of retinoblastoma (childhood eye cancer)? Learn more on our website https://t.co/7JSOTD6leR #RbWeek pic.twitter.com/cTHCs5PoJk
— CHECT UK (@ChectUK) May 8, 2022
चमकेमागील गूढ काय?
त्यानंतर महिलेने आपल्या स्मार्टफोनने फ्लॅश चालू केला आणि थॉमसचे काही फोटो घेतले, ती चमक पुन्हा एकदा कॅप्चर केली. SWNS च्या अहवालानुसार, ही चमक काही वेळाने नाहीशी होत असल्याचे दिसले. दुसऱ्या दिवशी, साराने पुन्हा चमकेमागील गूढ उकलण्यासाठी काही नवीन पद्धती वापरल्या. तिने थॉमसला वेगवेगळ्या खोल्यांमध्ये फिरवले, वेगवेगळ्या प्रकाशात त्याचे बारकाईने निरीक्षण केले. मग अचानक ही चमक पुन्हा दिसली.
मुलामध्ये डोळ्यांचा कर्करोग
त्यानंतर साराने पुन्हा इंटरनेटवर याबद्दल सर्च केले. ज्यात महिलेला असे आढळले की, हा एक गंभीर आजार दर्शवत आहे, जो डोळ्यांचा कर्करोग असू शकतो. त्यानंतर ती स्त्री तिच्या मुलाला डॉक्टरांकडे घेऊन गेली, जिथे डॉक्टरांनी तिला सांगितले की, थॉमसला रेटिनोब्लास्टोमा आहे, जो डोळ्याच्या कर्करोगाचा एक दुर्मिळ आणि गंभीर प्रकार आहे. या बातमीमुळे साराची प्रकृती बिघडली आणि ती खूप घाबरली.
रेटिनोब्लास्टोमाचे मुख्य लक्षण
डोळ्यात पांढरा डाग किंवा चमक हे सामान्यतः या कर्करोगाचे पहिले लक्षण असते. कधीकधी हा पांढरा डाग दिसू शकतो.
हेही वाचा>>>
Child Health: मुलांनी कोणत्या वयात किती वेळ मोबाईल स्क्रीन पाहावी? तज्ज्ञांनी दिलेला सल्ला फॉलो करा, फायदे होतील
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )