Maratha Samaj on Walmik Karad | वाल्मीक कराडची नार्को टेस्ट करा, नांदेड मधील मराठा समाजाची मागणी
Maratha Samaj on Walmik Karad | वाल्मीक कराडची नार्को टेस्ट करा, नांदेड मधील मराठा समाजाची मागणी
अवादा कंपनीचे प्रकल्प अधिकारी सुनील शिंदे यांच्या तक्रारीवरून 2 कोटी रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी वाल्मीक कराड आणि विष्णू साठे या दोघांवर केज पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला.. 31 डिसेंबरला खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराड याने पुण्याच्या सीआयडी हेडक्वार्टरला सरेंडर केले.. 14 तारखेपर्यंत वाल्मीक कराड यांना केज जिल्हा व सत्र न्यायालयाने पोलीस कस्टडी सुनावली आहे.. सध्या वाल्मीक कराड हा सीआयडीच्या ताब्यात आहे.. विष्णू चाटे यांच्या मोबाईल वरून वाल्मीक कराड याने अवादा कंपनीच्या प्रकल्प अधिकाऱ्याला खंडणी मागितल्याचा व्हॉइस कॉल सीआयडीच्या हाती लागला आहे.. या कॉल मधील आवाज वाल्मीक कराड आणि विष्णू चाटे चाच आहे का हे पाहण्यासाठी व्हाईस सॅम्पल घेतले आहेत आवादा एनर्जी कंपनीच्या प्रकल्प अधिकारी यांच्याकडे दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी वाल्मीक कराड सध्या सीआयडी कोठडीत आहे. विष्णू चाटे याच्या माध्यमातून फोनवरून ही खंडणी मागण्यात आली होती. दरम्यान याच अनुषंगाने वाल्मीक कराड याच्या कॉल रेकॉर्डिंग मध्ये नेमकं काय आहे? हे तपासणीसाठी कराडचे व्हॉइस सॅम्पल घेतले जाणार आहेत.. 29 नोव्हेंबर रोजी विष्णू चाटे याने वाल्मीक कराड आणि सुनील शिंदे या प्रकल्प अधिकाऱ्याचे फोनवरून बोलणे करून दिले होते. आणि याच माध्यमातून दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप वाल्मीक कराडवर आहे. यात गुन्हा नोंदवून सीआयडीने कराडला अटक देखील केली. या प्रकरणाचा तपास सीआयडी कडून सुरू आहे. विष्णू चाटे याची चौकशी झाल्यानंतर वाल्मीक कराड याचे देखील व्हॉइस सॅम्पल घेतले जाणार आहेत. दरम्यान 29 डिसेंबर ला प्रकल्प चालक सुनील शिंदे याला धमकी मिळाली होती. तर त्याने तक्रार देण्यास विलंब का केला? याचा देखील तपास केला जात आहे.