Cancer: सावधान! तुमच्या दातांमुळे सुद्धा होऊ शकतो कर्करोग? 'ही' लक्षणं तुम्हाला नाही ना? तज्ज्ञांचे मत जाणून घ्या
Cancer: तुम्हाला माहित आहे का? आपल्या दातांमुळे देखील कर्करोग होऊ शकतो? मौखिक आरोग्य तज्ज्ञांचे मत काय आहे? जाणून घेऊया.
Mouth Cancer: कर्करोग हा एक असा गंभीर आजार आहे. ज्याचे नाव ऐकताच भल्याभल्यांना घाम फुटतो. आजकाल दातांचे आजारही खूप वाढले आहेत. दातांच्या आरोग्याविषयी एक गोष्ट सर्वात जास्त सांगितली जाते ती म्हणजे, जर आपण आपल्या दातांची योग्य काळजी घेतली, जसे की दात स्वच्छ करणे, वेळोवेळी तपासणे. योग्य ब्रश आणि पेस्ट वापरणे, तर तोंडाचे आरोग्य चांगले राहते. पण तुम्हाला माहित आहे का? की आपल्या दातांमुळे देखील कर्करोग होऊ शकतो? आपल्या दातांमुळे देखील अनेक रोग होऊ शकतात? यावर तज्ज्ञांचे काय म्हणणे आहे? जाणून घेऊया.
तज्ज्ञ काय म्हणतात?
एका वृत्तवाहिनीने घेतलेल्या मुलाखतीनुसार, डॉ. प्रवीण कुमार, जे मॅक्स हॉस्पिटलच्या दंत विभागात आहेत, हेल्थ ओपीडी यूट्यूब चॅनलवर पॉडकास्ट मुलाखतीत स्पष्ट करतात की, आपले दात हे आपल्या शरीराचा भाग आहेत. ज्याचे सर्वात जास्त संरक्षण करणे आवश्यक आहे. ते म्हणतात, तोंडाचे आरोग्य हे केवळ दात आणि हिरड्यांच्या समस्यांपुरते मर्यादित नाही, तर त्यामुळे गंभीर आजार होऊ शकतात. आपले दात देखील कर्करोगासारख्या आजाराचे कारण कसे बनू शकतात? हे त्यांनी सांगितले.
दात आणि कर्करोग यांच्यातील संबंध काय?
डॉक्टर प्रवीण यांच्या मते, तोंडाची स्वच्छता आणि दातांची काळजी नियमितपणे घेतली नाही तर हिरड्यांमध्ये जळजळ आणि इतर संसर्ग होऊ शकतात. कालांतराने, या संसर्गामुळे दीर्घकाळ जळजळ होऊ शकते, ज्यामुळे आपल्या त्वचेच्या पेशींच्या डीएनएला नुकसान होऊन कर्करोग होऊ शकतो. त्यामुळे तोंडाच्या कर्करोगाचा धोका सर्वाधिक असतो. जे लोक तंबाखू, सुपारी यांचे सेवन करतात आणि अति प्रमाणात मद्यपान करतात. त्यांचे दात आणि हिरड्यांच्या आरोग्यास हानी पोहोचते. या सवयी केवळ हिरड्या कमकुवत करत नाहीत तर कर्करोगास कारणीभूत असलेल्या जीवाणूंना जन्म देतात. डॉक्टरांचे म्हणणे आहे की, या गोष्टी चघळल्याने काहीवेळा गालाच्या आतील भागात कट होतात, ज्यामुळे कर्करोग होऊ शकतो.
तोंडाच्या कर्करोगाची लक्षणं
- तोंडाच्या आत पांढरे किंवा लाल ठिपके असणे.
- चघळण्यात किंवा बोलण्यात अडचण जाणवणे.
- दात मोकळे होणे.
- जबडा किंवा घशात गाठी.
- ज्या जखमा बराच काळ बऱ्या होत नाहीत.
'या' गोष्टींची काळजी घ्या
- दिवसातून 2 वेळा ब्रश करा.
- आठवड्यातून 2-3 वेळा फ्लॉस करा.
- दर 6 महिन्यांनी दातांची तपासणी करा.
- तंबाखू आणि दारूचे सेवन थांबवणे महत्त्वाचे आहे.
- सकस आणि संतुलित आहार घ्या.
हेही वाचा>>>
Weight Loss: महिन्याभरात शरीरातील चरबी विरघळेल, वजन होईल कमी, फक्त रात्रीच्या जेवणानंतर या 5 गोष्टी करू नका..
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )