Maharashtra Weather: आता उकाड्यासह घामाच्या धारा! राज्यात 48 तासांत तापमानात मोठे बदल, IMD चा इशारा काय?
Maharashtra Weather Update: येत्या पाच दिवसात राज्यात कोरडे व शुष्क वाऱ्यांचे प्रवाह सक्रीय होणार आहेत.परिणामी तापमानावर त्याचा परिणाम होणार आहे.
Maharashtra Weather Update: राज्यात गेल्या चार दिवसांपासून किमान तापमानात चढउतार दिसून येत असून किमान तापमान वाढण्यास सुरुवात झाली आहे. गारठा कमी झाला असून दुपारी उन्हाचा चटका वाढलाय. काही दिवसांपूर्वी 10 अंशाखाली गेलेला किमान तापमानाचा पारा आता 15-23 अंशांपर्यंत गेला आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तापमानात वाढ झाली आहे. उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात येत्या 48 तासांनंतर तापमान 2-3 अंशांनी वाढण्याचा इशारा हवामान विभागानं दिलाय. त्यामुळे आता राज्यातील नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागणार आहे. हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार, येत्या पाच दिवसात राज्यात कोरडे व शुष्क वाऱ्यांचे प्रवाह सक्रीय होणार आहेत.परिणामी तापमानावर त्याचा परिणाम होणार आहे. (IMD Forecast)
बुधवारी मध्य महाराष्ट्रसह मराठवाड्यात किमान तापमानात वाढ झाल्याची नोंद झाली. बहुतांश ठिकाणी किमान तापमानाचा पारा 16-20 अंशांपर्यंत होता. मुंबईत कुलाब्यात 21.8 अंश सेल्सियसची नोंद झाली. सांताक्रूझ भागात 18.3 अंश सेल्सियस तापमान होते. मराठवाड्यात औरंगाबाद जिल्ह्यात 14.8 अंश तर लातूरमध्ये 18.6 अंश तापमान होतं. पुण्यात 14- 17 अंश तापमान होतं.
हवामान विभागाचा अंदाज काय?
पंजाबसह परिसरात पश्चिमी चक्रावात सक्रीय झालाय. राजस्थान आणि परिसरात चक्राकार वारे वाहत असून येत्या 48 तासांत 2-3 अंशांनीव वाढण्याचा अंदाज देण्यात आलाय. मध्य महाराष्ट्रात सामान्य तापमानापेक्षा अधिक तापमानाची नोंद झाले. कमाल तापमानातही राज्यात 1.6-3 अंशांनी वाढ झाल्याचं दिसून आलं.राजस्थान आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. वायव्य भारतात 150 नॉट्स वेगाने पश्चिमेकडील जोरदार वाऱ्यांचे प्रवाह कायम आहेत. या परिस्थितीचा राज्यातील थंडीवरही परिणाम होत आहे. तापमानात यामुळे चढउतार आहेत.
मराठावाड्यात पुढील पाच दिवसात हवामान कसे?
मराठवाड्यात येत्या पाच दिवसात तापमानात 2-3 अंशांनी वाढ होणार असून कोरडे व शुष्क वारे वाहणार आहेत. त्यामुळे मराठवाड्यातही किमान व कमाल तापमानात बदल होणार असल्याचं सांगण्यात आलंय. प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, येत्या 4 दिवसात किमान तापमानात हळूहळू वाढ होण्याची शक्यता आहे. त्यानंतर फारशी तफावत नसेल असं सांगण्यात आलं आहे. पुढील दोन दिवसात किमान तापमानात फारसा बदन नसून त्यानंतर हळूहळू तापमानात 2-3 अंशांनी वाढ होण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. राज्यात थंडीचा कडाका कमी झाला असून, किमान तापमान कमी-जास्त होत आहे. अनेक ठिकाणी पहाटे धुक्याची चादर पाहायला मिळत आहे.
हेही वाचा: