Health : अॅबोटचे ग्रो राईट 2.0 चार्टर करणार पालकांची चिंता दूर; मुलांच्या आरोग्यासाठी महत्वाचे पाऊल
Abbotts Grow Right 2.0 Charter : भारतातील 2,500 हून अधिक मातांच्या केलेल्या सर्वेक्षणातून मुलांच्या खाण्यापिण्याच्या सवयी, शारीरिक सक्रियता आणि मुलांच्या निरोगी वाढीवर परिणाम झाल्याचे निदर्शनास आले.
Abbotts Grow Right 2.0 Charter : गेल्या दोन वर्षांत कोरोनामुळे आपल्या रोजच्या आयुष्यातील, विशेषत: पालकत्वाशी संबंधित कितीतरी गोष्टी बदलून गेल्या आहेत. यामध्येच अॅबॉट-मॉमप्रेसो सर्वेक्षणाने भारतीय पालकांना आजही सतावणारे अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. मुलांच्या निरोगी आणि सर्वंकष वाढीला प्रोत्साहन देण्यासाठी अॅबॉटने आपले ग्रो-राइट 2.0 चार्टर प्रसिद्ध केले असून त्यामध्ये वाढीचे मापन (Measuring growth) आहार (Eating), सक्रियता (Activity), पोषण (Nurturing) आणि झोप (Sleep) या वाढीशी संबंध घटकांचा समावेश असलेल्या M-E-A-N-S गाईडलाईन्स अर्थात मार्गदर्शक सूचना आखून दिल्या आहेत. आरोग्य आणि पोषणतज्ज्ञांच्या ज्ञानाचे पाठबळ लाभलेले हे चार्टर आरोग्यपूर्ण जीवनशैलीला पूरक सवयींना प्रोत्साहन देण्यासाठीच्या सूचनांच्या माध्यमातून पालकांच्या चिंतांवर उत्तर शोधण्यास मदत करू शकते, ज्यांचा त्यांच्या मुलांच्या आयुष्यावर सकारात्मक प्रभाव पडू शकेल.
या वर्षाच्या सुरुवातीला भारतातील 2,500 हून अधिक मातांच्या केलेल्या सर्वेक्षणातून मुलांच्या खाण्यापिण्याच्या सवयी आणि शारीरिक सक्रियता या निरोगी वाढीवर परिणाम करणा-या दोन महत्त्वाच्या घटकांमध्ये झालेले बदल अधोरेखित झाले:
1. सर्वेक्षणात सहभागी झालेल्यांपैकी 68 टक्के मातांच्या म्हणण्यानुसार मुले विशिष्ट पदार्थ खाण्याच्या बाबतीत अधिक कुरकुर करू लागली आहेत.
2. 84 टक्के सहभागींच्या मते पॅनडेमिकमुळे मुलांच्या शारीरिक हालचाली कमी झाल्या आहेत आणि डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे.
3. आपल्या मुलांची रोगप्रतिकारशक्ती बाहेरील वातावरणामध्ये सुरक्षित राहण्यासाठी पुरेशी सक्षम नाही असे 70 टक्के सहभागींना वाटते.
अॅबॉटने विकसित केलेले ग्रो राइट 2.0 चार्टरमध्ये या सर्वेक्षणाच्या निष्कर्षांना विचारात घेण्यात आले आहे आणि बालरोगतज्ज्ञ डॉ. इंदू खोसला आणि डॉ. सुमन पोतदार, पोषणतज्ज्ञ डॉ. एलीन कँडे आणि बालमानसोपचारतज्ज्ञ डॉ. शिव प्रसाद श्रीनिवासन यांच्यासारख्या बालरोग, पोषण आणि वर्तणूकविज्ञान या क्षेत्रांतील आघाडीच्या तज्ज्ञांच्या मंडळाकडून आलेल्या शिफारशींचा समावेश या चार्टरमध्ये करण्यात आला आहे.
‘Right M-E-A-N-S to Grow’चा स्वीकार करण्याची मुलभूत गरज :
कोरोना महामारीच्या काळानंतर शाळा, ऑफिस पुन्हा सुरु झाले असताना जगण्याच्या नव्या सर्वसामान्य पद्धतीचा स्वीकारही लक्षणीय वेगाने केला जात आहे. अशावेळी पालकांनी आणि मुलांनीही एकटं असण्याच्या काळात लागलेल्या निष्क्रियता आणि विस्कळीत दिनक्रमासारख्या सवयी सोडून द्यायला हव्यात.
''मुलांच्या आयुष्यातील सुरुवातीच्या वर्षांमध्ये त्यांच्या पुढील आयुष्याचा पाया रचला जातो आणि आयुष्यभरासाठी स्वास्थ्य आणि विकासाची बेगमी करण्यासाठी हा काळ अत्यंत महत्त्वाचा असतो.” अॅबॉटच्या भारतातील न्यूट्रीशन बिझनेस विभागाच्या जनरल मॅनेजर स्वाती दलाल म्हणाल्या. “वाढीची जोपासना करणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे आणि म्हणूनच अॅबॉटने पालकांच्या चिंता लक्षात घेतल्या आहेत आणि त्यांना ग्रो राइट 2.0 चार्टरचे बळ देऊ केले आहे. मुलांची केवळ शारीरिक नव्हे तर सर्वांगीण वाढ व्हावी याची काळजी वाहणारे घटक अर्थात M-E-A-N-S या चार्टरमध्ये समाविष्ट आहेत.”
M-E-A-N-S गाइडलाइन्समध्ये मांडण्यात आलेले काही महत्वाचे मुद्दे :
वाढीचे मोजमाप आणि देखरेख : मुलाच्या वाढीचा आलेख समजून घेण्यासाठी व त्यावर देखरेख ठेवण्यासाठी वाढीचे अचूक मापन होणे महत्त्वाचे असते. यामुळे वाढीमध्ये काही उणीव राहून गेल्यास तीही पालकांच्या लक्षात येण्यास मदत होऊ शकते व त्यामागील कारणांवर लवकरात लवकर उपाययोजना करता येते.
योग्य आहार : पोषण ही सर्वांगीण वाढ आणि रोगप्रतिकारशक्तीला आधार देणारी गुरुकिल्ली आहे. मुलांच्या आहारामध्ये तृणधान्ये, डाळी, दूध आणि मांस, फळे आणि भाज्या, स्निग्ध पदार्थ आणि साखर अशा पाच अन्नगटांतील पदार्थांचा समावेश असायला हवा. खाण्यापिण्याच्या बाबतीत कुरकुर, आळस करणा-या मुलांना संतुलित पोषण मिळावे यासाठी न्यूट्रिशन सप्लिमेंट्सची मदत होऊ शकते.
खेळण्यात सक्रिय सहभाग : शारीरिक हालचालींमुळे हाडांचे आरोग्य सुधारते, चांगली झोप लागते आणि एकूण शारीरिक स्वास्थ्यामध्ये सुधारणा घडून येते. यामुळे लहान मुलांमधील लठ्ठपणासह तब्येतीच्या विविध समस्या उद्भवण्याचा धोकाही कमी होतो.
जोपासना आणि शिस्त : सहानुभाव दाखवून आणि मनातील भावना उघड करण्यासठी प्रोत्साहन देत पालक आपल्या मुलांचे भावनिक स्वास्थ्य जोपासू शकतात. मुलांना वारंवार शिक्षा देऊ नये असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्याऐवजी त्यांना आत्मचिंतनासाठी आणि स्वत:च्या वागण्यातील दोष दूर करण्याचा निर्धार करण्यासाठी मदत करायला हवी.
झोप घेण्यास प्रोत्साहन देणे : लहान वयापासूनच मुलांना वेळच्यावेळी आणि पुरेशी झोप घेण्याची चांगली सवय लावल्याने मुलांच्या शारीरिक आणि संज्ञानात्मक कामगिरीला प्रोत्साहन मिळते. पालकांनी मुलांना विशिष्ट वेळी झोपी जाण्याची सवय लावली पाहिजे आणि झोपेच्या वेळेमध्ये नियमितता जपली पाहिजे.
महत्वाच्या बातम्या :
- Heart Health : निरोगी हृदयासाठी आहारात 'या' जीवनसत्त्व आणि खनिजांचा समावेश करा
- Diet Tips : निरोगी राहायचे असेल तर मूग डाळ खा; फायदे जाणून तुम्हालाही आश्चर्य वाटेल
- Health Tips : तणावमुक्त आयुष्य हवंय? या पाच गोष्टींचा काळजी घ्या...
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )