(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Diet Tips : निरोगी राहायचे असेल तर मूग डाळ खा; फायदे जाणून तुम्हालाही आश्चर्य वाटेल
Mung Dal benefits : मूगाची डाळ खाल्ल्याने कॅल्शियम, पोटॅशियम, जीवनसत्त्वे आणि फायबर मिळतात.
Mung Dal benefits : तुम्हाला जर निरोगी राहायचे असेल तर तुमच्या आहारात मूगाच्या डाळीचा समावेश नक्की असणे गरजेचे आहे. कारण मूगाच्या डाळीत भरपूर पौष्टिक घटक आणि प्रथिने असतात. मूगाची डाळ खाल्ल्याने कॅल्शियम, पोटॅशियम, जीवनसत्त्वे आणि फायबर मिळतात. मुलांना रोज कडधान्य खायला द्यावे. कडधान्ये खाल्ल्याने शरीर निरोगी राहते. तुम्ही आहारात रोज जरी मूगाच्या डाळीचा समावेश केला तरी तुम्ही निरोगी राहू शकता. उन्हाळ्यात आणि पावसात तर मूगाची डाळ नक्की खावी. मूगाची डाळ अतिशय हलकी आणि पचण्यायोगी असते. पोट खराब होत असेल तर मूगाच्या डाळीची खिचडी खाण्याचा सल्ला दिला जातो. पावसात पचनसंस्था कमजोर होते, त्यामुळे मूग डाळ खावी. जाणून घेऊया मूग डाळ खाण्याचे फायदे.
मूग डाळ खाण्याचे फायदे
- मूग डाळ ही पचायला खूप चांगली असते. त्याचा आहारात समावेश करा.
- उन्हाळ्यात मूग डाळ खाल्ल्याने पोटाला थंडावा मिळतो.
- पोटदुखी किंवा बद्धकोष्ठता असल्यास मूग डाळ खिचडी खावी.
- मुलाला जुलाब होत असल्यास त्याला मूग डाळीचे पाणी द्यावे.
- बाळाला सुरुवातीला मूग डाळीचे पाणी दिल्याने फायदा होतो.
- मूग डाळीमध्ये खूप कमी कॅलरीज असतात, जे वजन कमी करण्यास देखील उपयुक्त आहेत.
- मूग डाळ खाल्ल्याने शरीराला दीर्घकाळ ऊर्जा मिळते.
- आजारपणानंतर शारीरिक अशक्तपणा दूर करण्यासाठी मूग डाळ खावी.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्वाच्या बातम्या :