Home Remedies For Body Detox: शरीराच्या आतील दूषित घटक झटपट बाहेर टाकेल रामदेव बाबांचा 'हा' उपाय; कसं तयार कराल डिटॉक्स वॉटर?
Home Remedies For Body Detox: धकाधकीची जीवनशैली (Stressful Lifestyle) आणि वेळीअवेळी खाणं-पिणं (Wrong Diet) यामुळे शरीराला अनेक समस्या उद्भवतात. यावर बॉडी डिटॉक्स (Body Detox) हा उत्तम पर्याय ठरतो.
![Home Remedies For Body Detox: शरीराच्या आतील दूषित घटक झटपट बाहेर टाकेल रामदेव बाबांचा 'हा' उपाय; कसं तयार कराल डिटॉक्स वॉटर? Ayurvedic Home Remedies For Body Detox by baba ramdev Patanjali Health Care Tips Healthy Diet Know All Details Home Remedies For Body Detox: शरीराच्या आतील दूषित घटक झटपट बाहेर टाकेल रामदेव बाबांचा 'हा' उपाय; कसं तयार कराल डिटॉक्स वॉटर?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/02/28/e66d5754708eef72c3b1a9a756b2c7b0170908857301488_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Ayurvedic Home Remedies For Body Detox: घरात लावलेला एसीमुळे कुलिंग होणं बंद झालं, तर आपण समजून जातो की, आपल्याला सर्विसिंगची गरज आहे. प्रत्येक मशीनला सर्व्हिसिंगची गरज असते. सर्विसिंगमध्ये मशीनचे पार्ट स्वच्छ केले जातात. त्याला ऑयलिंग केलं जातं. त्याचप्रमाणे आपलं शरीरही एकप्रकारचं मशीन आहे. त्यालाही सर्विसिंगची गरज असते. आता तुम्ही म्हणाल, काहीतरी काय शरीराची कशी सर्विसिंग करायची? तुम्ही तुमच्या शरीराची सर्विसिंग करू शकता. कसं तर डिटॉक्स (Detox) करुन.
धकाधकीची जीवनशैली (Stressful Lifestyle) आणि वेळीअवेळी खाणं-पिणं (Wrong Diet) यामुळे शरीराला अनेक समस्या उद्भवतात. यावर बॉडी डिटॉक्स (Body Detox) हा उत्तम पर्याय ठरतो. आपल्या शरीराला वेळोवेळी डिटॉक्स करणं अत्यंत आवश्यक आहे. आपलं शरीर तेव्हाच चांगलं काम करतं, जेव्हा त्यात कमी कचरा असतो आणि रक्तापासून त्वचेच्या पेशींपर्यंत सर्व काही स्वच्छ असतं, असे आरोग्य तज्ज्ञांचे मत आहे.
डिटॉक्स प्रक्रियेमध्ये (Body Detox Process) आहार (Healthy Diet) आणि जीवनशैलीतील (Lifestyle) बदलांकडे लक्ष देण्याचा सल्ला दिला जातो. या क्रमात योगगुरू बाबा रामदेव यांनी रामबाण उपाय सांगितला आहे. जो शरीराला डिटॉक्स करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतो.
रामदेव यांनी बॉडी डिटॉक्स करण्याचा उपाय सांगितला
View this post on Instagram
घरच्या घरी तुळशीच्या बिया टाकून शरीर डिटॉक्स करा (Basil Seeds Benifits)
बाबा रामदेव यांच्या मते, तुळशीच्या पानांचा रस शरीराला डिटॉक्स करण्यास मदत करतो. बाबा रामदेव सोशल मीडियावरील त्यांच्या एका व्हिडीओमध्ये सांगतात की, तुळशीच्या बिया एका ग्लास पाण्यात रात्रभर भिजत ठेवा. दुसऱ्या दिवशी सकाळी ते पाणी अनोशापोटी प्या.
रामदेव यांच्या म्हणण्यानुसार, यामुळे शरीरातील सर्व घाण निघून जाईल आणि शरीर डिटॉक्स होण्यास मदत होईल. शरीर डिटॉक्स झाल्यानंतर अधिक ऊर्जावान वाटेल. तुळशीच्या बिया आणि तुळशीच्या पानांचं चूर्ण कफ-वात दोष कमी करण्यासाठी, पचनशक्ती आणि भूक वाढवण्यासाठी तसेच रक्त शुद्ध करण्यासाठी उपयुक्त मानलं जातं.
बॉडी डिटॉक्सचे फायदे (Benefits of Body Detox)
- डिटॉक्सिंगमुळे त्वचेची नैसर्गिक चमक कायम राहते.
- शरीरातील हानिकारक विषारी पदार्थ बाहेर टाकले जातात, त्यामुळे सूज येण्याची समस्या होत नाही.
- चयापचय वाढतं आणि वजन कमी करण्यासाठी देखील फायदेशीर आहे.
- वाढत्या कोलेस्ट्रॉलवरही नियंत्रण ठेवू शकता.
- किडनी, यकृत आणि पोटाच्या आजारांपासून बचाव होतो.
(टिप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. त्यामुळे शरीराच्या कोणत्याही समस्येवर कोणताही उपाय करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.)
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)