Alert : आवडीनं मोमोज खाताय? सावधान! मोमोज खाल्याने एकाचा मृत्यू, तुम्ही 'ही' चूक करू नका; एम्सचा इशारा
Health Tips : जर तुम्हीही मोमोज खाण्याचे शौकीन असाल तर एम्सच्या या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करु नका. AIIMS ने मोमोज खाणाऱ्या लोकांना योग्य प्रकारे चावून खाण्याचा आणि सावधगिरीनं गिळण्याचा सल्ला दिला आहे.
Health Tips : जर तुम्हीही मोमोज खाण्याचे शौकीन असाल तर सावधान... यामध्ये थोडंही दुर्लक्ष तुमच्या जिव्हारी बेतू शकतं. तुम्ही घाईगडबडीत मोमोज पूर्ण चावण्याआधी गिळताय, तर ही चूक तुमचा जीवही घेऊ शकते. एम्सने (AIIMS) यासंदर्भात सावधगिरी बाळगण्याचा इशारा दिला आहे. एम्सने म्हटलं आहे की, मोमोज न चावता गिळल्याने मृत्यू होण्याची शक्यता आहे. मोमोज खाल्ल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. याचं कारण म्हणजे त्या व्यक्तीने मोमोज चावून नाही तर गिळून खाल्ला होता.
जर तुम्हीही मोमोज खाण्याचे शौकीन असाल तर एम्सच्या या सावधगिरीच्या इशाऱ्याकडे नक्की लक्ष द्या. मोमोज खाणाऱ्या लोकांना ते पूर्णपणे चावून आणि सावधगिरीने गिळण्याचा एम्सने सल्ला दिला आहे. याकडे दुर्लक्ष करणं तुमच्या जीवावर बेतू शकतं. एम्सच्या तज्ज्ञांचे मते, जर तुम्ही मोमोज पूर्णपणे चघळून खाल्ल्यास ते पोटात अडकू शकतात, यामुळे जीवाला धोका उद्भवू शकतो. मोमोज खाल्ल्यानंतर एका 50 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर एम्सच्या तज्ज्ञांनी ही बाब उघडकीस आणली आहे.
मोमोज श्वसनाच्या नळीत अडकला
दिल्लीतील एका 50 वर्षीय व्यक्तीला एम्समध्ये आणण्यात आले जिथे, त्याला मृत घोषित करण्यात आलं. फॉरेन्सिक रिपोर्टनुसार, हा व्यक्ती दारू प्यायला होता. त्यानंतर त्याने मोमोज खाल्ले. यानंतर तो जमिनीवर पडला. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या व्यक्तीच्या श्वसनाच्या नळीमध्ये मोमोज अडकला. ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला. या समस्येला न्यूरोजेनिक कार्डियाक अरेस्ट असं म्हणतात.
जेवण पूर्णपणे चघळून खा
तज्ज्ञांच्या मते, आपण कोणतीही मोठ्या आकाराचा पदार्थ चावून खायला हवा. कारण आकाराने मोठे असणारे पदार्थ शरीरातील नळ्यांमध्ये अडकण्याची शक्यता असते. जर आपण चघळल्याशिवाय खाल्ले तर ती वस्तू घसरून वाऱ्याच्या नळीत अडकण्याची शक्यता असते. यामुळे श्वसनात अडथळा होऊन यामुळे मृत्यू होऊ शकतो.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्त्वाच्या इतर बातम्या
- International Yoga Day 2022 : योग म्हणजे काय? जाणून घ्या योगाचे फायदे आणि प्रकार
- Fasting Diet : उपवास करुन वजन कमी होतं? काय आहे यामागचं सत्य? वाचा सविस्तर
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )
Calculate The Age Through Age Calculator
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )