Rohit Sharma : रोहित शर्मा आक्रमक सुरुवातीनंतर पुन्हा फसला, हिटमॅन जम्मू काश्मीरच्या जाळ्यात अडकला, मुंबईला मोठा धक्का
Rohit Sharma : मुंबई आणि जम्मू काश्मीर यांच्यातील रणजी स्पर्धेतील सामन्यात रोहित शर्मा चांगल्या सुरुवातीनंतर दुसऱ्या डावात मोठी खेळी करण्यास अपयशी ठरला.
मुंबई : मुंबई आणि जम्मू काश्मीर (Mumbai vs Jammu Kashmir) यांच्यातील रणजी स्पर्धेतील (Ranji Trophy) सामन्यात टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा (Rohit Sharma) दुसऱ्या डावात चांगली सुरुवात केल्यानंतर मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. रोहित शर्मासह टीम इंडियाचे सर्व खेळाडू यंदा रणजी स्पर्धेत खेळत आहेत. रोहित शर्मा मुंबईच्या संघातून रणजी स्पर्धेतील सामन्यात खेळतोय. रोहित शर्मानं देशांतर्गत क्रिकेटमध्ये जवळपास 10 वर्षानंतर पुनरागमन केलं. मात्र, रोहित शर्मा दोन्ही डावात चांगली खेळी करण्यास अपयशी ठरला आहे. पहिल्या डावात 3 धावा तर दुसऱ्या डावात रोहित शर्मा 28 धावा करुन बाद झाला.
चांगल्या सुरुवातीनंतर रोहित शर्मा मोठी खेळी करण्यात अपयशी
रोहित शर्मा 10 वर्षानंतर मुंबईच्या संघातून खेळत असल्यानं त्याच्या चाहत्यांना चांगल्या खेळीची अपेक्षा होती. जम्मू काश्मीर विरुद्धच्या सामन्यात पहिल्या डावात रोहित शर्मा 3 धावा करुन बाद झाला. रोहित शर्माला पहिल्या डावात उमर नाझीर मीर यानं 3 धावांवर बाद केलं होतं. दुसऱ्या डावात तरी रोहित शर्मा चांगली कामगिरी करेल अशी अपेक्षा चाहत्यांना होती. आज रोहित शर्मानं दुसऱ्या डावात आक्रमक सुरुवात केली होती. रोहितनं तीन षटकार आणि 2 चौकार मारत आक्रमक सुरुवात केली होती. मात्र, युधवीर सिंग याच्य गोलंदाजीवर रोहित शर्मा बाद झाला. दोन्ही डावात रोहित शर्माला मोठी खेळी करण्यात अपयश आल्यानं चाहत्यांची निराशा झाली.
मुंबईचा संघ संकटात
मुंबईच्या संघानं पहिल्या डावात 120 धावा केल्या होत्या. जम्मू काश्मीरचा संघ पहिल्या डावात 206 धावांवर बाद झाला. त्यानंतर दुसऱ्या डावात रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वालनं आक्रमक सुरुवात केली. मात्र, रोहित शर्मा बाद झाल्यानंतर त्या पाठोपाठ हार्दिक ताकोरे देखील बाद झाला. यशस्वी जयस्वाल देखील मोठी खेळी करु शकला नाही. यशस्वी जयस्वाल 26 धावा करुन बाद झाला.
जम्मू काश्मीरची प्रभावी गोलंदाजी
मुंबईनं टॉस जिंकल्यानंतर पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, जम्मू काश्मीरच्या दमदार गोलंदाजीपुढं मुंबईच्या संघातील खेळाडू टिकाव धरु शकले नाहीत. शार्दूल ठाकूर वगळता इतर फलंदाजांना पहिल्या डावात मोठी खेळी करण्यात अपयश झालं होतं. यशस्वी जयस्वाल, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, शिवम दुबे, हे पहिल्या डावात मोठी खेळी करण्यात अपयशी ठरले. जम्मू काश्मीरच्या उमर नाझीर मीर, युधवीर सिंगनं प्रत्येकी 4 विकेट घेतल्या. तर ऑकिब नबीनं दोन विकेट घेतल्या.
Rohit Sharma dismissed for 28 in 35 balls. pic.twitter.com/AIO4kA3KDE
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) January 24, 2025
इतर बातम्या :