एक्स्प्लोर

Sanjay Raut : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार, संजय राऊतांचा मोठा दावा, म्हणाले, शिंदेंच्या पक्षातील...

Sanjay Raut : एकनाथ शिंदे यांचे प्रकरण गांभीर्याने घेऊ नये. त्यांनी त्यांच्या पालकमंत्रीपदाचा वाद सोडवावा. ते स्वतः उपमुख्यमंत्री आहेत, काल ते मुख्यमंत्री होते, उद्या ते राहणार नाहीत, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

Sanjay Raut : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेच्या मेळाव्यात ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. बाळासाहेबांचे विचार सोडणाऱ्यांची अवस्था काय झालीय बघा? ज्यांनी विचार सोडले त्यांना सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही. ना घर का ना घाट का? अशी त्यांची अवस्था झाली आहे, असे त्यांनी म्हटले. तसेच कोणत्याही खुर्चीपेक्षा आपला स्वाभीमान महत्वाचा आहे. ही शिकवण आपल्याला बाळासाहेंबानी दिली असल्याचे वक्तव्य एकनाथ शिंदे यांनी केले. यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मोठा दावा केलाय. 

संजय राऊत म्हणाले की, आज जे काही सुरू आहे तो बाळासाहेबांचा विचार कधीच नव्हता. भ्रष्टाचार, महाराष्ट्राची लुट, महाराष्ट्राचे अध:पतन आणि हे उघड्या डोळ्यांनी पाहणारे लाचार राज्यकर्ते ज्यात हे लोक सहभागी आहेत. हा जर बाळासाहेबांचा विचार आहे, हे जर त्यांना वाटत असेल तर हा महाराष्ट्र अत्यंत धोकादायक लोकांच्या हातामध्ये गेलाय. एकनाथ शिंदे हे शिवसेना प्रमुख नाहीत किंवा शिवसेनेचे वारस नाहीत. एकनाथ शिंदे आणि त्यांचे लोक हे ईडी सीबीआयच्या भीतीने पळून गेलेले जयचंद आहेत. आपली कातडी वाचवण्यासाठी त्यांनी महाराष्ट्राच्या शत्रूला मदत करायचे ठरवले आहे. तुमच्याकडे भ्रष्ट मार्गाने मिळवलेला पैसा आहे. त्या पैशाच्या माध्यमातून लोक विकत घेणे. संस्था, मतदारांना विकत घेऊन निवडणूक जिंकणे याला तुम्ही राजकारण म्हणत असाल तर बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेवर तुम्ही थुंकण्याचा प्रयत्न करत आहात. नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना तेच हवे आहे, असा हल्लाबोल त्यांनी यावेळी केला. 

महाराष्ट्राला तिसरा उपमुख्यमंत्री लवकरच मिळतोय

बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना फोडून एक समांतर शिवसेना अमित शाह यांनी तयार केली. शिर्डी आणि प्रतिशिर्डी असते, मात्र लोक शिर्डीलाच जातात. पंढरपूर प्रतिपंढरपूर असते, पण लोक पंढरपूरलाच जातात. या महाराष्ट्रात दोन विठोबा आहेत. एक मातोश्रीवर आणि दुसरा पंढरपूरला आहे. बाकी अजून कोणी देऊळ बांधले असतील ती तात्पुरती आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे यांचे प्रकरण गांभीर्याने घेऊ नये. त्यांनी त्यांच्या पालकमंत्रीपदाचा वाद सोडवावा. ते स्वतः उपमुख्यमंत्री आहेत, काल मुख्यमंत्री होते, उद्या तेही राहणार नाहीत. तिसरा उपमुख्यमंत्री लवकरच महाराष्ट्राला मिळतोय आणि तो त्यांच्याच पक्षातला आहे, असा मोठा दावा संजय राऊत यांनी केलाय. 

शिंदेंनी एक पुस्तक वाचले आहे का?

ठाकरे गटाने आगामी महापालिका निवडणुकीत स्वबळाचा नारा दिला. याबाबत एकनाथ शिंदे यांनी स्वबळावर लढण्यासाठी मनगटात बळ पाहिजे, अशी टीका केली. याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, एकनाथ शिंदे यांच्या भाषणाकडे फार लक्ष देऊ नका. त्यांनी कधी एक पुस्तक तरी वाचले आहे का? कधी पेपर तरी वाचतो का माणूस? आम्ही बघून घेऊ आमची मनगटं. तुमच्यावरती मनगट चालवायची वेळ येईल हे लक्षात घ्या. आम्ही तुमच्यासारखी लाचारी पत्करलेली नाही. तुमच्यासारख्या लाचारांनाच असले शब्द सुचू शकतात. महाराष्ट्राच्या शत्रूंची लाचारी करणे म्हणजे अफजलखानाच्या दरबारात मुजरे करण्यासारखे आहे. ज्यांनी तुम्हाला आज ही पदं दिली आहेत तेच तुमचे पदं काढून घेतील आणि तुमच्यातलेच लोक त्या पदावर बसवतील, अशा हालचाली दिल्लीत सुरू असल्याचे देखील त्यांनी म्हटले.  

आणखी वाचा 

Sharad Pawar On Uddhav Thackeray: महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याचे उद्धव ठाकरेंचे संकेत; शरद पवार म्हणाले, दोन दिवसांपूर्वी...

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Karnataka Congress Crisis: डीके शिवकुमार जिद्दीला पेटले, सिद्धरामय्या सुद्धा मागे हटेनात! कर्नाटकमधील खुर्चीच्या लढाईत दोघांमध्ये कोणाची सर्वाधिक ताकद?
डीके शिवकुमार जिद्दीला पेटले, सिद्धरामय्या सुद्धा मागे हटेनात! कर्नाटकमधील खुर्चीच्या लढाईत दोघांमध्ये कोणाची सर्वाधिक ताकद?
Godhra Family Death: आज लेकाचा साखरपुडा, रात्री ग्राऊंड फ्लोअरवर आग लागली; काचेच्या आलिशान बंगल्यात गुदमरून अवघ्या कुटुंबाचा अंत
आज लेकाचा साखरपुडा, रात्री ग्राऊंड फ्लोअरवर आग लागली; काचेच्या आलिशान बंगल्यात गुदमरून अवघ्या कुटुंबाचा अंत
Hasan Mushrif: 'ईडीमधून माझी कोर्टात निर्दोष मुक्तता कधीच झाली आहे' संजय मंडलिकांनी थेट दुखरी नस दाबताच मंत्री हसन मुश्रीफांचा दावा!
Video: 'ईडीमधून माझी कोर्टात निर्दोष मुक्तता कधीच झाली आहे' संजय मंडलिकांनी थेट दुखरी नस दाबताच मंत्री हसन मुश्रीफांचा दावा!
Eknath Shinde: का रे दुरावा? का रे हा अबोला? दिल्ली व्हाया बिहार ते मुंबईपर्यंत! शिंदे भाईंची कळी काही खुलेना, देवाभाऊंशी नेहमीसारखा संवाद दिसेना!
Video: का रे दुरावा? का रे हा अबोला? दिल्ली व्हाया बिहार ते मुंबईपर्यंत! शिंदे भाईंची कळी काही खुलेना, देवाभाऊंशी नेहमीसारखा संवाद दिसेना!
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Jyoti Waghmare on Nashik Malegaon : 3 वर्षाच्या मुलीवर अत्याचार, ज्योती वाघमारे अश्रू अनावर
Shivsena vs BJP Rada : एकनाथ शिंदे-रवींद्र चव्हाणांमध्ये नाराजीनाट्य असतानाच कार्यकर्त्यांचा राडा
Uddhav Thackeray MNS - MVA Alliance : मनसे-मविआसाठी ठाकरे प्रयत्नशील?
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेता लाभ घेतलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांवर होणार कारवाई होणार
Thane BJP vs Shiv Sena Rada : ठाण्यात भाजप नगरसेवकाकडून शिवसैनिकांना मारहाण

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Karnataka Congress Crisis: डीके शिवकुमार जिद्दीला पेटले, सिद्धरामय्या सुद्धा मागे हटेनात! कर्नाटकमधील खुर्चीच्या लढाईत दोघांमध्ये कोणाची सर्वाधिक ताकद?
डीके शिवकुमार जिद्दीला पेटले, सिद्धरामय्या सुद्धा मागे हटेनात! कर्नाटकमधील खुर्चीच्या लढाईत दोघांमध्ये कोणाची सर्वाधिक ताकद?
Godhra Family Death: आज लेकाचा साखरपुडा, रात्री ग्राऊंड फ्लोअरवर आग लागली; काचेच्या आलिशान बंगल्यात गुदमरून अवघ्या कुटुंबाचा अंत
आज लेकाचा साखरपुडा, रात्री ग्राऊंड फ्लोअरवर आग लागली; काचेच्या आलिशान बंगल्यात गुदमरून अवघ्या कुटुंबाचा अंत
Hasan Mushrif: 'ईडीमधून माझी कोर्टात निर्दोष मुक्तता कधीच झाली आहे' संजय मंडलिकांनी थेट दुखरी नस दाबताच मंत्री हसन मुश्रीफांचा दावा!
Video: 'ईडीमधून माझी कोर्टात निर्दोष मुक्तता कधीच झाली आहे' संजय मंडलिकांनी थेट दुखरी नस दाबताच मंत्री हसन मुश्रीफांचा दावा!
Eknath Shinde: का रे दुरावा? का रे हा अबोला? दिल्ली व्हाया बिहार ते मुंबईपर्यंत! शिंदे भाईंची कळी काही खुलेना, देवाभाऊंशी नेहमीसारखा संवाद दिसेना!
Video: का रे दुरावा? का रे हा अबोला? दिल्ली व्हाया बिहार ते मुंबईपर्यंत! शिंदे भाईंची कळी काही खुलेना, देवाभाऊंशी नेहमीसारखा संवाद दिसेना!
Kolhapur News : आठ एकर जमिनीचा वाद, दवाखान्याच्या दारात 85 वर्षीय वयोवृद्ध व्यक्तीला लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण
कोल्हापूर : आठ एकर जमिनीचा वाद, दवाखान्याच्या दारात 85 वर्षीय वयोवृद्ध व्यक्तीला लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण
Kolhapur Municipal Corporation: कोल्हापूर महापालिकेच्या चाव्या लाडक्या बहिणींच्या हाती; प्रभागनिहाय प्रारूप मतदारयादी प्रसिध्द
कोल्हापूर महापालिकेच्या चाव्या लाडक्या बहिणींच्या हाती; प्रभागनिहाय प्रारूप मतदारयादी प्रसिध्द
Weekly Horoscope: मेष, वृषभ राशींच्या नोकरदारांवर वरिष्ठ असतील खूश! आठवड्याच्या सुरुवातीला होणार जबरदस्त धनलाभ, साप्ताहिक राशीभविष्य वाचा 
मेष, वृषभ राशींच्या नोकरदारांवर वरिष्ठ असतील खूश! आठवड्याच्या सुरुवातीला होणार जबरदस्त धनलाभ, साप्ताहिक राशीभविष्य वाचा 
Colours Marathi Serial Baipan Zindabad: 'बाईपण जिंदाबाद!'मधली पुढची कथा साध्या, सरळ 'अनुराधा'ची; स्त्रीप्रधान कथांपेक्षा काहीशी वेगळी
'बाईपण जिंदाबाद!'मधली पुढची कथा साध्या, सरळ 'अनुराधा'ची; स्त्रीप्रधान कथांपेक्षा काहीशी वेगळी
Embed widget