Yoga for Slip Disc : ऑफिसमध्ये बराच वेळ एकाच जागी बसून पाठ आणि मान दुखते? रोज नियमितपणे करा हे आसन
तुम्हाला स्लिप डिस्कची (Slip Disc) समस्या जाणवत असेल तर तुम्ही योगासन करु शकता. रोज योगासने (Yogasan) केल्यास स्लिप डिस्क ही समस्या तुम्हाला जाणवणार नाही.
Yoga for Slip Disc : सध्या अनेकांना स्लिप डिस्कची (Slip Disc) समस्या जाणवते. सुमारे 80 टक्के तरुण स्लिप डिस्क या समस्येचा सामना करत आहेत. स्लिप डिस्कमुळे पाठ आणि मानेमध्ये तीव्र वेदना होतात. ऑफिसमध्ये बराच वेळ एका जागी बसून काम केल्यामुळे ही समस्या अनेकांना जाणवते. अनेक तरुण स्लिप डिस्कच्या समस्येवर उपचार घेण्यासाठी डॉक्टरांकडे जात आहेत. तुम्हाला ही समस्या जाणवत असेल तर तुम्ही योगासन करु शकता. रोज योगासने (Yogasan) केल्यास स्लिप डिस्क ही समस्या तुम्हाला जाणवणार नाही.
भुजंगासन (Cobra Pose)
सूर्य नमस्कारामधील आठवे आसन म्हणजे भुजंगासन. भुजंग म्हणजे साप/ नाग. भुजंगासनाला कोबरा आसन, असेही म्हटले जाते. या आसनामध्ये प्रथम पोटावर झोपून नंतर पाठ वर वाकवावी. यामुळे पाठदुखी कमी होते.
भुजंगासन करण्याची पद्धत
सर्वप्रथम जमीनीवर पालथे झोपा.
हनुवटी छातीला टेकवा
कपाळ जमिनीला टेकवा.
हाताचे पंजे छातीजवळ ठेवा. त्यानंतर हातांच्या पंज्यावर शरीराचा भार देऊन कमरेपपासूनचा भाग वर उचला.
उष्ट्रासन(Camel Pose)
उष्ट्रासन या आसनाला कॅमल पोज असं देखील म्हटलं जातं. उष्ट्रासन करण्यासाठी तुमचे हात मागील बाजूला करुन पायांच्या टाचांना लावावेत.
शलभासन (Locust Pose)
शलभासन हा दोन शब्दांपासून बनलेला आहे. ज्यामध्ये “शलभा” या शब्दाचा अर्थ “टोळ किंवा कीटक” आणि दुसरा शब्द आसन म्हणजे “मुद्रा”, होय.
शवासन (Shavasana)
सर्व आसन केल्यानंतर सर्वात शेवटी शवासन करावे. शवासनामुळे शारिरीक आणि मानसिक थकवा जाणवणार नाही. तसेच मानदुखी आणि पाठदुखीची समस्या देखील शवासनामुळे कमी होते.
शवासन करण्याची पद्धत
- पाठीवर झोपा
- आपले हात आणि पाय बाहेर शरीरापासून दूर पसरवा
- डोळे हळूवारपणे बंद करा.
- शरीराची हालचाल करु नका. कोणताही विचार करु नका. श्वासाकडे लक्ष केंद्रित करा.
तसेच तुम्ही रोज 20 मिनिटे चालणे, सायकल चालणे, डान्स करणे, झुंबा करणे, स्कॉट्स मारणे इत्यादी गोष्टी देखील करु शकता. यामुळे तुम्हाला पाठदुखी आणि मानदुखी या समस्या जाणवणार नाहीत. काम करताना पाच मिनीट ब्रेक घेऊन तुम्ही वॉक घेऊ शकता. त्यामुळे तुम्हाला पाठदुखीची समस्या जाणवणार नाही.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्वाच्या इतर बातम्या :