Health Tips : वारंवार प्रयत्न करूनही झोप येत नाहीये? तुमच्या शरीरात 'या' व्हिटॅमिनची आहे कमतरता; 'अशी' घ्या काळजी
Health Tips : तंदुरुस्त राहण्यासाठी पुरेशी झोप घेणे महत्त्वाचे आहे. अनेक वेळा जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे झोप येत नाही आणि शरीर आजारी पडते.
Health Tips : अनेकदा असं होतं की, वारंवार प्रयत्न करूनही आपल्याला झोप येत नाही. अशा वेळी चांगली झोप (Sleep) लागण्यासाठी आपण अनेक उपायकरतो. पण, तुम्ही कधी विचार केला आहे का की, अनेक प्रयत्नानंतरही रात्रीची झोप का लागत नाही. याचं कारण म्हणजे तुमच्या शरीरात व्हिटॅमिन बी 12 (Vitamin B 12) ची कमतरता आहे. व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेमुळे रात्रीची झोप लागत नाही.
व्हिटॅमिन बी शरीराच्या अनेक कार्यांसाठी जबाबदार आहे. याचे अनेक प्रकार आहेत जसे की, B1, B2, B3, B5, B6, B7, B9 आणि व्हिटॅमिन B12. यापैकी व्हिटॅमिन बी12 तुमच्या झोपेच्या पद्धतीशी निगडीत आहे. शरीरातून जर व्हिटॅमिन बी 12 कमी झाले तर तुम्हाला झोपेच्या समस्या उद्भवू लागतात. या ठिकाणी आपण अशाच काही लक्षणां संदर्भात अधिक माहिती जाणून घेणार आहोत.
जीवनसत्त्वांमुळे निद्रानाश होतो
झोपेच्या विकारांची कारणे शोधण्यासाठी संशोधकांनी NCBI (संदर्भ) वर एक अभ्यास प्रकाशित करण्यात आला होता. या अभ्यासात असे आढळून आले की, ज्या लोकांमध्ये व्हिटॅमिन बी 12 ची पातळी कमी किंवा पूर्णपणे कमी आहे त्यांना निद्रानाशाचा त्रास होऊ शकतो. हे जीवनसत्व झोपेसाठी खूप महत्वाचे आहे आणि सर्कॅडियन लय सुधारते.
अन्न खावेसे वाटत नाही
या पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे भूक मंदावते. मग शरीरात इतर पोषक तत्त्वांचीही कमतरता भासू लागते. हळूहळू स्नायू गळायला लागतात आणि शरीर कोरडे होते. असे लोक खूप लवकर थकतात आणि अशक्त होतात.
मेंदू अॅक्टिव्ह राहत नाही
आपल्या मेंदूची क्षमता कमी होण्यामागे व्हिटॅमिन बी 12 देखील कारणीभूत ठरू शकते. अनेक विकार तुमच्या मानसिक आरोग्यावर आणि स्मरणशक्तीवर परिणाम करू लागतात. व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेमुळे अशा लोकांना अनेकदा दुःख आणि एकटेपणाचा त्रास होऊ शकतो.
व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेची लक्षणं
- जलद हृदयाचे ठोके
- सतत डोकेदुखी
- अंधुक दृष्टी
- अतिसार
- कमी रक्तदाब
- शरीरात सुन्नपणा
- लघवी कमी होणे
व्हिटॅमिन बी12 साठी 'या' गोष्टींचं सेवन करा
- दूध
- चीज
- अंडी
- मासे
- न्यूट्रिशनल यीस्ट
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
महत्त्वाच्या बातम्या :