(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Winter Child Care Tips : हिवाळ्यात नवजात बाळाला आंघोळ घालण्याची योग्य वेळ कोणती? मुलं आजारी पडणार नाहीत
Winter Child Care Tips : वाढत्या थंडीमुळे बाळाला ताप, सर्दी यांसारख्या अनेक आजारांचा सामना करावा लागतो. अशा वेळी बाळाच्या आंघोळीची योग्य वेळ ठरवणं गरजेचं आहे.
Winter Child Care Tips : थंडीचा (Winter Season) जोर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. अनेक देशांत तर तापमान 10 अंश सेल्सिअसच्या खाली गेलं आहे. अशा वेळी ज्यांच्या घरी नवजात बाळ (New Born Baby) जन्माला आलंय त्यांनी तर जास्त काळजी घेणं गरजेचं आहे. कारण, वाढत्या थंडीमुळे बाळाला ताप, सर्दी यांसारख्या अनेक आजारांचा सामना करावा लागतो. अशा वेळी हिवाळ्यात तुमच्या बाळाला आंघोळ घालण्याची योग्य वेळ आणि योग्य पद्धत नेमकी कोणती? या संदर्भात अधिक माहिती सांगणार आहोत.
बाळाच्या आंघोळीची योग्य वेळ कोणती?
हिवाळ्यात, नवजात बाळाला आंघोळ घालायची असेल तर दुपारी 12:00 ची वेळ योग्य आहे. याशिवाय तुम्ही सकाळी 11 ते दुपारी 1 च्या दरम्यान देखील बाळाला आंघोळ घालू शकता. कारण या दरम्यान जास्त ऊन असतं त्यामुळे बाळाला जास्त थंडी लागणार नाही. तसेच, बाळाची आंघोळ झाल्यानंतर त्याला सूर्यप्रकाश दाखवा.
यावेळी बाळाला आंघोळ घालू नका
जर तुमचे बाळ खूप लहान असेल तर बाळाला दूध पाजण्याच्या वेळी तसेच त्यांच्या झोपेच्या वेळी कधीही बाळाला आंघोळ घालू नका. कारण असे केल्याने बाळाची चिडचिड होते आणि तुम्ही त्याला नीट आंघोळ घालू शकणार नाही यासाठी योग्य वेळ पाहूनच त्यांना आंघोळ घाला.
बाळाला आंघोळ घालण्यासाठी योग्य दिनक्रम ठेवा
हे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल पण बाळाच्या दिवसाचा योग्य दिनक्रम तयार करणं फार गरजेचं आहे. कारण काही दिवसांनी बाळाला त्याच रूटीनची सवय लागते. यासाठी बाळाला रोज ठरलेल्या वेळी आंघोळ घाला. जेव्हा दिवसभरात तापमान जास्त असते तेव्हा मुलांना आंघोळ घालण्याचा प्रयत्न करा. बाळाला सकाळी लवकर आणि दुपारी 2:00 नंतर आंघोळ घालू नका.
पाण्याचे तापमान सामान्य ठेवा
हिवाळ्यात बाळाला आंघोळ घालण्यासाठी पाण्याचं तापमान योग्य असणं गरजेचं आहे. आंघोळीचे पाणी हे खूप जास्त गरमही नसावे आणि जास्त थंडही नसावे. बाळाला नेहमी कोमट पाण्याने आंघोळ घालावी तसेच त्यांना आंघोळीनंतर लगेच पुसावे. त्यानंतर कपडे घालून त्यांना थोड्या उबदार ठिकाणी ठेवावे.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
महत्त्वाच्या बातम्या :