एक्स्प्लोर

Health Tips : तुम्हाला पचनाच्या समस्या टाळायच्या असतील तर 'या' 5 प्रकारच्या ज्यूसचा आहारात करा समावेश

तुमची पचनसंस्था कमकुवत असेल तर त्यामुळे अनेक आजार होऊ शकतात. खराब पचनामुळे अन्नाचे पचन नीट होत नाही त्यामुळे शरीराला पोषण मिळत नाही. पचनक्रिया निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात बदल करू शकता.

Digestion Tips : बदलत्या जीवनशैलीमुळे आजकाल पचनाच्या समस्या सामान्य होत आहेत. पचन नीट होणे हे शरीराकरता फार गरजेचे असते. जर ते योग्यरित्या कार्य करत नसेल तर आपण अनेक गंभीर आजारांना बळी पडू शकता. जे काही पदार्थ तुम्ही आहारात घेतात आणि नीट पचत नाहीत, तर त्यामुळे पचनाशी संबंधित अनेक आजार होतात. पचनक्रिया सुरळीत ठेवण्यासाठी खाण्याकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. अशा परिस्थितीत हे काही ज्सुस आहेत जे प्यायल्याने पचनशक्ती वाढते.

डाळिंब ज्युस

डाळिंबात लोह, फॉस्फरस, फायबर, कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, झिंक, व्हिटॅमिन-सी यांसारखे पोषक घटक आढळतात. याचा ज्युस पिला तर पचनक्रिया चांगली राहते. हे आतड्यांच्या आरोग्यास देखील निरोगी ठेवण्यास मदत करते. पचनसंस्था दीर्घकाळ निरोगी ठेवायची असेल तर डाळिंबाच्या ज्युसचा आहारात समावेश करू शकता.

सफरचंद ज्युस

सफरचंदात फायबर पुरेशा प्रमाणात आढळते. त्यामुळे अनेक समस्या दूर होण्यास मदत होते. जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही तुमच्या घरी ताज्या सफरचंदाचा ज्युस देखील बनवू शकता.

बीटरूट ज्युस

बीटरूटमध्ये भरपूर फायबर असते, जे तुमची पचनसंस्था निरोगी ठेवण्यास मदत करते. जर तुम्हाला बद्धकोष्ठतेने त्रास होत असेल तर बीटरूटचा ज्युस या समस्येपासून मुक्त होण्यास मदत करेल. बीटरूटमध्ये बेटेन नावाचे तत्व असते, जे पचनसंस्थेसाठी चांगले असते. बेटेन पोटातील अॅसिडचे प्रमाण वाढवते, ज्यामुळे पचन सुधारते.

काकडी ज्युस

काकडीत अनेक प्रकारचे पौष्टिक घटक आढळतात. त्यात पाण्याचे प्रमाण जास्त असते. हे एक हायड्रेटिंग पेय आहे. त्यात व्हिटॅमिन-ए, व्हिटॅमिन-सी, व्हिटॅमिन-के, सिलिकॉन, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम सारखे पोषक घटक आढळतात. त्यामुळे पचनक्रिया सुधारते. काकडीचा ज्युस बनवण्यासाठी काकडीचे छोटे तुकडे करून ब्लेंडरमध्ये पुदिना, मीठ आणि आले घालून एकत्र करा. हा रस तुम्ही रोज सकाळी नाश्त्यापूर्वी पिऊ शकता.

लिंबाचा ज्युस

लिंबाच्या (Lemon) रसामध्ये असे अनेक गुणधर्म आढळतात, जे तुमच्या शरीरासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहेत. यामध्ये व्हिटॅमिन-सी आणि अँटीऑक्सिडंट्ससारखे पोषक घटक असतात. रोज एक ग्लास कोमट पाण्यात लिंबाचा रस मिसळून प्यायल्यास ते पचनासाठी फायदेशीर ठरते. हे तुमचे लिव्हरही निरोगी ठेवते. हे पेय तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी देखील पिऊ शकता. यामुळे पचनाच्या समस्या दूर होण्यास मदत होईल. याशिवाय हे पेय चविष्ट बनवण्यासाठी थोडेसे मधही मिसळले जाऊ शकते. हे प्यायल्याने वजन कमी होण्यासही मदत होते.

इतर महत्वाच्या बातम्या

Sao Joao Festival : भारतातील एक सण असाही, जो विहरीत उडी मारून करतात साजरा, लोकांची होते गर्दी

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Thane : पतंग उडवण्यासाठी चिनी दोरा किंवा मांजा वापरू नये, ठाणे महापालिकेचे आवाहन
पतंग उडवण्यासाठी चिनी दोरा किंवा मांजा वापरू नये, ठाणे महापालिकेचे आवाहन
Amit Shah Darshan Shani Shingnapur | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले शनि देवाचे दर्शन
Amit Shah Darshan Shani Shingnapur | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले शनि देवाचे दर्शन
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी 
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी
Amit Shah : शरद पवारांकडून दगा-फटक्याचे राजकारण, ठाकरेंचा द्रोह, अमित शाहांचा भाजप महाअधिवेशनात प्रहार; म्हणाले, खरी राष्ट्रवादी अन् शिवसेना...
शरद पवारांकडून दगा-फटक्याचे राजकारण, ठाकरेंचा द्रोह, अमित शाहांचा भाजप महाअधिवेशनात प्रहार; म्हणाले, खरी राष्ट्रवादी अन् शिवसेना...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Supriya Sule Speech Parbhani : पैसै नको लेक द्या, आईचा आक्रोश सांगताना सुप्रिया ताई हळहळल्याAmit Shah Darshan Shani Shingnapur | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले शनि देवाचे दर्शनSantosh Deshmukh Case | आरोपींना जर सोडलं तर माझा खून करतील, मी स्वत: संपवून घेतो- धनंजय देशमुख100 Headlines | 100 हेडलाईन्स बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Thane : पतंग उडवण्यासाठी चिनी दोरा किंवा मांजा वापरू नये, ठाणे महापालिकेचे आवाहन
पतंग उडवण्यासाठी चिनी दोरा किंवा मांजा वापरू नये, ठाणे महापालिकेचे आवाहन
Amit Shah Darshan Shani Shingnapur | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले शनि देवाचे दर्शन
Amit Shah Darshan Shani Shingnapur | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले शनि देवाचे दर्शन
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी 
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी
Amit Shah : शरद पवारांकडून दगा-फटक्याचे राजकारण, ठाकरेंचा द्रोह, अमित शाहांचा भाजप महाअधिवेशनात प्रहार; म्हणाले, खरी राष्ट्रवादी अन् शिवसेना...
शरद पवारांकडून दगा-फटक्याचे राजकारण, ठाकरेंचा द्रोह, अमित शाहांचा भाजप महाअधिवेशनात प्रहार; म्हणाले, खरी राष्ट्रवादी अन् शिवसेना...
Devendra Fadnavis Speech Shirdi | कार्यकर्त्यांमुळं विधानसभेत विजय, पुन्हा ताकदीनं मैदानात उतरा
Devendra Fadnavis Speech Shirdi | कार्यकर्त्यांमुळं विधानसभेत विजय, पुन्हा ताकदीनं मैदानात उतरा
IND vs ENG : ऑस्ट्रेलियात दणका बसूनही बीसीसीआयची गुगली! शमी परतला, विराट अन् रोहितला वेळ मिळाला; पण टीम निवडताच लक्षात न आलेलं 5 मोठे मुद्दे
ऑस्ट्रेलियात दणका बसूनही बीसीसीआयची गुगली! शमी परतला, विराट अन् रोहितला वेळ मिळाला; पण टीम निवडताच लक्षात न आलेले 5 मोठे मुद्दे
भुजबळांचा सल्ला घेण्याची गरज वाटली नाही, कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंनी पुन्हा डिवचलं  
भुजबळांचा सल्ला घेण्याची गरज वाटली नाही, कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंनी पुन्हा डिवचलं  
Superstar Prabhas Wedding Post: प्रभासचं ठरलं? ख्रिश्चन मुलीशी बांधणार लग्नगाठ? अनुष्का शेट्टीच्या नावाचीही चर्चा, कोण होणार बाहुबलीची खऱ्या आयुष्यातली देवसेना?
प्रभासला खऱ्या आयुष्यातली 'देवसेना' भेटली? अनुष्का शेट्टी की, दुसरी कोण?
Embed widget