एक्स्प्लोर
डाळिंबाचे आरोग्यदायी फायदे; 'हे' आजारही पळतील दूर
आरोग्यासाठी डाळिंब अत्यंत फायदेशीर ठरतं. तसेच शरीराच्या अनेक समस्या दूर करण्यासाठीही मदत करतं.

MOSCOW, RUSSIA - OCTOBER 20, 2018: Pomegranates at Autumn Gifts of Azerbaijan, a festival of Azerbaijani products, in Tverskaya Square. Mikhail Tereshchenko/TASS (Photo by Mikhail TereshchenkoTASS via Getty Images)
मुंबई : आपल्या शरीराचं कार्य सुरळीत चालण्यासाठी अनेक पोषक तत्वांची आवश्यकता असते. ही सर्व पोषक तत्व आपल्याला आहारातून मिळतात. त्यामुळे आहारात पोषक पदार्थांचा समावेश करणं अत्यंत आवश्यक असतं. अशातच डाळिंब आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतं. यामध्ये अॅन्टीऑक्सिडंट, फायबर, व्हिटॅमिन्स, खनिज आणि फ्लेवोनोइड यांसारखी शरीराला आवश्यक असणारी पोषक तत्व असतात. शरीराच्या अनेक समस्या तसेच विविध आजारांवरही डाळिंबाचा ज्यूस गुणकारी ठरतो. तसेच डाळिंबाचा ज्यूस व्हिटॅमिन्सचा एक उत्तम स्त्रोतही आहे.
डाळिंबाच्या ज्यूसमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ईसोबतच फोलिक अॅसिडही असतं. ब्लड प्रेशर, पचनाच्या समस्या तसेच इतर आजारांनी पीडित असणाऱ्या व्यक्तींसाठी डाळिंबाचा ज्यूस अत्यंत फायदेशीर असतो. डाळिंबाच्या ज्यूसचे दररोज सेवन केल्याने हिमोग्लोबिनची पातळी नियंत्रणात राखण्यास मदत होते. जाणून घेऊया डाळिंबाच्या ज्यूसच्या आरोग्यदायी फायद्यांबाबत...
लो ब्लड प्रेशर
अनेक संशोधनांतून सिद्ध झाल्यानुसार, डाळिंबाच्या ज्यूसचं सेवन केल्याने लो ब्लड प्रेशरची समस्या दूर करण्यास मदत मिळते. डाळिंबाच्या रसाच्या सेवनाने सिस्टोलिक आणि डायस्टोलिक दोन्ही प्रकारचे लो ब्लड प्रेशर कमी करण्यासाठी मदत करतो.
वजन कमी करण्यासाठी फायदेशीर
जर तुम्ही वजन कमी करण्यासाठी डाएट फॉलो करण्याचा विचार करत असाल तर डाळिंबाचा ज्यूस तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. डाळिंबामध्ये फायबर मुबलक प्रमाणात असतं आणि याच्या सेवनाने बराच वेळ पोट भरल्याप्रमाणे वाटते.
व्हिटॅमिन सी
दररोज शरीराला आवश्यक असणाऱ्या व्हिटॅमिन सीपेक्षा 40 टक्क्यांनी जास्त व्हिटॅमिन सी असतं. उच्च रक्तदाब आणि इतर हृदय रोगांपासून लढण्यासाठी व्हिटॅमिन सी अत्यंत आवश्यक असतं.
शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढवतं
डाळिंबामध्ये अॅन्टीइंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. डाळिंबाचा ज्यूस शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी मदत करतो. तसेच आजारांपासून दूर ठेवण्यासाठीही मदत करतो.
टिप : वरील सर्व उपाय घरगुती असून ABP माझा यातून कोणताही दावा करत नाही. त्यामुळे सदर उपायाचा तज्ज्ञांच्या सल्ल्याने वापर करणे फायदेशीर ठरते.
संबंधित बातम्या :
हृदयाचं आरोग्य चांगलं राखण्यासाठी दररोज ब्रश करणं ठरतं फायदेशीर; संशोधनातून खुलासा
शरीरातील आयर्नची कमतरता दूर करण्यासाठी खा 'हे' सुपरफूड्स
ऑफिसमध्ये कामाची शिफ्ट सतत बदलतेय?; होऊ शकतात 'हे' आजार
कमी वयातच केस पांढरे?; जाणून घ्या कारणं आणि उपाय!
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
करमणूक
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
