(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Health Tips : हिवाळ्यात बद्धकोष्ठता आणि आंबट ढेकरपासून सुटका हवीय? 'हे' घरगुती उपाय एकदा करून पाहाच...
Health Tips : जर तुम्हाला रात्रीच्या वेळी आंबट ढेकर येण्याच्या समस्येचा सामना करावा लागत असेल तर लिंबू पाणी आणि दही अजिबात खाऊ नका.
Health Tips : आंबट ढेकर येणं म्हणजे पोट बिघडणं. जेव्हा एखादी व्यक्ती जास्त खाते किंवा वेगाने जेवते तेव्हा त्यांना आंबट ढेकर येण्यास सुरुवात होते. काही लोक आंबट ढेकर येण्याची तक्रार करतात. आंबट ढेकर देखील अपचनामुळे होतात. अपचन, धूम्रपान, तणाव, कोल्ड ड्रिंक्स, मद्यपान केल्याने आंबट ढेकर येणे, पोटात आणि छातीत जळजळ होणे, उलट्या होणे, पोट फुगणे, घसा दुखणे यांसारख्या अनेक समस्या होतात. अशा परिस्थितीत वेळेवर उपचार करणे खूप महत्वाचे आहे. हिवाळ्यात आंबट ढेकर आणि बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून कशी सुटका मिळवू शकता या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.
आंबट ढेकर आणि बद्धकोष्ठता पासून आराम कसा मिळवाल?
लिंबूपाणी (Lemon Water)
जर तुम्हाला सकाळी उठल्याबरोबर आंबट ढेकर येणे किंवा बद्धकोष्ठतेची समस्या असेल तर लगेच एक ग्लास पाण्यात लिंबू टाकून प्या. तुम्ही त्यात चिमूटभर मीठही घालू शकता. यामुळे तुमच्या पोटाला त्वरित आराम मिळेल.
बडीशेप आणि साखर
जर तुम्हाला रात्रीच्या वेळी आंबट ढेकर येण्याच्या समस्येचा सामना करावा लागत असेल तर लिंबू पाणी आणि दही अजिबात खाऊ नका. यामुळे तुमच्या समस्या खूप वाढू शकतात. रात्रीच्या वेळी तीव्र ढेकर येत असल्यास, तुम्ही साखर आणि बडीशेप एकत्र खाऊ शकता. यामुळे तुम्हाला तात्काळ आराम मिळेल. बडीशेप पचनसंस्थेसाठी चांगली असते. यामुळे अॅसिडिटी आणि गॅसच्या समस्येपासून आराम मिळतो. साखर खाल्ल्याने पोट थंड राहते.
काळे मीठ (Black Salt)
काळे मीठ खाल्ल्याने पचनक्रिया चांगली राहते. आंबट ढेकर येत असल्यास काळे मीठ आणि जिरे एकत्र करून खाल्ल्यास त्वरित आराम मिळतो. जर तुम्हाला वारंवार आंबट ढेकर येण्याची समस्या होत असेल तर 100 ग्रॅम जिरे एका तव्यावर नीट तळून घ्या आणि चांगले बारीक करा. नंतर एक ग्लास पाणी घ्या आणि त्यात एकत्र मिक्स करा. हे पाणी प्यायल्याने त्वरित आराम मिळेल.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्त्वाच्या बातम्या :
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )