HEALTH : भारतात स्वाइन फ्लूचा हैदोस; जाणून घ्या लक्षणं आणि उपाय
वैद्यकिय भाषेतील एच1एन1 व्हायरस इनफ्लुएंजाचा संबंध डुक्करांमुळे होतो. त्यामुळे या व्हायरसमुळे होणाऱ्या आजाराला स्वाइन फ्लू असं म्हटलं जातं. डुक्करांमुळे हा व्हायरस माणसांपर्यंत पोहोचतो. मुख्यत्वे हा आजार शेतकरी आणि प्राण्यांच्या डॉक्टरांपासून सामान्य माणसांपर्यंत पोहोचतो.
नवी दिल्ली : जगभरात कोरोना व्हारसने धुमाकूळ घातला असतानाच भारतात मात्र एच1एन1 व्हायरसने हैदोस घातला आहे. एच1एन1 व्हायरसलाच स्वाईन फ्लू म्हणून ओळखलं जातं. या आजारापासून बचाव करण्यासाठी वेळीच सावध होऊन काही गोष्टींची काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. जाणून घेऊया या आजाराची लक्षणं आणि बचाव करण्यासाठीचे काही उपाय...
वैद्यकिय भाषेतील एच1एन1 व्हायरस इनफ्लुएंजाचा संबंध डुक्करांमुळे होतो. त्यामुळे या व्हायरसमुळे होणाऱ्या आजाराला स्वाइन फ्लू असं म्हटलं जातं. डुक्करांमुळे हा व्हायरस माणसांपर्यंत पोहोचतो. मुख्यत्वे हा आजार शेतकरी आणि प्राण्यांच्या डॉक्टरांपासून सामान्य माणसांपर्यंत पोहोचतो. हा संसर्गजन्य आजार असून एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत सहज पसरतो.
पाहा व्हिडीओ : मोहरीच्या तेलाचे आरोग्यदायी फायदे, बहुगुणी मोहरी अनेक आजारांवर लाभदायक फायदे
स्वाइन फ्लूची लक्षणं
स्वाइन फ्ल्यू झालेल्या व्यक्तींमध्ये दिसून येणारी लक्षणं इतर संसर्गजन्य आजारांसारखीचं असतात. स्वाइन फ्लूची लागण झालेल्या व्यक्तीला ताप येतो. परंतु, ताप अंगात न राहता, सतत येतो आणि जातो. याव्यतिरिक्त रूग्णाच्या घशात खवखव होते. सर्दी-खोकला येतो. स्नायूंमध्ये वेदना आणि डोकेदुखीची समस्या उद्भवते. थंडी वाजते, तसेच पोटदुखी आणि उलटी यांसारख्या समस्याही होतात. या लक्षणांकडे वेळीच लक्ष दिलं नाहीतर आजार आणखी वाढतो. तसेच स्वाईन फ्लूची लागण झालेल्या व्यक्तीच्या रक्तात ऑक्सिजनची कमतरता जाणवणं, मानसिक अस्थिरता, शरीरात पाण्याची कमतरता जाणवणं यांसारखी लक्षणंही दिसून येतात.
स्वाइन फ्लू रोखण्याचे उपाय
आजार रोखण्यासाठी डॉक्टर वार्षिक फ्लू लसीकरणाचा सल्ला देतात. लसीकरण इंजेक्शन आणि नाकाचा स्प्रे यांमार्फत देण्यात येते. परंतु, गर्भवती महिलांनी स्प्रेचा वापर करू नये. स्वाइन फ्लूची लागण झालेल्या व्यक्तीने गर्दीच्या ठिकाणी जाणं शक्यतो टाळावं. ताप उतरल्यानंतर कमीत कमी 24 तासांपर्यंत घरीच राहावं. तसेच वेळोवेळी हात स्वच्छ धुवावे. खोकला, शिंका आल्यानंतर तोंडावर आणि नाकावर रूमाल ठेवावा. तसेच फेस मास्कचा वापर करावा.
संबंधित बातम्या :
Corona virus | कोरोना व्हायरसवर औषध सापडलं; थायलंडमधील डॉक्टरांचा दावा Health Tips : ब्लड प्रेशरची समस्या दूर करण्यासाठी 'हे' उपाय करतील मदत Health Tips : हिवाळ्यात आइस्क्रिम खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहीत आहेत का? वजन कमी करायचंय?; दररोज करा आवळ्याच्या ज्यूसचं सेवन, होतील फायदेच फायदे डायबिटीजचे रूग्णही खाऊ शकतात गोड पदार्थ?; जाणून घ्या काय म्हणतो रिसर्च 'ही' लक्षणं दिसली तर वेळीच सावध व्हा; लिव्हर खराब होण्याचे असू शकतात संकेत