एक्स्प्लोर

'ही' लक्षणं दिसली तर वेळीच सावध व्हा; लिव्हर खराब होण्याचे असू शकतात संकेत

लिव्हर शरीरातील विषारी घटक पित्ताच्या स्वरूपात फिल्टर करण्याचं काम करतं आणि मल किंवा मूत्र स्वरूपात शरीरातून बाहेर टाकले जातात.

मुंबई : शरीराचं कार्य सुरळीत व्हावं यासाठी अनेक अवयव महत्त्वाची भूमिका बजावतात. अशातच लिव्हर शरीराचा एक महत्त्वपूर्ण भाग असून त्याला यकृत असंही म्हटलं जातं. जर लिव्हरचं आरोग्य बिघडलं तर मृत्यू होण्याचाही धोका संभवतो. लिव्हरचं काम पचनक्रियेशी निगडीतही असतं. लिव्हरचं वजन 1.3 ते 1.6 किलोग्राम एवढं असतं. लिव्हर शरीरातील विषारी घटक पित्ताच्या स्वरूपात फिल्टर करण्याचं काम करतं आणि मल किंवा मूत्र स्वरूपात शरीरातून बाहेर टाकले जातात. लिव्हर शरीरामध्ये जवळपास 300 पेक्षा अधिक कामं करतं. लिव्हर रक्तामध्ये साखरेचं प्रमाण नियंत्रणात करण्याचं काम करतो. लिव्हरचं एक कार्य शरीरात रक्त तयार करणं हेदेखील आहे. या लक्षणांकडे दुर्लक्षं करू नका त्वचेचा रंग पिवळा होणं लिव्हरचं काम बिघडतं तेव्हा याचा परिणाम त्वचेवर दिसून येतो. तसेच डोळ्यांमध्येही पिवळेपणा वाढतो. त्वचेचा रंग पिवळा पडणं, लघवीचा रंग पिवळा होणं यांसारखी लक्षणं दिसून आली तर वेळीच सावध व्हा. उलटीमधून रक्त पडणं जेव्हा सतत मळमळ होणं किंवा उलट्या येणं यांसारख्या समस्या वाढतात. त्यावेळी लिव्हरची समस्या असण्याती शक्यता असते. तसेच उलटी करताना त्यातून रक्त पडलं तर त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. तज्ज्ञांचा सल्ला घ्या. हाता पायांना सूज येणं लिव्हरचं आरोग्य बिघडतं त्यावेळी पोटाच्या खालच्या बाजूला सूज जाणवू लागते. तसेच हाता-पायांनाही सूज येते. जर तुम्हालाही ही समस्या जाणवत असेल तर दुर्लक्ष न करता डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक असतं. थकवा जाणवणं अनेकदा आपल्याला थकवा येत असेल तर हेदेखील लिव्हर खराब होण्याचे संकेत असू शकतात. थकवा येण्याची इतरही कारण असू शकतात. त्यामुळे योग्य कारण ओळखण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या. जेवण बेचव लागत असेल तर जेवणाची इच्छा होत नसेल किंवा चव लागत नसेल तर ही गंभीर समस्या असू शकते. तसेच तोंडातून दुर्गंधी येत असेल तर हेदेखील लिव्हर खराब होण्याचं लक्षण असू शकतं. टीप : वरील सर्व गोष्टी केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. ABP यातून कोणताही दावा करत नाही. 
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

चंद्रपूरमध्ये कार आणि ऑटोचा भीषण अपघात, 2 महिलांचा जागीच मृत्यू तर 15 जण जखमी 

धक्कादायक! भाजपच्या माजी आमदाराचा विद्यमान आमदाराच्या कार्यालयावर गोळीबार; 3 जखमी, फोटो व्हायरल

एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद घेण्यास तयार नव्हते, पण..; मंत्री गुलाबराव पाटलांचा गौप्यस्फोट

अनधिकृतपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींची धरपकड सुरूच; मिरा-भाईंदर पोलिसांकडून पुन्हा कारवाई
अनधिकृतपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींची धरपकड सुरूच; मिरा-भाईंदर पोलिसांकडून पुन्हा कारवाई
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 26 January 2025Ajit Pawar Leader Batting | उपमुख्यमंत्र्यांच्या निकटवर्तीयाची पुण्यात दादागिरी, राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकाचा मारहाणीचा व्हिडिओMumbai Coastal Road | कोस्टलमुळे बीएमसी विजयाचा प्रवास सोपा होणार? Special Report Rajkiy SholeNarhari Zirwal Naraj | झिरवाळांचं पालकमंत्रिपदावरून आधी रडगाणं, नंतर सारवासारव Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
चंद्रपूरमध्ये कार आणि ऑटोचा भीषण अपघात, 2 महिलांचा जागीच मृत्यू तर 15 जण जखमी 
चंद्रपूरमध्ये कार आणि ऑटोचा भीषण अपघात, 2 महिलांचा जागीच मृत्यू तर 15 जण जखमी 
धक्कादायक! भाजपच्या माजी आमदाराचा विद्यमान आमदाराच्या कार्यालयावर गोळीबार; 3 जखमी, फोटो व्हायरल
धक्कादायक! भाजपच्या माजी आमदाराचा विद्यमान आमदाराच्या कार्यालयावर गोळीबार; 3 जखमी, फोटो व्हायरल
एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद घेण्यास तयार नव्हते, पण..; मंत्री गुलाबराव पाटलांचा गौप्यस्फोट
एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद घेण्यास तयार नव्हते, पण..; मंत्री गुलाबराव पाटलांचा गौप्यस्फोट
अनधिकृतपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींची धरपकड सुरूच; मिरा-भाईंदर पोलिसांकडून पुन्हा कारवाई
अनधिकृतपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींची धरपकड सुरूच; मिरा-भाईंदर पोलिसांकडून पुन्हा कारवाई
पुण्यात 1 रुपयात ड्रेस, ऑफर अंगलट आल्याने दुकान बंद करण्याची वेळ; महिलांची गर्दी अन् पोलिसांचा हस्तक्षेप

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 जानेवारी 2025 | रविवार

Video: काळ आला होता पण वेळ आली नव्हती; 3 ऱ्या मजल्यावरुन पडूनही चिमुकला वाचला, देवदूत धावला

GBS रोगामुळे मृ्त्यू पावलेल्या रुग्णाचा पोस्टमॉर्टम अहवाल आला; डॉक्टरांच्या रिपोर्टमधून खुलासा झाला

Embed widget