एक्स्प्लोर

Good Diet For Sleep : खाण्यापिण्याच्या 'या' सवयींमुळे तुमची झोप होऊ शकते खराब, वाचा सविस्तर

शारिरीक आणि मानसिक आरोग्यासाठी चांगली झोप खूप गरजेची असते. अभ्यासानुसार खाण्यापिण्याच्या सवयी जर योग्य नसतील तर याचा परिणाम झोपेवर होऊ शकतो.

Sleep Quality : पुरेशी झोप (Sleep) घेणे ही प्रत्येकाच्या आरोग्यासाठी महत्त्वाची ठरते. शरीराला आवश्यक तेवढी झोप नियमीत घेणे गरजेचे आहे. चांगल्या झोपेमुळे आपले शारिरीक आणि मानसिक आरोग्य उत्तम राहते. संपूर्ण  7-8 तासांची झोपमुळे अनेक आजार दूर होण्यास मदत होते. झोपेवर नुकत्याच झालेल्या एका अभ्यासात असे समोर आले आहे की काही खाद्यपदार्थ आपले झोपेचे रूटिन बिघडवतात. संशोधकांना असे आढळून आले की चांगले अन्न आणि खराब अन्न आपल्या झोपेच्या गुणवत्तेवर परिणाम करते. म्हणूनच नेहमी चांगल्या अन्नाचे सेवन केले पाहीजे. 

खराब आहारामुळे झोपेवर होऊ शकतो  परिणाम

जर्नल ओबेसिटीमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनात सामान्य वजनाच्या 15 निरोगी तरुणांना एकत्रित केले गेले. या निरोगी तरूणांना वेगवेगळ्या प्रकारचे अन्न दिले गेले. यानंतर त्यांच्या झोपण्याच्या सवयी तपासण्यात आल्या. एका आहारात मोठ्या प्रमाणात साखर , फॅट्स आणि जंक फूड या पदार्थांचा समावेश होता तर दुसऱ्या आहारात सर्व सकस आणि आरोग्यास फायदेशीर असणाऱ्या पदार्थांचा समावेश करण्यात आला होता. देण्यात आलेल्या दोन्ही आहारात कॅलरींचे प्रमाण समान होते. प्रत्येक आहारानंतर सहभागी झालेल्या तरूणांच्या झोपेची क्लिनिकल चाचणी केली गेली. झोपेच्या वेळी त्यांच्या मेंदूच्या होणाऱ्या एक्टिविटीजचे निरीक्षण केले गेले. यानंतर या सर्व 15  तरुणांना रात्रभर जागे ठेवण्यात आले.  यानंतर त्यांची झोप चाचणी करण्यात आली. 

खराब आहारामुळे बिघडते झोप

चाचणी केलेल्या लोकांच्या झोपेच्या गुणवत्तेत लक्षणीय फरक आढळून आला. जंक फूड (Junk Food) खाणाऱ्यांची गाढ झोप हेल्दी डाएट करणाऱ्यांच्या झोपे इतकी चांगली नव्हती. यावरून असे दिसून आले की झोपेच्या गुणवत्तेवर अन्नाचा परिणाम होतो. या संशोधनात असे आढळून आले की आहार आणि झोपेची गुणवत्ता यांचा संबंध आहे. जंक फूड खाल्ल्यानंतर झोप कमी होऊ शकते. आहारात सुधारणा करून तुम्ही झोप सुधारू शकता.

चांगल्या झोपेसाठी फाॅलो करा या टिप्स

चांगला आहार

चांगला आणि पोषक आहार झोपेची गुणवत्ता सुधारण्यास मदत करू शकतो. त्यामुळे रोजच्या आहारात शरीराला आवश्यक असतील तेवढे प्रोटीन , व्हिटामीन , लोह इत्यादींचा समावेश करावा. रात्रीच्या वेळी
चहा , काॅफी पिणे टाळावे.

नियमीत व्यायाम

नियमीत योगा केल्यास चांगली झोप येते. रोज व्यायाम केल्यास मानसिक स्वास्थ्य चांगले राहण्यास मदत होते.

'या' पदार्थांच्या सेवनाने सुधारेल झोपेची गुणवत्ता

काही पदार्थ झोप सुधारण्यास मदत करतात. किवी , आक्रोड (Walnut) , बदाम , गरम दूध या पदार्थांचा समावेश रोजच्या आहारात करा.

इतर महत्वाच्या बातम्या

Consumption Of Alcohol : सावधान ! दारूचे अतिसेवन ठरू शकते तुमच्या मेंदूला घातक; जाणून घ्या

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 10 PM 26 Sept 2024ABP Majha Headlines : 10 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स9 Second News : 9 सेकंदात बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट न्यूज : 26 Sept 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 09 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
PM Modi Death Threat: मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
Embed widget