Omega-3 In Diet : तुम्हाला हदय निरोगी ठेवायचं असेल तर आहारात ओमेगा-3 चा समावेश नक्की करा. याचे फायदे जाणून घ्या...
Omega-3 In Food : तुम्हाला हदय निरोगी ठेवायचं असेल तर आहारात ओमेगा-3 चा समावेश नक्की करा. याचे फायदे जाणून घ्या...
Omega-3 For Heart : आजकालच्या व्यस्त जीवनात अनेक वेळा आपण आरोग्याकडे (Health) दुर्लक्ष करतो. याचा परिणाम लगेच जाणवत नाही, मात्र कालांतराने आपल्याला विविध आजारांचा त्रासाला सामोरं जावं लागतं. तणावपूर्ण जीवनशैलीमुळे (Busy Lifestyle) वेगवेगळ्या आजारांचा धोका संभवतो. सध्या तर हदयविकाराचं प्रमाण वाढलं आहे. धक्कादायक म्हणजे हदयविकाराचं आणि वयाचा काही एक संबंध नाही. आजकाल तर तरुण वयातही अनेकांना हदयविकाराचा झटका येतो. अशा वेळी तुम्ही हदयाचं आरोग्य जपण्याकडे लक्ष द्यायला हवं. यासाठी व्यायाम आणि पौष्टिक आहाराचा तुम्हाला फायदा होईल. हदय निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही आहारात ओमेगा-3 (Omega-3) चा समावेश नक्की करा. यामुळे अनेक फायदे मिळतील. ते कोणते ते जाणून घ्या.
'हे' पदार्थ आहेत ओमेगा-3 उत्तम स्रोत (Omega-3 Rich Food)
अक्रोड (Walnut)
सुक्या मेव्यामध्ये ओमेगा- 3 (Omega-3) फॅटी ॲसिड मुबलक प्रमाणात आढळते. यापैकी, अक्रोड हे ओमेगा -3 फॅटी ऍसिडचा सर्वोत्तम स्त्रोत मानला जातो. तुम्ही अक्रोड कधीही खाऊ शकता.
अंडी (Egg)
अंड्यांमध्येही ओमेगा-3 फॅटी ॲसिडही पुरेशा प्रमाणात आढळते. दररोज अंडी खाल्ल्याने शरीराला ऊर्जा मिळते आणि अनेक महत्त्वाची पौष्टिक तत्त्वेही पूर्ण होतात.
आळशी (Flaxseeds)
आळशी (Flaxseeds) म्हणजेच फ्लेक्ससीड्समध्ये ओमेगा-3 फॅटी ॲसिड भरपूर प्रमाणात असते. तुम्ही जवसाचे लाडू, नॅचरल बिया बारीक करून पावडर बनवू शकता किंवा दुधासोबत सेवन करू शकता.
सोयाबीन (Soyabean)
ओमेगा- 3 (Omega-3) आणि ओमेगा- 6 (Omega-6) ची कमतरता दूर करण्यासाठी सोयाबीन (Soyabean) हा उत्तम उपाय आहे. सोयाबीनमध्ये हाय प्रोटीन, फॉलेट, मॅग्नेशियम, पोटॅशिअम, फायबर आणि अनेक व्हिटॅमिन असतात.
हिरव्या भाज्या (Vegetables)
शाकाहारी व्यक्ती हिरव्या भाज्या खाऊन ओमेगा- 3 (Omega-3) ची कमतरता दूक करु शकतात. हिरव्या भाज्यांमध्ये व्हिटॅमन आणि मिनरल्स असतात, हे तुमच्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असतात.
गायीचं दुध (Milk)
गाईच्या दुधातही ओमेगा - 3 फॅटी ॲसिड आढळते. याशिवाय गायीचे दुधात व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियम आढळते, हे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर मानलं जातं.
ब्लूबेरी (Blueberry)
ओमेगा -3 च्या नैसर्गिक स्त्रोतामध्ये ब्लूबेरीचे सेवन करणे देखील फायदेशीर मानले जाते. त्यात खूप कमी कॅलरीज असतात आणि अँटिऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात आढळतात. ब्लूबेरीमध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स हृदयविकाराचा धोका कमी करण्यास मदत करतात.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्वाच्या बातम्या :
- Health Tips : मधुमेहाच्या रूग्णांसाठी किवी फळ गुणकारी; अनेक समस्यांवर आहे रामबाण उपाय
- Diabetes Care Tips : घराच्या घरी व्यायाम करा अन् मधुमेहावर नियंत्रण मिळवा! जाणून घ्या मधुमेहींसाठी मान्सून फिटनेस टिप्स
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )