Health Tips : 'ही' लक्षणे लहान मुलांमध्ये दिसल्यास तो मधुमेह असू शकतो; लगेच तपासणी करा
Health Tips : मुलांमध्ये मधुमेह हा आजार आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, मधुमेहाची समस्या बिघडलेली जीवनशैलीमुळे होतो.
Health Tips : मधुमेह (Diabetes) हा एक आजार आहे जो कोणत्याही वयात होऊ शकतो. हा आजार बिघडलेली जीवनशैली, खाण्याच्या चुकीच्या सवयी, लठ्ठपणा इत्यादींमुळे होऊ शकतो. काही वेळा हा आजार आनुवंशिक कारणांमुळेही होतो. जर एखाद्या पालकाला हा आजार असेल तर अनेक वेळा मुलालाही या समस्येचा सामना करावा लागतो. आजकाल मुलांमध्येही ही समस्या मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे, त्यामुळे पालकांनी मुलांची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. मधुमेह टाळण्यासाठी, तुमच्या मुलाला खाण्यापिण्याबाबत निरोगी जीवनशैलीचे पालन करायला लावा. आज या ठिकाणी आम्ही तुम्हाला अशाच काही लक्षणांबद्दल सांगणार आहोत, ज्यांना वेळीच ओळखणे अत्यंत आवश्यक आहे.
अचानक वजन कमी होणे
लहान मूल जेव्हा खेळायला लागते तेव्हा त्याचे वजन कमी होणे सामान्य गोष्ट असते. पण, जर मुलाचे वजन अचानक कमी झाले तर ती चिंतेची बाब ठरू शकते, कारण अचानक वजन कमी होणे हे मधुमेहाचे एक लक्षण आहे.
वारंवार मूत्रविसर्जन
अनेक वेळा मूल वारंवार लघवी करू लागते. जर मूल नेहमीपेक्षा जास्त लघवी करत असेल तर ते देखील मधुमेहाचे लक्षण असू शकते. त्यामुळे पालकांनी सावध राहण्याची गरज आहे.
खूप तहान लागली आहे
अनेक वेळा मूल न खेळता किंवा घाम न गाळता जास्त पाणी पिऊ लागते. खरंतर, हे देखील मधुमेहाचे कारण असू शकते. रक्तातील साखरेचे प्रमाण जास्त असल्याने तहान जास्त लागते.
खूप भूक लागणे
खेळण्यापेक्षा जास्त भूक लागणे ही वेगळी गोष्ट आहे, पण शरीरात रक्तातील साखर वाढली तर मुलाला जास्त भूक लागते. खाल्ल्यानंतरही भूक लागल्याची तक्रार जर मुलाला होत असेल, तर तुमच्या बाळाला मधुमेहाचा त्रास असण्याची शक्यता आहे.
त्यामुळे तुमच्या मुलामध्ये देखील मधुमेहाची ही लक्षणं असतील तर वेळीच सावध राहण्याची गरज आहे. तसेच, मुलांना या आजारापासून दूर राहण्यासाठी तुमच्या मुलांमध्ये वरील काही लक्षणं दिसत असल्यास मुलांना त्यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करा.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
महत्त्वाच्या बातम्या :