Skin Care Tips : चेहऱ्यावरच्या ऑईली स्किनने हैराण आहात? मुलतानी मातीचा स्पेशल फेस पॅक आहे रामबाण उपाय; जाणून घ्या कसा बनवायचा
Skin Care Tips : जेव्हा आपण घराबाहेर पडतो तेव्हा चेहऱ्यावर घाण आणि प्रदूषणाचे डाग राहतात, त्यामुळे चेहरा निर्जीव आणि निस्तेज दिसू लागतो.
Skin Care Tips : आपला चेहरा हा प्रत्येकासाठी फार महत्त्वाचा असतो. चेहरा सुंदर, तजेलदार दिसावा यासाठी प्रत्येकजण वेगवेगळे प्रोडक्ट्स वापरतात. तसेच, धूळ, माती, प्रदूषण आणि सूर्याच्या हानिकारक किरणांचा सर्वाधिक संपर्क केवळ चेहऱ्यावर होतो यामुळे चेहऱ्याची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. अशा परिस्थितीत तुम्हाला चेहऱ्यावरची टॅनिंग घालवायची असेल तर तुम्ही घरच्या घरी सुद्धा ते करू शकता. तुमच्या चेहऱ्यावर साचलेली ही तेलयुक्त घाण साफ करण्यासाठी तुम्ही घरच्या घरी एक नैसर्गिक फेस पॅक बनवू शकता ज्यामुळे चेहऱ्याच्या त्वचेचे पोषण होईल आणि कोणतेही दुष्परिणाम होणार नाहीत. या नैसर्गिक फेस पॅकच्या मदतीने तुमच्या चेहऱ्यावर जमा झालेले तेल तर साफ होईलच पण तुमची त्वचा ग्लो होण्याबरोबरच सॉफ्ट आणि तरूणही दिसेल.
अनेकजण चेहऱ्यासाठी वेगवेगळे प्रोडक्ट्स वापरतात. अशा वेळी मुलतानी मातीचा हा घरगुती फेसपॅक तुमच्यासाठी नक्कीच उपयोगी ठरणार आहे. मात्र, ज्यांची त्वचा अति सेन्सिटिव्ह आहे. त्यांनी मात्र, डॉक्टरांच्या सल्ल्यानेच उपचार करावेत.
नैसर्गिक फेस पॅक बनवण्यासाठी काय आवश्यक आहे?
नैसर्गिक फेस पॅकसाठी लागणारे साहित्य
- मुलतानी माती पावडर - 2 चमचे
- कडुलिंबाच्या पानांची पावडर - दोन चमचे
- शुद्ध चंदन पावडर - एक चमचा
- थोडे गुलाब पाणी
नैसर्गिक फेस पॅक कसा बनवायचा?
मुलतानी मातीचा हा फेसपॅक बनविण्यासाठी तुम्ही एक काचेची वाटी घ्या. त्यात मुलतानी माती पावडर घाला. आता त्याच भांड्यात चंदन पावडर आणि कडुलिंबाच्या पानांची पावडर मिक्स करा. त्यात गुलाब पाणी टाका आणि बारीक पेस्ट तयार होईपर्यंत नीट मिश्रण तयार करा. हा फेसपॅक आठवड्यातून दोनदा चेहऱ्यावर लावल्याने चेहऱ्यावर जमा झालेले सेबम आणि अतिरिक्त तेल साफ होईल आणि तुमच्या चेहऱ्यावरील त्वचा चमकू लागेल. ब्रशच्या साहाय्याने तुम्ही हा फेसपॅक तुमच्या चेहऱ्यावर लावू शकता. साधारण 15 मिनिटांनंतर तुमची त्वचा सुकल्यानंतर स्वच्छ पाण्याने चेहरा धुवा. यानंतर तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर मॉइश्चरायझर वापरू शकता. काही दिवस हा फॅसपॅक आठवड्यातून दोनदा चेहऱ्यावर लावल्याने तुम्हाला काही दिवसांतच फरक जाणवेल.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
महत्त्वाच्या बातम्या :