Health Update : झोप पूर्ण न होण्याचं हे धक्कादायक कारण ऐकून 'झोप' उडेल!
झोप न लागण्याचे फक्त मानसिक तणाव हे एकमेव कारण नाही. यामागे आणखी एक कारण असल्याचं अभ्यासातून स्पष्ट झालं आहे.

नवी दिल्ली : अनेकांना निद्रानाशेचा त्रास असतो. हल्ली कामाची बदलती शैली, त्यामुळं वाढणारा मानसिक तणाव यामुळं रात्री झोप लागत नाही ही तक्रार अनेकांची असते. यासाठी अनेकजण वैद्यकीय उपचार देखील घेत असतात. मात्र झोप न लागण्याचे फक्त मानसिक तणाव हे एकमेव कारण नाही. एका अभ्यासानुसार, रात्री झोप न लागण्याला हवा प्रदूषणही कारणीभूत असल्याचे समोर आले आहे. आश्चर्य वाटेल, पण एका अभ्यासाअंती हे सिद्ध झाले आहे.
मानसिक तणाव हे झोपमोड होण्याला मुख्य कारण असल्याचं मानलं जायचं. मात्र, हवा प्रदूषणही झोपमोड होण्याला कारण असल्याचे एका अभ्यासातून समोर आले आहे.आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांना हवा प्रदूषण हे एक कारण आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) माहितीनुसार, जर प्रदूषणाची पातळी कमी झाली, तर हृदयाचे विकार, फुफ्फुसाचे आजार, श्वसनसंस्थेशी निगडीत आजार, अस्थमा यांसारखे आजार कमी होण्यास मदत होते. संशोधकांनीही झोपमोड होण्याला हवा प्रदूषण कारणीभूत असल्याचे सांगितले आहे.
नायट्रोजन डायऑक्साईडच्या संपर्कात अधिक आल्याने आणि पीएम लेव्हल 2.5 राहिल्यास झोपमोड होण्याची शक्यता असते. संशोधनानुसार, ट्राफिकमधून होणारा हवा प्रदूषण नायट्रोजन डायऑक्साईड (NO2) नावाने ओळखला जातो. यामुळे झोप कमी होते. म्हणजेच रात्री उशिरा झोप लागते, तर सकाळी लवकर जाग येते. वॉशिंग्टन यूनिव्हर्सिटीचे असिस्टंट प्रोफेसर मार्थ ई. बिलिंग्स यांच्या म्हणण्यानुसार, संशोधनंही या गोष्टीकडे लक्ष वेधतात की, हवा प्रदूषणामुळे केवळ हृदय आणि फुफ्फुसावरच परिणाम होत नाही, तर झोपेवरही परिणाम होतो.
हवा प्रदूषणामुळे नाकाच्या वरील बाजूस परिणाम होतो. त्याचसोबत, सेंट्रल नर्व्हस सिस्टम, ब्रेन एरिया, जिथून श्वास आणि झोप यांच्यावर नियंत्रण ठेवलं जातं, त्यावरही परिणाम होतो.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्वाच्या बातम्या :
- Health Care: प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी 'व्हिटॅमिन सी' आहे आवश्यक, जाणून घ्या आरोग्यदायी फायदे
- Health Tips : चुकूनही केळी आणि पपई एकत्र खाऊ नका, तब्येतीवर होऊ शकतात 'हे' गंभीर परिणाम
- Belly fat : पोटावरची चरबी कमी करायचीय? मग, ‘या’ दोन फळांपासून नेहमी दूर राहा!
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
