Skin Care Tips : त्वचेचं तारुण्य टिकवायचंय? 'हे' घरगुती उपाय करतील मदत
पार्लरमधील काही प्रोडक्ट्स तुमच्या त्वचेला खराब करू शकतात.

Skin Care Tips: प्रदुषणामुळे अनेकांची त्वचा खराब होते. बाहेर फिरताना कायम चेहरा स्कार्फने कव्हर केला पाहिजे. अनेकांची त्वचा ही सेन्सिटिव्ह असते. त्वचेचे सामान्य, कोरडी आणि सेन्सिटिव्ह असे त्वचेचे तीन प्रकार आहेत. रोज 6 ग्लास पाणी प्यायल्याने तुमच्या त्वचेवर तेज येण्यास मदत होईल. अनेक लोक त्वचा चांगली राहण्यासाठी पार्लरमध्ये जाऊन वेगवेगळे फेशियल्स करतात. पण पार्लरमधील काही प्रोडक्ट्स तुमच्या त्वचेला खराब करू शकतात. त्या प्रोडक्समुळे स्किनवर रॅश येऊ शकते. त्यामुळे घरच्या घरी जर स्किनची काळजी घ्यायची असेल तर या गोष्टी नक्की ट्राय करा.
कच्चा पपई घ्या. त्याचा तुकडा 20 सेकंद तोंडावर फिरवा. पपईमध्ये नॅचरल एंझाइम असतात. जे चेहऱ्यावरील टॅन कमी करतात. तसेच चॉकलेटचा फेस पॅक देखील तुम्ही त्वचेवर लावू शकता.
चेहऱ्यावर बर्फ लावा
चेहऱ्यावर असणारे फोड किंवा डाग कमी करण्यासाठी चेहऱ्यावर बर्फ लावा. चेहऱ्यावर असणारे पोर्स बर्फ लावल्यामुळे उघडतात. त्यामुळे त्वचेवर ग्लो येतो.
कोरफड-
एक चमचा कोरफडचे ज्यूस घ्या त्यामध्ये टी-ट्री ऑयलचे दोन थेंब टाका. हे दोन्ही मिक्स करून चेहऱ्यावर लावा आणि 10 मिनीट झाल्यानंतर चेहरा धुवा. अनेक प्रकारचे त्वचा विकार आणि रक्त विकार कमी होण्यास कोरफडीमुळे मदत होते.
गुलाब पाणी
गुलाब पाणी चेहऱ्याला लावल्याने चेहरा स्वच्छल होतो. तसेच चंदन पावडरमध्ये गुलाब पाणी मिक्स करून चेहऱ्याला लावावे.
तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या स्क्रबचा वापर करावा. त्यामुळे चेहऱ्यावर असणारी डेड स्किन निघून जाते.
Aditi Rao Hydari : नियमित योगा, डान्स अन् हेल्दी डाएट; अदिती राव हैदरीचा फिटनेस फंडा
तसेच हळद दुधामध्ये मिक्स करून देखील तुम्ही चेहऱ्यावर फेस पॅक म्हणून लावू शकता.
टिप- वरील माहितीची पुष्टी एबीपी माझा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधे हे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घ्यावेत.
Kiara Advani Fitness Routine: परफेक्ट फिगर अन् हेल्दी स्किन; कियारा अडवाणीच्या फिटनेसचं 'हे' गुपित
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
