काय म्हणता? कच्ची केळी खाण्याचे जबरदस्त फायदे...
Health Benefits Of Raw Banana: आपल्याला दररोज केळी खाण्याचे अनेक फायदे माहित आहेत. मात्र कच्ची केळी खाण्याचे काय फायदे आहेत, हे अनेकांना कदाचित माहित नसावं.
Health Benefits Of Raw Banana: आपल्याला दररोज केळी खाण्याचे अनेक फायदे माहित आहेत. मात्र कच्ची केळी खाण्याचे काय फायदे आहेत, हे अनेकांना कदाचित माहित नसावं. ही कच्ची केळी आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. कच्च्या केळांमध्ये पोटॅशियमचा खजाना असतो. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती आणखी सक्षम करण्यासोबतच दिवसभर उत्साह टिकून राहण्यास मदत मिळते.
कच्ची केळी खाण्याचे फायदे
1) वजन घटवण्यास मदत-
वजन घटवण्याचा आटोकाट प्रयत्न करणारे केळी खाणं टाळतात. मात्र कच्ची खेळी खाल्ल्यामुळे वजन घटवण्यास मदत होते. कच्चं केळ हा तंतूमय पदार्थांचा महत्त्वाचा स्त्रोत आहे. ज्यामुळे अनावश्यक फॅट आणि शरीरातील अशुद्धी स्वच्छ होण्यास मदत मिळते.
2) बद्धकोष्ठतेपासून मुक्ती-
कच्च्या केळात फायबर आणि आरोग्यदायी स्टार्च असतं. त्यामुळे आतड्यांमध्ये काहीही न अडकू देता, ते स्वच्छ ठेवण्यास मदत होते. त्यामुळे जर तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास असेल तर रोज कच्चं केळ खाणं फायदेशीर ठरू शकतं.
3) भूख नियंत्रित करते -
कच्च्या केळामुळे भूख नियंत्रित करणं, शांत करण्यास मदत मिळते. वेळी-अवेळी भूक लागत नाही. त्याचा अप्रत्यक्ष परिणाम म्हणजे जंक फूड किंवा फास्ट फूडकडे आपण वळत नाही.
4) मधुमेहावर नियंत्रण
मधुमेहाचा त्रास असणाऱ्या रुग्णांनाही कच्ची केळी फायदेशीर ठरू शकते. मधुमेह प्राथमिक स्तरावर असेल, तर कच्ची केळी खाणं सुरु करा. मधुमेहावर नियंत्रण मिळवण्यास मदत होऊ शकते.
5) पचनक्रिया सुधारते
कच्च्या केळ्याच्या नियमित सेवनाने पचनक्रिया सुधारते. शरीरातील मलनि:सारण प्रक्रिया नीट होते. याशिवाय कच्च्या तेलामुळे हाडं मजबूत बनण्यासही मदत होते.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
इतर बातम्या :
- Winter Skin Care : हिवाळ्यात तजेलदार त्वचा हवीय? करा 'या' नैसर्गिक तेलांचा वापर
- Kim Jong Un : किंम जोंग उनने गाठला निर्घृणतेचा कळस; दक्षिण कोरियन व्हिडीओ पाहिल्यामुळे सात जणांना मृत्यूदंड
- Trending : तीन वर्षांपूवी झाडासोबत लग्न, आडनावही बदललं, आता नवा बॉयफ्रेंड
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )