Winter Skin Care : हिवाळ्यात तजेलदार त्वचा हवीय? करा 'या' नैसर्गिक तेलांचा वापर
Winter Skin Care : हिवाळ्यात तुम्ही नैसर्गिक तेलांचा वापर करुन त्वचेच्या काळजी घेऊ शकता. येथे आम्ही तुम्हांला सांगणार आहोत की तुम्ही तुमच्या दैनंदिनीमध्ये कोणते तेल समाविष्ट करू शकता. चला जाणून घेऊया.
Winter Skin Care Tips : हिवाळ्यात (Winter Season) चमकदार (Glowing Skin) आणि निरोगी त्वचेसाठी लोक अनेक महागड्या सौंदर्य उत्पादनांचा (Beauty Products) वापर करतात. पण तरीही चांगले परिणाम दिसून येत नाहीत. तर, अनेक महिला हिवाळ्यात नैसर्गिक तेल वापरतात. तजेलदार त्वचेसाठी हा घरगुती उत्तम घरगुती उपाय आहे. आपण हिवाळ्यात काही नैसर्गिक तेल देखील त्वचेच्या काळजीचा एक भाग बनवू शकता. हे तेल तुमच्या त्वचेचा पोत सुधारण्यास मदत करते. कोणते तेल तुमच्या त्वचेसाठी फायदेशीर आहेत जाणून घ्या.
ऑलिव्ह ऑईल (Olive Oil) : हिवाळ्यात त्वचा कोरडी तर होतेच, पण या ऋतूत टॅनिंगही होते. वास्तविक, थंडीपासून वाचण्यासाठी बहुतेक लोक उन्हात वेळ घालवतात, अशा स्थितीत त्वचेचा टॅन होते. या समस्येवर उपाय म्हणूनऑलिव्ह ऑइलचा वापर केला जाऊ शकतो. यासाठी ऑलिव्ह ऑईलचे 4 ते 5 थेंब घ्या आणि चेहऱ्यावर लावून मसाज करा आणि रात्रभर राहू द्या. यानंतर सकाळी उठून फेसवॉशने चेहरा धुवा.
बदाम तेल (Almond Oil) : डोळ्याखाली काळ्या वर्तुळ (Dark Circle) तसेच सुरकुत्या दूर करण्यासाठी बदामाचे तेल खूप फायदेशीर आहे. त्वचेच्या निगा राखण्यासाठी बदामाचे तेल अनेक प्रकारे वापरले जाते. जर तुम्ही चेहर्यावर लावत असाल तर प्रथम रात्री चेहरा पूर्णपणे धुवा आणि नंतर बदामाचे तेल हलके कोमट करा आणि तळहातावर घ्या आणि हलक्या हातांनी चेहऱ्याची मालिश करा. काही तासांनंतर, ब्लॉटिंग पेपरच्या मदतीने पुसून टाका आणि सकाळी फेसवॉशने धुवा.
जोजोबा तेल (Jojoba Oil) : जोजोबा तेल त्वचेला पोषण देते तसेच त्वचेशी संबंधित अनेक समस्या दूर ठेवण्यास मदत करते. यामध्ये व्हिटॅमिन ई, बी, अँटीऑक्सिडेंट आणि खनिजे असतात. हे मुरुमे आणि डाग दूर करण्यास खूप फायदेशीर आहे.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
इतर बातम्या :
- Hair Care Tips : हिवाळ्यात कशी घ्याल केसांची काळजी; वापरा 'हे' हेअर मास्क
- Weight Loss Juice Recipe : झटपट वजन कमी करायचंय? काकडी-कोथिंबीरीचा ज्यूस ठरतो फायदेशीर
- Merry Christmas 2021 : 'हॅपी ख्रिसमस' ऐवजी का म्हणतात 'मेरी ख्रिसमस'? 'हे' आहे कारण
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha