(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Hartalika 2024 Wishes : 'शिव व्हावे प्रसन्न, पार्वतीने द्यावे सौभाग्यदान..!' हरतालिका तृतीयाला 'हे' सुंदर शुभेच्छा संदेश तुमच्या प्रियजनांना पाठवा
Hartalika 2024 Wishes In Marathi : हरतालिका तृतीयेच्या निमित्ताने तुम्ही तुमच्या प्रियजनांना संदेश आणि कोट्सद्वारे शुभेच्छा देऊ शकता. पाहा काही निवडक शुभेच्छा संदेश
Hartalika 2024 Wishes In Marathi : हरितालिका तृतीया हा सण आज आहे. महिलांसाठी हा सण अत्यंत महत्त्वाचा समजला जातो, धार्मिक मान्यतेनुसार, भगवान शंकराला प्राप्त करण्यासाठी देवी पार्वतीने हे व्रत केले होते. या व्रतामुळेच त्यांना भगवान शंकरासारखा भोळा पती मिळाला, अशी आख्यायिका सांगितली जाते. हे व्रत विवाहित महिलांव्यतिरिक्त अविवाहित मुली देखील करतात. या विशेष प्रसंगी, काही लोक त्यांच्या प्रियजनांना अभिनंदन संदेश देतात. (Hartalika Wishes In Marathi)
महिलांकडून अखंड सौभाग्याची कामना..!
हरितालिका तृतीयेच्या दिवशी भगवान शंकर आणि देवी पार्वतीची पूजा केली जाते. एवढेच नाही तर अखंड सौभाग्याची कामना करून विवाहित महिला या दिवशी निर्जला व्रत करतात. असे मानले जाते की, हे व्रत केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात. विवाहित महिलांमध्ये हरतालिकेचे खूप महत्त्व आहे. चांगला पती मिळावा म्हणून कुमारीका हरतालिकेचे व्रत करतात. दरवर्षी गणेशोत्सवाच्या आधी हरतालिका येते. याला हिंदीमध्ये तिज असे देखील म्हणतात. तर आपण याला ‘हरताळका’ असे संबोधतो. दरवर्षी भाद्रपद शुद्ध तृतीयेला हरताळका येते. हरताळकेचे हे व्रत करण्याची प्रत्येकाची पद्धत आणि हरतालिका पूजा मराठी ही वेगवेगळी आहे. हरतालिका तृतीयेच्या निमित्ताने तुम्ही तुमच्या प्रियजनांना संदेश आणि कोट्सद्वारे शुभेच्छा देऊ शकता. येथे आम्ही तुमच्यासाठी असे शुभेच्छा संदेश आणले आहेत, जे तुम्ही तुमच्या प्रियजनांना पाठवू शकता.
आई पार्वती आणि शंकर देवाचा आशीर्वाद
सुख, शांती, समृद्धी, ख़ुशी आणि चांगले स्वास्थ्य
तुमच्या जीवनात येवो,
अशी देवा जवळ प्रार्थना.
हरतालिका तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा!
माता उमाला मिळाला जसा शिव वर
तुम्हालाही मिळो मनाजोगता वर
करिती व्रत सवाष्ण वा कन्या
उपवर अक्षय राहो
सौभाग्य द्यावा असा वर,
हरतालिकेच्या शुभेच्छा!
हरतालिका हा सण,
स्त्रियांचा आपल्या पती बद्दल प्रेम
आणि त्याग दर्शविणारा आहे.
आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होवो
भगवान शिवप्रमाणे एक शक्तिशाली,
प्रेमळ पती लाभो हि आमची सदिच्छा.
हरतालिकाच्या हार्दिक शुभेच्छा.
हरतालिकेचे व्रत करुन
तुमच्या आयुष्यात येवो आनंदी आनंद
हरतालिकेच्या शुभेच्छा!
शिव व्हावे प्रसन्न, पार्वतीने द्यावे सौभाग्यदान
हरितालिका तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा!
हरतालिकेचा हा सण..
तुमच्या जीवनात नवचैतन्य आणो,
तुमच्या पती आणि परिवारचे सुकल्याण होवो
तुमच्या शरीर आणि आत्म्याला शुद्ध करो
अशी देवी हरतालिकेला प्रार्थना.
हरतालिकाच्या हार्दिक शुभेच्छा!
आला रे आला हरतालिकेचा सण आला,
करुन पूजा हरतालिकेची मनोभावे,
शंकरासारखा मला पती मिळावा,
हरतालिकेच्या शुभेच्छा!
देवी पार्वती आणि भगवान शिवशंकर
यांची आपल्यावर कायम कृपादृष्टी राहू दे!
आपल्याला हरतालिकेच्या खूप-खूप शुभेच्छा
तिच्या मनी असे एक आशा, होऊ नये तिची निराशा
सर्व इच्छांची पूर्ती होवो,
समृद्धी घेऊन आली हरतालिका,
हरतालिका तृतीयेच्या शुभेच्छा!
संकल्प शक्तीचे प्रतीक,
अखंड सौभाग्याची प्रार्थना,
हरतालिका सणानिमित्त पूर्ण होवो!
हरतालिका सण हा आला सौभाग्याचा,
पार्वतीप्रमाणे आयुष्यात येवो भगवान शंकर सगळ्यांच्या,
हरतालिकेच्या शुभेच्छा
संकल्प शक्तीचे प्रतीक
अखंड सौभाग्याची प्रार्थना
हरितालिका सणानिमित्त पूर्ण
होवो तुमच्या मनोकामना
हरितालिकेच्या भावपूर्वक शुभेच्छा!
प्रेमाचे, त्यागाचे आणि सौभाग्याचे,
हरतालिकेचे व्रत हरतालिकेच्या शुभेच्छा!
हेही वाचा>>>
Hartalika 2024: हरतालिकेचा निर्जळ उपवास करताय? आरोग्याच्या समस्या येऊ शकतात, 'या' गोष्टी लक्षात ठेवा
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )