एक्स्प्लोर

Hartalika 2024: हरतालिकेचा निर्जळ उपवास करताय? आरोग्याच्या समस्या येऊ शकतात, 'या' गोष्टी लक्षात ठेवा

Hartalika 2024:  हरतालिकेच्या दिवशी काही महिला अन्नपाण्याचे सेवन करत नाहीत. निर्जळ व्रत केल्याने आरोग्याशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. 'या' गोष्टी लक्षात ठेवा.

Hartalika 2024: गणेशोत्सवानिमित्त (Ganeshotsav 2024) सर्वत्र बाप्पाच्या आगमनाची जय्यत तयारी सुरू आहे, पण त्यापूर्वी गणेश चतुर्थीच्या (Ganesh Chaturthi 2024) एक दिवस आधी हरतालिका तृतीया (Hartalika Tritiya) साजरी केली जाते. हरतालिकेच्या व्रताला हिंदू धर्मात विशेष स्थान आहे. या दिवशी स्त्रिया त्यांच्या पतीला दीर्घ आयुष्य, त्यांचे आनंदी आयुष्य आणि आरोग्यासाठी निर्जळ उपवास करतात. हिंदू दिनदर्शिकेनुसार भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीया तिथीला हरतालिका उपवास केला जातो. वर्ष 2024 मध्ये ही तारीख 6 सप्टेंबरला येत आहे. हरतालिका तृतीया साजरी करण्यामागे पौराणिक आख्यायिका अशी आहे की, भगवान शंकरासाठी देवी पार्वतीने सर्वात आधी हरतालिकेचं व्रत केलं होतं. हरतालिका दोन शब्द एकत्र येऊन तयार झालेला शब्द आहे. एक हरत आणि दुसरं आलिका. यामध्ये हरत चा अर्थ होतो अपहरण आणि आलिका चा अर्थ होतो मैत्रीण. हे दोन शब्द एकत्र येऊन हरतालिका हा शब्द तयार झाला आहे.

आरोग्याशी संबंधित समस्या उद्भवू शकतात

हरतालिका तृतीया हा सण भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तिसऱ्या दिवशी साजरा केला जातो. हरतालिका तृतीयेला देवी पार्वती, भगवान शिव आणि त्यांच्या कुटुंबाची पूजा केली जाते. या काळात महिला निर्जळी उपवास करतात. हे व्रत करवा चौथ आणि छठ पूजेइतकेच कठीण आहे. हरतालिकेच्या दिवशी काही महिला अन्नासोबत पाण्याचे सेवन करत नाहीत. निर्जळ व्रत केल्याने आरोग्याशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. अशात महिलांनी हरतालिका तीजच्या मुहूर्तावर पाण्याशिवाय उपवास करण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात, जेणेकरुन सणाच्या काळात त्यांना आरोग्याशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागू नये.

दही किंवा नारळ पाणी पिऊन उपवास करा

उपवास करण्यापूर्वी दही खावे किंवा नारळ पाणी प्यावे. नारळ पाणी शरीरातील पाण्याची कमतरता पूर्ण करते आणि दही खाल्ल्याने जास्त तहान लागत नाही. पाण्याशिवाय उपवास करण्यापूर्वी दही किंवा नारळपाणी सेवन केल्याने उपवासात तहान कमी होते.

सूर्यप्रकाश टाळा

दमट उष्णतेमुळे आणि सूर्यप्रकाशामुळे शरीराचे डिहायड्रेशन होऊ लागते आणि खूप तहान लागते. उपवास करताना तुम्ही तुमची तहान नियंत्रणात ठेवता, पण शरीराला पाण्याची गरज भासते, ती पूर्ण न केल्यास चक्कर येणे, डोकेदुखी यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. हे टाळण्यासाठी, सूर्यप्रकाश आणि उष्णता टाळण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुम्हाला जास्त तहान लागणार नाही आणि तुमच्या शरीराला कमी घाम येतो आणि पाण्याची गरज कमी जाणवते.

शारीरिक हालचाली कमी करा

शारीरिक हालचालींमुळे थकवा जाणवतो. थकवा कमी करण्यासाठी शरीर पाणी मागते. जर तुम्ही उपवासात पाणी पिऊ शकत नसाल तर शारीरिक हालचाली कमी करा. खूप कष्टाचे किंवा थकवणारे काम करू नका. विश्रांती घ्या जेणेकरुन तुमचे शरीर उत्साही राहील आणि तुम्हाला कमी तहान लागेल.

आंघोळ करा

उपवास करताना तहान लागली असेल, गरम आणि थकवा जाणवत असेल तर तुम्ही कोमट पाण्याने आंघोळ करू शकता. आंघोळ केल्याने शरीराला थंडावा लागतो आणि तहान कमी लागते.

भगवान शंकरासाठी देवी पार्वतीने केलं होतं व्रत

हरतालिकेची एक पौराणिक कथा आहे. यानुसार, पार्वतीच्या मैत्रिणी तिचं अपहरण करून तिला जंगलात घेऊन गेली होती. पार्वतीच्या इच्छेव्यतिरिक्त भगवान विष्णुने तिच्याशी विवाह करू नये म्हणून तिच्या मैत्रिणी तिला जंगलात घेऊन जातात. तिथे देवी पार्वतीने भगवान शंकराची आराधना केली आणि भाद्रपद शुल्क तृतीयेच्या दिवशी मातीचं शिवलिंग तयार करून त्याची पुजा केली. पार्वतीच्या तपस्येने प्रसन्न होऊन भगवान शंकराने देवी पार्वतीचा पत्नी म्हणून स्वीकार केला.

हेही वाचा>>>

Ganesh Chaturthi 2024 : बंधु येईल माहेरी न्यायला...गौरी गणपतीच्या सणाला.. गणेशोत्सवासाठी माहेरी जाताय? 'या' पारंपारिक पोशाखात दिसाल सुंदर

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Haryana Election : हरियाणात पुतण्याचा काकांना धक्का, मनोहरलाल खट्टर यांच्या भावाचा मुलगा रमित खट्टर काँग्रेसमध्ये दाखल
हरियाणामध्ये काँग्रेसमध्ये जोरदार इनकमिंग,मनोहरलाल खट्टर यांचा पुतण्या रमित खट्टर यांचा मोठा निर्णय, भाजपला धक्का 
Pune Politics: महायुतीत पिंपरीच्या जागेवरून तिढा? बारणेंच्या दावा, बनसोडेंचं उत्तर, ही जागा राष्ट्रवादीला मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करत म्हणाले...
महायुतीत पिंपरीच्या जागेवरून तिढा? बारणेंच्या दावा, बनसोडेंचं उत्तर, ही जागा राष्ट्रवादीला मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करत म्हणाले...
मोठी बातमी : नाशिकमधील भाजपच्या माजी नगरसेवकाला जीवे मारण्याची धमकी, ठाकरे गटाच्या सुधाकर बडगुजरांवर गंभीर आरोप
मोठी बातमी : नाशिकमधील भाजपच्या माजी नगरसेवकाला जीवे मारण्याची धमकी, ठाकरे गटाच्या सुधाकर बडगुजरांवर गंभीर आरोप
IPS Shivdeep Lande Resigns : बिहारच्या सिंघमचा तडकाफडकी राजीनामा, पण फक्त सहा शब्दांनी बिहारपासून महाराष्ट्रापर्यंत भूवया उंचावल्या!
बिहारच्या सिंघमचा तडकाफडकी राजीनामा, पण फक्त सहा शब्दांनी बिहारपासून महाराष्ट्रापर्यंत भूवया उंचावल्या!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 04 PM 19 September 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 04 PM : 19 September 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSalim Khan Threat : लॉरेन्स बिश्नोई को भेजू क्या? सलमान खानच्या वडिलांना भर रस्त्यात धमकी!Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 03 PM : 19 September 2024: ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Haryana Election : हरियाणात पुतण्याचा काकांना धक्का, मनोहरलाल खट्टर यांच्या भावाचा मुलगा रमित खट्टर काँग्रेसमध्ये दाखल
हरियाणामध्ये काँग्रेसमध्ये जोरदार इनकमिंग,मनोहरलाल खट्टर यांचा पुतण्या रमित खट्टर यांचा मोठा निर्णय, भाजपला धक्का 
Pune Politics: महायुतीत पिंपरीच्या जागेवरून तिढा? बारणेंच्या दावा, बनसोडेंचं उत्तर, ही जागा राष्ट्रवादीला मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करत म्हणाले...
महायुतीत पिंपरीच्या जागेवरून तिढा? बारणेंच्या दावा, बनसोडेंचं उत्तर, ही जागा राष्ट्रवादीला मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करत म्हणाले...
मोठी बातमी : नाशिकमधील भाजपच्या माजी नगरसेवकाला जीवे मारण्याची धमकी, ठाकरे गटाच्या सुधाकर बडगुजरांवर गंभीर आरोप
मोठी बातमी : नाशिकमधील भाजपच्या माजी नगरसेवकाला जीवे मारण्याची धमकी, ठाकरे गटाच्या सुधाकर बडगुजरांवर गंभीर आरोप
IPS Shivdeep Lande Resigns : बिहारच्या सिंघमचा तडकाफडकी राजीनामा, पण फक्त सहा शब्दांनी बिहारपासून महाराष्ट्रापर्यंत भूवया उंचावल्या!
बिहारच्या सिंघमचा तडकाफडकी राजीनामा, पण फक्त सहा शब्दांनी बिहारपासून महाराष्ट्रापर्यंत भूवया उंचावल्या!
Ajit Pawar FaceBook Hack : अजित पवारांचे फेसबुक पेज हॅक?  शिवाजीराव गर्जेंनी दिली खरी माहिती, नेमकं काय घडलं?
अजित पवारांचे फेसबुक पेज हॅक? शिवाजीराव गर्जेंनी दिली खरी माहिती, नेमकं काय घडलं?
दुसऱ्याच्या घरात डोकावून पाहू नये, एकनाथ खडसेंचा खोचक टोला, आता रुपाली चाकणकरांचंही चोख प्रत्युत्तर; म्हणाल्या...
दुसऱ्याच्या घरात डोकावून पाहू नये, एकनाथ खडसेंचा खोचक टोला, आता रुपाली चाकणकरांचंही चोख प्रत्युत्तर; म्हणाल्या...
Maharashtra Politics : पितृ पंधरवड्यातही राजकीय पक्षांच्या बैठकांना जोर, मोदींच्या कार्यक्रमासह अनेक कार्यक्रमांची जंत्री
पितृ पंधरवड्यातही राजकीय पक्षांच्या बैठकांना जोर, मोदींच्या कार्यक्रमासह अनेक कार्यक्रमांची जंत्री
'जरांगेंना बिग बॉसमध्ये घ्या' ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंचा जरांगेंना टोला, म्हणाले, 'या माणसाच्या सांगण्यावरून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री..'
'जरांगेंना बिग बॉसमध्ये घ्या' ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंचा जरांगेंना टोला, म्हणाले, 'या माणसाच्या सांगण्यावरून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री..'
Embed widget