Hair Care Tips : दिवसातून एकदाही केसांना कंगवा न करण्याचे तोटे माहीत आहेत का? जाणून घ्या दिवसातून किती वेळा केस विंचरावेत
Hair Care Tips : दिवसातून एकदाही केसांना कंगवा न केल्याने केसांचे नुकसान होऊ शकते.
Hair Care Tips : प्रत्येकाला सुंदर आणि घट्ट केस हवे असतात. पण यासाठी केसांची निगा (Hair Care Tips) राखणेही खूप गरजेचे आहे. जर तुम्हाला तुमचे केस मजबूत, घट्ट आणि निरोगी ठेवायचे असतील तर फक्त शॅम्पू आणि कंडिशनर वापरून चालणार नाही. केसांशी संबंधित प्रत्येक छोट्या-छोट्या गोष्टींकडे लक्ष देणे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे. यासाठी केसांना रोज कंगवा देखील करणे गरजेचे आहे. दिवसातून एकदाही केसांना कंगवा न केल्याने केसांचे नुकसान होऊ शकते. चला तर जाणून घेऊयात केसांचं सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी दिवसातून किती वेळा केसांना कंगवा करावा.
जाणून घ्या दिवसातून किती वेळा केसांना कंगवा करावा?
केस निरोगी आणि चांगले ठेवण्यासाठी केसांना कंगवा करणे आवश्यक आहे. कंगवा केल्याने केसांमध्ये रक्ताभिसरण वाढते, केस मजबूत होतात आणि केसांत गुंता होत नाही. त्यामुळे केसांची शाईनही वाढते. अनेकदा दिवसातून किती वेळा केसांना कंगवा करावा, हा एक सामान्य प्रश्न महिलांना, मुलींना पडतो. केस निरोगी ठेवण्यासाठी, दिवसातून किमान दोनदा केसांना कंगवा करणे आवश्यक आहे. सकाळी उठल्यावर एकदा आणि रात्री झोपण्यापूर्वी एकदा कंगवा करावा. याशिवाय केसांच्या लांबी आणि गरजेनुसार तुम्ही दिवसाच्या इतर वेळीही कंगवा करू शकता. लांब केस सहज एकमेकांत गुंततात, त्यामुळे केसांतील गुंता टाळण्यासाठी दिवसातून किमान 3 वेळा कंगवा करावा. यामुळे केस तुटत नाहीत आणि कमजोरही होत नाहीत.
केसांना कंगवा करण्याचे फायदे
- केसांना कंगवा केल्याने गुंता दूर होतो आणि केस सुंदर दिसतात.
- हे केसांमध्ये रक्ताभिसरण वाढवते ज्यामुळे केसांची मुळे मजबूत होतात.
- कंगवा केल्याने केसांची मृत त्वचा निघून जाते आणि नवीन केस येण्याचा मार्ग मोकळा होतो.
- हे केस चमकदार आणि मजबूत बनवतात.
- कंगवा केल्याने केसांमध्ये साचलेली धूळ आणि इतर घाण निघून जाते.
- हे टाळू स्वच्छ करते आणि जंतूपासून संरक्षण करते.
- नियमित कंगवा केल्याने केस गळती कमी होते आणि केस लवकर वाढतात.
- कंगवा केल्याने केसांना चांगला व्हॉल्यूम मिळतो आणि केस जाड दिसतात.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
महत्त्वाच्या बातम्या :
Health Tips : सर्दी आणि घसादुखीचा खूप त्रास होतोय? वेळीच वाफ घ्या अनेक आजारांवर आहे रामबाण उपाय