Health Tips : सर्दी आणि घसादुखीचा खूप त्रास होतोय? वेळीच वाफ घ्या अनेक आजारांवर आहे रामबाण उपाय
Health Tips : हवामानातील सौम्य बदल सर्वात आधी कमकुवत प्रतिकारशक्ती असलेल्या लोकांना जाणवतात.
Health Tips : हवामानातील सौम्य बदल सर्वात आधी कमकुवत प्रतिकारशक्ती असलेल्या लोकांना जाणवतात. याची सुरुवात सर्दी आणि घसादुखीपासून होते. ज्यासाठी लोक कधीकधी औषधे घेणं टाळतात, परंतु कधीकधी या लक्षणांकडे दुर्लक्ष तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक देखील असू शकते. घसा खवखवण्याबरोबरच डोकेदुखी आणि अंगदुखी देखील होऊ शकते. त्यामुळे जर तुम्हाला या हंगामी समस्यांमुळे अनेकदा त्रास होत असेल आणि तुम्हाला औषधांशिवाय त्यावर उपचार करायचे असतील, तर यासाठी वाफ घेणे खूप प्रभावी ठरू शकते. ही खरंतर फार जुनी आणि प्रभावी उपचार पद्धत आहे. याच्या मदतीने तुमची सर्दी लगेच बरी होऊ शकते आणि घसादुखीपासूनही आराम मिळतो.
या समस्यांमध्ये वाफ घेणे फायदेशीर आहे
1. घसा खवखवणे बंद होतो
वाफ घेतल्याने घशातील खवखव दूर होतो. वाफ घेतल्याने घशाच्या स्नायूंना आराम मिळतो आणि सूजही दूर होते. वाफ घेतल्याने रक्तवाहिन्यांचे आकुंचन दूर होते, ज्यामुळे रक्ताभिसरण वाढते आणि तुम्हाला आराम मिळतो.
2. श्वास घेण्यास त्रास होत नाही
गरम पाण्याची वाफ घेतल्याने नाक बंद होते. तसेच, घसा आणि फुफ्फुसात जमा झालेला श्लेष्मा सैल होऊ लागतो आणि सहज बाहेर पडतो. त्यामुळे श्वास घेण्याचा त्रास दूर होतो.
3. चांगल्या झोपेतही हे गुणकारी आहे
सर्दी आणि घसा खवखवणे याशिवाय वाफ घेतल्याने झोपेतील अडथळे दूर होतात. जेव्हा तुमचा श्वसनमार्ग साफ होतो. तेव्हा नाक बंद होण्याची समस्या देखील दूर होते आणि तुम्हाला शांत झोपदेखील लागते. स्टीम थेरपी मनाला तसेच शरीराला आराम देण्याचे काम करते.
कोणताही संसर्गजन्य आजार जसे की, सर्दी, खोकला, घशात खवखव जाणवणे यांसारख्या समस्या जर तुम्हाला होत असतील तर अशा वेळी वाफ घेणं हा तुमच्यासाठी एक चांगला आणि प्रभावी मार्ग ठरू शकतो. वाफ घेणं हे आपल्याकडे पिढ्यान् पिढ्या चालत आलेलं आहे. त्यामुळे हा पारंपारिक उपाय तुम्ही घरच्या घरी करून पाहू शकता. आणि तुमच्या आजाराला लवकरात लवकर बरे करू शकता.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
महत्त्वाच्या बातम्या :