Hair Care Tips : केसांमधील कोंड्याची समस्या दूर करायची आहे? करा 'हा' रामबाण उपाय
Hair Care Tips : अंडी वापरणे केसांसाठी खूप चांगले आहे. अंड्यांचा वापर केसांसाठी कसा फायदेशीर आहे हे इथे जाणून घ्या.
Hair Care Tips : प्रत्येकाला मजबूत, चमकदार आणि जाड केस हवे असतात. अशावेळी अंडी खूप फायदेशीर असते. केसांसाठी अंडी वापरणे खूप चांगले आहे. अंड्याच्या वापराने केस गळण्याचे प्रमाण कमी होते. अंड्यांमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन ई, कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम यामुळे केसांना ताकद मिळते. अंड्यांमध्ये असलेले फॉलिक अॅसिड केस पांढरे होण्यास प्रतिबंध करते. इतकंच नाही तर केस गळण्यापासूनही बचाव होतो. केसांना अंडी लावल्याने कोणते फायदे होतात ते जाणून घ्या.
केस लांब आणि जाड होतात : अंड्यांमध्ये प्रथिने आढळतात ज्यामुळे पेशींची दुरुस्ती होते आणि केसांची लवकर वाढ होण्यास मदत होते आणि त्यांना दाट देखील बनते.
कोंडा कमी होतो : अनेकांना डोक्यातील कोंडा आणि खाज येण्याची समस्या असते. जर तुम्ही अंड्याचा हेअर मास्क लावला तर तुम्हाला कोंड्याच्या समस्येपासून नक्कीच सुटका मिळेल.
केस गळणे थांबते : अंड्याच्या मदतीने तुम्ही केस गळणे थांबवू शकता. अंडी तुमच्या केसांची मुळे मजबूत करतात.
केस तुटणे कमी करते : अनेकांना केस गळणे आणि पातळ होणे या समस्या असतात. केसगळतीमुळे केसांची चमकही निघून जाते. अंड्यांमध्ये आढळणाऱ्या ल्युटीनमुळे तुमचे केस या समस्या दूर होतात.
* हेअर मास्क बनवण्याची पद्धत
पद्धत 1
अंड्याचा हेअर मास्क बनवण्यासाठी दोन अंडी, एक चमचा लिंबाचा रस आणि काही थेंब लॅव्हेंडर तेल मिसळा. हे मिश्रण केसांना वीस मिनिटे लावा आणि नंतर शॅम्पूने केस धुवा. यामुळे केसांनाही चमक येईल.
पद्धत 2
एक बाऊलमध्ये अंडे आणि ऑलिव्ह ऑईल मिक्स करून नीट फेटून घ्या. आता हे मिश्रण केसांवर लावा. हे मिश्रण 20 मिनिट्स लाऊन तसेच ठेवा. त्यानंतर हे थंड पाण्यानेच धुवा.
* लक्षात ठेवा
अंड्याचा हेअर पॅक लावल्यानंतर केस थंड पाण्यानेच धुवा. गरम पाण्याचा वापर अजिबात करू नका. कारण असे केल्यास, अंड्याचा वास केसात तसाच राहील. त्यानंतर केसांना शँपू लावा आणि कंडिशनर लाऊन स्वच्छ करा. हा हेअर पॅक तुम्ही आठवड्यातून एक किंवा दोन वेळा लावू शकता.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा फक्त माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं घेण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
संबंधित बातम्या
- Lock Upp Contestants Full List : कंगनाच्या लॉकअपमध्ये 'या' स्पर्धकांचा सहभाग
- House Full : चार सिनेमात टक्कर, सिनेमागृहांबाहेर झळकतोय हाऊसफुल्लचा बोर्ड
- Firaq Gorakhpuri: जेव्हा मीना कुमारी यांना पाहताच फिराक गोरखपुरी यांनी मुशायरा सोडला, वाचा काय आहे किस्सा...
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha