Food: चिकनप्रेमींसाठी आनंदाची बातमी! जगभरातील टॉप 10 फ्राईड चिकन डिशमध्ये भारताच्या 'चिकन 65' ला तिसरं स्थान, परदेशातील लोकांनाही केलं आकर्षित
Food: पुन्हा एकदा भारतीय पदार्थ जगभरात चर्चेत आहेत. जगभरातील टॉप 10 रँकिंगमध्ये चिकन 65ला तिसरे स्थान मिळाले आहे. जाणून घ्या..
Food: चिकन प्रेमींनो तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. जेव्हा खाण्याचा विचार केला जातो तेव्हा भारताचा उल्लेख आवर्जून केला जातो. विविध खाद्यपदार्थ आणि चव यासाठी प्रसिद्ध असलेला भारत जगभरातील लोकांना आकर्षित करतो. इथे प्रत्येक राज्याची आणि प्रत्येक शहराची एक वेगळी खासियत आहे, ज्याची खासियत इथल्या पदार्थांमध्येही पाहायला मिळते. परदेशातील लोकांनाही भारतात मिळणाऱ्या पदार्थांची चव आवडते, त्यामुळेच आता अनेक भारतीय पदार्थांची चव परदेशातही चाखता येते. या क्रमाने पुन्हा एकदा भारतीय पदार्थ जगभर चर्चेत आहेत. वास्तविक, अलीकडेच जगातील टॉप 10 फ्राईड चिकन पाककृतींची यादी जाहीर करण्यात आली आहे, ज्यामध्ये एका भारतीय डिशनेही आपले स्थान निर्माण केले आहे.
जगातील टॉप 10 रँकिंगमध्ये चिकन 65 ला तिसरे स्थान
फ्राईड चिकन मांसाहार प्रेमींमध्ये सर्वात लोकप्रिय पदार्थांपैकी एक आहे. कुरकुरीत थराने लेप केलेल्या रसाळ चिकन तुकड्यांची चव कोणाला आवडत नाही? या डिशची खास गोष्ट म्हणजे प्रत्येक प्रदेशाची स्वतःची पद्धत आहे. जगभरात तळलेले चिकनची लोकप्रियता पाहून, प्रसिद्ध खाद्य मार्गदर्शक टेस्ट ऍटलसने जगभरातील ‘बेस्ट फ्राइड चिकन डिशेस’ची यादी तयार केली आहे. डिसेंबर 2024 च्या रँकिंग डेटानुसार टॉप 10 मध्ये एका भारतीय पदार्थाचे नाव आहे. या टॉप 10 रँकिंगमध्ये चिकन 65ला तिसरे स्थान मिळाले आहे. चिकन 65 बद्दल बोलायचे तर, ही एक क्लासिक पोल्ट्री डिश आहे, जी मूळ चेन्नईमधून आली आहे.
टॉप 3 Fried Chicken डिशेश
तळलेल्या चिकनच्या या यादीमध्ये जगभरातील अनेक पदार्थांची नावे समाविष्ट आहेत. याच क्रमात भारतातील प्रसिद्ध चिकन 65 ने देखील या यादीत आपले स्थान निर्माण केले आहे. या यादीत चिकन 65 ने 3 वे स्थान मिळवून देशाचा गौरव केला आहे. दरम्यान, जर आपण टॉप 3 तळलेल्या चिकन पदार्थांबद्दल बोललो तर, दक्षिण कोरियाची चिकन डिश पहिल्या क्रमांकावर आहे. त्याला 4.6 रेटिंग मिळाले आहे. तर जपानची करागे डिश दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याला 4.5 रेटिंग मिळाले आहे.
टॉप 10 पदार्थ
- चिकीन- दक्षिण कोरिया
- चिकन करागे - जपान
- चिकन 65 - भारत
- फ्राईड चिकन - दक्षिण अमेरिका
- अयम गोरेंग - इंडोनेशिया
- झाजी- चीन
- तैवानी पॉपकॉर्न चिकन - तैवान
- चिकन किव - युक्रेन
- आयम पेनयेट - इंडोनेशिया
- हॉट चिकन - अमेरिका
हेही वाचा>>>
Food: चिकनप्रेमींनो..कधी प्रेशर कुकरमध्ये बनवलेलं 'बटर चिकन' ट्राय केलंय? बोटं चाखाल, 'या' टिप्स कदाचित माहीत नसतील
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )