Cycling Benefits : रोज सकाळी सायकल चालवल्याने फक्त शरीरालाच नाही तर त्वचेलाही होतो फायदा; कसा ते वाचा
Cycling Benefits : दररोज सुमारे 20 ते 25 मिनिटे सायकल चालवणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. जाणून घ्या सायकल चालवण्याचे शरीराला काय फायदे मिळतात.
Cycling Benefits : बदलत्या काळानुसार तंत्रज्ञानाचा विकास होत गेला आणि अनेक गोष्टी बदलत गेल्या. असंच काहीसं सायकलच्या बाबतीत देखील झालं आहे. बाईक आणि कारच्या जगात आजकाल लोकांना सायकल चालवायला कमीपणा वाटतो किंवा लाज वाटते. पण, तुम्हाला माहित आहे का की सायकल चालवल्याने आपल्या शरीराला अनेक फायदे होतात. वजन कमी करण्यापासून हाडे मजबूत करण्यापर्यंत सायकलिंगचे अनेक फायदे आहेत.
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, दररोज 20 ते 25 मिनिटे सायकल चालवल्याने शरीर अनेक गंभीर आजारांपासून सुरक्षित राहते. जाणून घ्या सायकल चालवण्याचे काय फायदे आहेत.
मेंदूसाठी चांगले
एका संशोधनानुसार, ज्या लोकांना स्मरणशक्तीशी संबंधित समस्या आहेत, अशा लोकांनी सायकल चालवणे आवश्यक आहे, यामुळे त्यांची स्मरणशक्ती तीक्ष्ण होते. संशोधनात असे आढळून आले की जे लोक सायकल चालवत नाहीत त्यांची स्मरणशक्ती रोज सायकल चालवणाऱ्यांच्या तुलनेत कमी असते.
चांगली झोप लागते
दररोज 25 ते 30 मिनिटे सायकल चालवल्यास रात्री चांगली झोप लागते. सायकल चालवल्याने शरीराचे स्नायू ताणले जातात त्यामुळे शरीर थकते. आणि छान झोप लागते.
वजन कमी होण्यास मदत होते
अनेकदा तुम्ही ही गोष्ट जीममध्ये पाहिली असेल की ज्या लोकांना वजन कमी करायचे आहे त्यांना सायकलिंग करायला सांगितले जाते. जर तुम्ही जिममध्ये न जाता दररोज अर्धा तास सायकलिंग केली तर तुम्हाला चांगले रिझल्ट्स दिसतील. सायकल चालवल्याने शरीरातील अतिरिक्त कॅलरीज बर्न होतात, त्यामुळे वजन कमी होते. जर तुम्हाला चांगले रिझल्ट्स हवे असतील तर सायकल जास्त वेळ चालवा.
त्वचेवर ग्लो येतो
सायकलिंग केल्याने शरीरातील रक्ताभिसरण सुरळीत राहते आणि त्यामुळे त्वचेच्या पेशींना चांगले पोषक तत्व मिळतात. यामुळे त्वचेवर चमक येते आणि तुम्ही तरुण राहता. उन्हाळ्यात सायकलिंगसाठी बाहेर पडल्यास चेहऱ्यावर सनस्क्रीन लावू शकता.
रोग प्रतिकारशक्ती मजबूत आहे
सायकलिंग शरीरात आवश्यक प्रथिनांचे उत्पादन वाढवून, पांढऱ्या रक्त पेशींना उत्तेजित करून आपली प्रतिकारशक्ती सुधारू शकते. आरोग्य तज्ञ म्हणतात की कोणत्याही प्रकारच्या व्यायामामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. सायकलिंग केल्याने माणसाची सहनशक्तीही वाढते.
कोणती वेळ चांगली आहे
दिवसभरात जेव्हाही वेळ मिळेल तेव्हा 20 ते 25 मिनिटे सायकल चालवावी. एका अभ्यासानुसार, सकाळी सायकल चालवण्याचे फायदे जास्त आहेत कारण संध्याकाळपेक्षा सकाळी जास्त ऊर्जा शरीराला मिळते.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्वाच्या बातम्या :
Pregnancy Health Tips : गरोदरपणात वारंवार भूक लागतेय? हे 'सुपर स्नॅक्स' खा आणि हेल्दी राहा