एक्स्प्लोर

Pregnancy Health Tips : गरोदरपणात वारंवार भूक लागतेय? हे 'सुपर स्नॅक्स' खा आणि हेल्दी राहा

Pregnancy Health Tips : गरोदरपणात महिलांना काहीतरी चविष्ट आणि चवदार खाण्याची इच्छा होते. अशा वेळी तुम्ही काही पदार्थ खाऊ शकता.

Pregnancy Health Tips : गरोदरपणात महिलांनी त्यांच्या खाण्यापिण्याची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. आई आणि जन्माला येणारे मूल दोघांनाही पोषक तत्वांची गरज असते, कारण गरोदरपणात आईचा आहार मुलाची वाढ ठरवतो. यावेळी महिलांच्या शरीरात हार्मोनल बदल खूप वेगाने होत राहतात. त्यामुळे रोज वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या होत राहतात. गर्भवती महिलांना सतत थकवा जाणवतो. त्याच वेळी, गर्भधारणेदरम्यान काहीतरी खाण्याची सतत इच्छा होत असते. हे अगदी सामान्य लक्षण आहे. अशा वेळी काही लोक हवे ते पदार्थ खाऊ घालतात. यामुळे तुमच्या इच्छेपोटी आरोग्याकडे मात्र दुर्लक्ष केले जाते. मात्र, असे न करता तुम्ही तुमच्या आहाराची योग्य काळजी घेणे गरजेचे आहे. यासाठी गरोदर महिलांसाठी चविष्ट आणि आरोग्यदायी स्नॅकचे कोणते पर्याय उपलब्ध होऊ शकतात हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

गरोदरपणात महिलांनी 'या' पदार्थांचा आहारात समावेश करावा 

उकडलेले अंडी खा : आईसाठी निरोगी असण्यासोबतच, गर्भधारणेदरम्यान अंड्याचे सेवन मुलाच्या आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे. अंड्यांमध्ये आरोग्यदायी चरबी, जीवनसत्त्वे आणि खनिजे तसेच इतर अनेक पोषक घटक असतात. उकडलेले अंडी दिवसाच्या कोणत्याही वेळी तुम्ही खाऊ शकता. भूक दूर करण्याबरोबरच ते ऊर्जा आणि पोषणही देतात.
 
भाजलेले चणे : गरोदरपणात होणारी किरकोळ भूक भागवण्यासाठी भाजलेले चणे हा देखील एक पर्याय तुम्ही निवडू शकता. यामध्ये फायबर, प्रोटीन आणि फोलेट सारखे पोषक घटक असतात. 
 
पिनट बटर : तुम्ही गरोदरपणात पीनट बटरचे सेवन देखील करू शकता. दोन चमचे पीनट बटर घ्या. यामध्ये 8 ग्रॅम वनस्पती-आधारित प्रथिने असतात, म्हणून तुम्ही तुमच्या आवडत्या डिशमध्ये पीनट बटर वापरू शकता.
 
दही : दह्यामध्ये प्रथिने, कॅल्शियम आणि प्रोबायोटिक गुणधर्म भरपूर प्रमाणात असतात. गरोदरपणात दही पचनसंस्था तंदुरुस्त ठेवते.दह्यामध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि पोषक तत्वे भरपूर प्रमाणात असतात.
 
ड्रायफ्रूट्स : ड्रायफ्रूट्स हा सर्वोत्तम नाश्ता आहे. बदाम, काजू, पिस्ता किंवा अक्रोड हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. त्यांचे सेवन तुम्ही करू शकता. ड्रायफ्रूट्समध्ये प्रथिने, फायबर, आणि खनिजे भरपूर असतात जे शरीराला प्रचंड फायदे देतात.
 
कलिंगड : गरोदरपणात कलिंगड खाणे खूप फायदेशीर मानले जाते. याच्या सेवनाने शरीरात पाणी पुन्हा भरून निघते आणि तुम्ही हायड्रेटेड राहता. त्यामुळे आरोग्य उत्तम राहते.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

महत्वाच्या बातम्या : 

Health Tips : मनुक्याचे पाणी प्या आणि 'या' 4 आजारांपासून सुटका मिळवा; वाचा फायदे

महत्त्वाच्या बातम्या

Health: पावसाळ्यात किडनीच्या रुग्णांना अधिक धोका? 'अशी' घ्या काळजी, तज्ज्ञांची महत्त्वाची माहिती...
पावसाळ्यात किडनीच्या रुग्णांना अधिक धोका? 'अशी' घ्या काळजी, तज्ज्ञांची महत्त्वाची माहिती...
Independence Day Fashion Tips : 15 ऑगस्टला 'तिरंगा लूक' करताना 'या' 10 चुका टाळा; असा करा परफेक्ट अन् क्लासिक डिझाईन!
15 ऑगस्टला 'तिरंगा लूक' करताना 'या' 10 चुका टाळा; असा करा परफेक्ट अन् क्लासिक डिझाईन!
National Organ Donation Day: एका 'हो' मुळे अनेकांना मिळालं नवजीवन! अवयवदानाबाबत जनजागृतीची गरज, राष्ट्रीय अवयवदान दिनानिमित्त तज्ज्ञ सांगतात...
एका 'हो' मुळे अनेकांना मिळालं नवजीवन! अवयवदानाबाबत जनजागृतीची गरज, राष्ट्रीय अवयवदान दिनानिमित्त तज्ज्ञ सांगतात...
Health : तुम्ही खरचं निरोगी आहात का? 15 ऑगस्टला 'या' 15 चाचण्या करा, घरच्या घरी आरोग्याचं रिपोर्ट कार्ड मिळवा
Health : तुम्ही खरचं निरोगी आहात का? 15 ऑगस्टला 'या' 15 चाचण्या करा, घरच्या घरी आरोग्याचं रिपोर्ट कार्ड मिळवा

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Chakan Traffic Jam : पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
Share Market : शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
Embed widget