Beauty : दीपिका-आलियाच्या ग्लोईंग अन् गुलाबी त्वचेचं हेच ते सीक्रेट! दररोज 'हा' ज्यूस प्या, फायदे जाणून व्हाल थक्क
Beauty : अनेक वेळा महागडे प्रॉडक्ट वापरूनही चेहऱ्याला हवा तसा ग्लो मिळत नाही. तसेच, केमिकल असलेले हे प्रॉडक्ट कधीकधी त्वचेला हानी पोहोचवू शकतात.
Beauty : महिला या मुळातच सुंदर असतात. मात्र अनेकांना आणखी सुंदर दिसावं, असं वाटत असतं, त्यासाठी त्या अनेक प्रयत्न करतात. घरगुती उपचारांपासून ते महागड्या प्रॉडक्ट पर्यंत, महिला आपली त्वचा चमकदार आणि नैसर्गिकरित्या गुलाबी ठेवण्यासाठी बरेच प्रयत्न करतात. मात्र आज आम्ही तुम्हाला अशा एका सीक्रेट बद्दल सांगणार आहोत. जे अनेक बॉलीवूड अभिनेत्रींच्या सौंदर्याचं रहस्य आहे.
आलिया-दीपीकासारखी मुलायम, चमकणारी त्वचा मिळू शकते
सुंदर दिसावे असे कोणाला वाटत नाही? विशेषत: मुली स्वत:ला सुंदर बनवण्यासाठी अनेक प्रयत्न करतात. हेल्दी डाएटपासून ते महागड्या ब्युटी प्रोडक्ट्सपर्यंत महिला बॉलिवूड अभिनेत्रींप्रमाणे सुंदर दिसण्यासाठी खूप काही करतात. मात्र, अनेक वेळा महागडे प्रॉडक्ट वापरूनही चेहऱ्याला हवा तसा ग्लो मिळत नाही. तसेच, केमिकल असलेले हे प्रॉडक्ट कधीकधी त्वचेला हानी पोहोचवू शकतात. अशा परिस्थितीत, फक्त एका ज्यूसच्या मदतीने, तुम्हाला आलिया-दीपीकासारखी मुलायम आणि चमकणारी त्वचा मिळू शकते. आम्ही ज्या ज्यूसबद्दस बोलत आहोत, तो ज्यूस बीटरूट आहे, ज्याचा तुमच्या दिनक्रमात समावेश केल्यास तुमची त्वचा चमकदार तर होईलच, शिवाय तुम्हाला निरोगी देखील बनवेल. तुम्हालाही एखाद्या अभिनेत्रीप्रमाणे सुंदर दिसायचे असेल तर तुमच्या आहारात बीटरूट ज्यूसचा समावेश करा. जाणून घेऊया त्वचेसाठी त्याचे काही फायदे.
एजिंग कमी करते
जर तुम्ही हा ज्यूस नियमितपणे प्यायला तर ते सुरकुत्या आणि बारीक रेषा यांसारख्या वृद्धत्वाची चिन्हे टाळण्यास मदत करते. यामुळे तुम्ही दीर्घकाळ तरुण दिसू शकाल.
ओठ आणि गाल गुलाबी करते
जर तुम्हाला नैसर्गिकरित्या गुलाबी ओठ आणि गाल मिळवायचे असतील तर बीटरूटचा रस तुम्हाला यामध्ये मदत करू शकतो. बीटरूटचा रस नियमितपणे प्यायल्याने गाल आणि ओठ नैसर्गिकरित्या गुलाबी होण्यास मदत होते.
चमकदार आणि निरोगी त्वचा
बीटरूट ज्यूसमध्ये बीटालेन्स असते, जे शरीरात रक्त प्रवाह वाढवते, ज्यामुळे त्वचेचा रंग सुधारतो. याव्यतिरिक्त, त्यात असलेले व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट सुरकुत्या, काळे डाग आणि वृद्धत्वाची चिन्हे कमी करून त्वचा निरोगी बनवतात.
पुरळ घालवतात
बीटरूटचा रस प्यायल्याने मुरुमांचे डाग आणि काळे डाग दूर होण्यास मदत होते. त्यामध्ये असलेले व्हिटॅमिन सी त्वचेचे अतिरिक्त तेल कमी करण्यास मदत करते, जे ब्रेकआउट आणि मुरुमांपासून बचाव करण्यास देखील मदत करते.
डोळ्यांखालील काळी वर्तुळे कमी करते
बीटरूट ज्यूसमध्ये असलेले आयर्न आणि अँटीऑक्सिडंट्स खराब झालेल्या पेशींना आतून जिवंत करू शकतात आणि काळी वर्तुळे कमी करण्यास मदत करतात.
केस निरोगी बनवते
त्वचेशिवाय बीटरूटचा रस तुमच्या केसांसाठी फायदेशीर आहे. त्यामध्ये असलेल्या व्हिटॅमिन सी व्यतिरिक्त, बीटरूटच्या रसामध्ये लोह आणि फोलेट देखील भरपूर प्रमाणात असते, जे केस गळणे थांबवते आणि निरोगी केसांना प्रोत्साहन देते.
हेही वाचा>>>
Skin Care : तेजाळ मुखडा...! फक्त शब्दातच नाही, तर चेहऱ्यावरील तेजही असतं प्रखर, जया किशोरींच्या चमकणाऱ्या चेहऱ्याचे रहस्य जाणून घ्या..
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )