24th August 2022 Important Events : 24 ऑगस्ट दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना
24th August 2022 Important Events : ऑगस्ट महिन्यातील 24 तारखेचं महत्त्व नेमकं काय आहे ते जाणून घ्या.
![24th August 2022 Important Events : 24 ऑगस्ट दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना 24th august 2022 important national international days and events marathi news 24th August 2022 Important Events : 24 ऑगस्ट दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/23/2b0a26103190a344c43d229e10cd8b7a1661263902982358_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
24th August 2022 Important Events : ऑगस्ट महिना सुरु झाला आहे. आणि ऑगस्ट महिन्यातील आजचा दिवस म्हणजेच 24 ऑगस्ट. श्रावणातील प्रत्येक बुधवारी बुधाची आणि गुरुवारी बृहस्पतीची म्हणजे गुरुची पूजा केली जाते ह्या व्रतासाठी बुध आणि गुरुचे चित्र घेऊन किंवा बालस्ती रेखाटून त्याची पूजा करून शेवटी दही-भाताचा नैवेद्य दाखवावा. हे व्रत सात वर्षे केले जाते. त्याचप्रमाणे जैन धर्मियांचा सर्वात पवित्र उत्सव पर्युषणची सुरुवात झाली आहे. पुढील आठ दिवस जैन धर्मातील श्वेतांबर पंथातील बांधव हे पर्युषण पर्व साजरा करतील. या व्यतिरिक्त आणखी कोणते महत्वाचे दिवस आहेत हे या माध्यमातून जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात 24 ऑगस्ट दिनविशेष.
बुधपूजन :
श्रावणातील प्रत्येक बुधवारी बुधाची आणि गुरुवारी बृहस्पतीची म्हणजे गुरुची पूजा केली जाते ह्या व्रतासाठी बुध आणि गुरुचे चित्र घेऊन किंवा बालस्ती रेखाटून त्याची पूजा करून शेवटी दही-भाताचा नैवेद्य दाखवावा. हे व्रत सात वर्षे केले जाते. धनसंपदा, बुद्धिचातुर्य, विद्याधन हे सर्वांनाच हवे असते. ते देण्याबद्दल ज्यांचा लौकिक आहे अशा बुध आणि बृहस्पती ह्यांची ही पूजा अनेक घरात पूर्वापार परंपरेने केली जाते. ज्यांना मनःशांतीसाठी हे व्रत करावेसे वाटेल त्यांनी ते करावे. शक्य असल्यास मुलांच्या गुरुजनांना भेटवस्तू द्याव्यात. निदान एखादे फूल, एखादे पुस्तक द्यावे. हाही एकप्रकारे धार्मिक शिक्षकदिनच म्हणावा लागेल.
पर्युषण पर्वारंभ :
जैन समाजाचा सर्वात पवित्र उत्सव म्हणजेच पर्युषण पर्व. हे पर्युषण पर्व 26 ऑगस्टपासून (आज) सुरु झालं आहे. पुढील आठ दिवस जैन धर्मातील श्वेतांबर पंथातील बांधव हे पर्युषण पर्व साजरा करतील. तर, दिगंबर समुदायातील जैन बांधव 10 दिवसांपर्यंत या पवित्र व्रताचं पालन करतील. पर्युषण पर्व सुरू होण्यापूर्वीच जैन बांधवांनी सर्व मंदिर, धार्मिक स्थळांची साफसफाई पूर्ण केली आहे. पर्युषण पर्वाला जैन समाजातील सर्वात मोठं पर्व मानलं जातं आणि त्यामुळे याला पार्वधिराज असंही म्हटलं जातं.
शिवराम हरी राजगुरु यांचा जन्म.
शिवराम राजगुरू हे एक महान भारतीय स्वातंत्र्यसैनिक होते. भारताच्या स्वातंत्र्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांचे पूर्ण नाव हरी शिवराम राजगुरू हे फार कमी लोकांना माहीत आहे. ते पुण्यातील मराठी ब्राह्मण कुटुंबातील होते. राजगुरू यांचा जन्म २४ ऑगस्ट 1908 रोजी पुण्यातील खेडे गावात झाला. त्यांची आज 114 वी जयंती आहे.
1880 : कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचा जन्म.
बहिणाबाई यांचा जन्म 24 ऑगस्ट 1880 रोजी जळगावपासून 6 कि. मी. अंतरावरील असोदे गावातील प्रतिष्ठित महाजनांच्या घरी झाला. वयाच्या तेराव्या वर्षीच बहिणाबाई चौधरींचा, जळगावातील नथुजी चौधरी यांच्याशी विवाह झाला. बहिणाबाईच्या कवितांतून निसर्ग आपल्याला अनेक रुपांनी भेटतो. वारा, पाऊस, शेतीशी निगडीत निसर्गाची कितीतरी रुपं बहिणाबाईच्या कवितांतून भेटतात.
1925 : सर रामकृष्ण गोपाळ भांडारकर (संस्कृत पंडित, प्राच्यविद्या संशोधक, भाषाशास्त्रज्ञ, इतिहास संशोधक आणि समाजसुधारक यांचे निधन.
2004 : मॉस्कोच्या दॉमोदेदोवो आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन निघालेली दोन विमाने आत्मघातकी हल्लेखोरांच्या बॉम्बहल्ल्यात नष्ट. शेकडो ठार.
1932 : रावसाहेब गणपराव जाधव – मराठीतील व्यासंगी साहित्यसमीक्षक. ‘महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळा’चे तिसरे अध्यक्ष आणि ‘मराठी विश्वकोशा’चे प्रमुख संपादक यांचा जन्म.
महत्वाच्या बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)