22nd July 2022 Important Events : 22 जुलै दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना
22nd July 2022 Important Events : जुलै महिन्यातील 22 तारखेचं महत्त्व नेमकं काय आहे ते जाणून घ्या.
22nd July 2022 Important Events : जुलै महिना सुरु झाला आहे. या दरम्यान, प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व आहे. आज 22 जुलै याच दिवशी भारताचे जहाल मतवादी क्रांतिकारक लोकमान्य टिळक यांनी देशाचे दुर्दैव या जहाल मतवादी अग्रलेखाचे लिखाण केल्याप्रकरणी टिळकांना सहा वर्ष काळ्या पाण्याची शिक्षा देण्यात आली होती. या व्यतिरिक्त आणखी कोणते महत्वाचे दिवस आहेत हे या माध्यमातून जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात 22 जुलैचे दिनविशेष.
1923 : मुकेश चंद माथूर तथा ‘मुकेश‘ – पार्श्वगायक. तीस वर्षांच्या फिल्मी कारकिर्दीत त्यांनी 10,000 हून अधिक गीतांना आवाज दिला. ऊर्दू, पंजाबी, तमिळ, बंगाली, मराठी, गुजराथी या भाषांतही त्यांनी गाणी गायली. अनुनासिक स्वर आणि गायकीत ओतप्रोत भरलेलाअ ’दर्द’ ही त्यांच्या गायनशैलीची वैशिष्ट्ये होती.
1925 : इंग्रजी-मराठीतले पत्रकार आणि लेखक गोविंद तळवलकर यांचा जन्म.
गोविंद तळवलकर यांचं संपूर्ण नाव गोविंद श्रीपाद तळवलकर. हे इंग्रजी-मराठीतले पत्रकार आणि लेखक होते. वृत्तपत्रीय अग्रलेखांकरिता विशेषत्वाने परिचय असलेले ते एक स्तंभलेखक होते. सामाजिक, राजकीय, आंतरराष्ट्रीय घडामोडीचे भाष्यकार, साचेपी संपादक म्हणून त्यांची ख्याती आहे. त्यांचे बरेचसे लेखन पुस्तकरूपातही प्रकाशित झाले आहे. लोकमान्य टिळकांची परंपरा जपणारे आणि संतांप्रमाणे सामान्यांनाही समजेल अशी लेखनशैली जोपासणारे तळवलकर हे खऱ्या अर्थाने 'अग्रलेखांचे बादशहा' होते. भाषेवरील प्रभुत्व, राजकीय आणि सामाजिक भान आणि प्रचंड व्यासंग या जोरावर त्यांनी अग्रलेखांना एका वेगळ्या उंचीवर नेले होते.
1970 : भारतीय जनता पक्षाचे सदस्य तसेच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जन्मदिन.
देवेंद्र गंगाधर फडणवीस हे भारतीय जनता पक्षातील नेते तसेच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. ते नागपूर नैर्ऋत्य विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. 31ऑक्टोबर 2014 ला वयाच्या 44 व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री होते.
1908 : साली भारताचे जहाल मतवादी क्रांतिकारक लोकमान्य टिळक यांनी देशाचे दुर्दैव या जहाल मतवादी अग्रलेखाचे लिखाण केल्याप्रकरणी टिळकांना सहा वर्ष काळ्या पाण्याची शिक्षा देण्यात आली.
2003 : साली अमेरिकेच्या लष्करी सैन्याने इराकवर केलेल्या बॉम्ब हल्ल्यात इराक शासक सद्दाम हुसेन यांची मुले मारली गेली.
1965 : साली रॅमन मॅग्सेसे पुरस्कार सन्मानित भारतीय सामाजिक कार्यकर्ते आणि आशा संस्थेचे एक संस्थापक आणि सदस्य संदीप पांडे यांचा जन्मदिन.
महत्वाच्या बातम्या :