20th July 2022 Important Events : 20 जुलै दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना
20th July 2022 Important Events : जुलै महिन्यातील 20 जुलै या दिवशी महत्त्व नेमकं काय आहे ते जाणून घ्या.
20th July 2022 Important Events : जुलै महिना सुरु झाला आहे. या दरम्यान, प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व आहे. आज 19 जुलै म्हणजेच थोर भारतीय स्वातंत्र्य सैनिक मंगल पांडे यांचा जन्मदिन. इंग्रजांविरुद्ध क्रांतीचं पहिलं पाऊल उचलणारे क्रांतिकारक म्हणून मंगल पांडे यांचं नाव इतिहासात सुर्वणअक्षरांनी लिहिलं आहे. या व्यतिरिक्त आणखी कोणते महत्वाचे दिवस आहेत हे या माध्यमातून जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात 20 जुलैचे दिनविशेष.
1911 : भारतीय क्रिकेट खेळाडू बाका जिलानी यांचा जन्म.
बाका जिलानी यांचा जन्म 20 जुलै 1911 मध्ये पंजाब मधील जालंधर येथे झाला. जिलानी हे एक उत्तम फलंदाज होते.
1921 : बनारस घराण्याचे नामवंत तबलावादक पंडित सामताप्रसाद यांचा जन्म
प्रसिद्ध तबलावादक पं. सामताप्रसाद हे बनारस घराण्याचे नामवंत तबलावादक होते. त्यांचा जन्म 20 जुलै 1921 रोजी झाला. सामताप्रसाद उर्फ गुदई महाराज यांचे घराणेही अतिशय मोठे व नावाजलेले होते.
तबल्यातील अक्षरांचा कमालीचा सुस्पष्टपणा आणि त्याबरोबरच गोडवा, तबला – डग्ग्याच्या नादातील समतोल, बोलांच्या आकर्षकतेचा उत्कृष्ट अविष्कार आणि या सर्वांना व्यापून टाकणारी प्रासादिकता ही त्यांची वैशिष्ट्ये होती. 31 मे 1994 रोजी त्यांचे निधन झाले.
1929 : हिन्दी चित्रपट अभिनेता राजेंद्रकुमार यांचा जन्म
राजेंद्रकुमार यांचा जन्म 20 जुलै 1929 रोजी सियालकोट पंजाब येथे झाला. 60 ते 70 या दशकातील ते एक प्रसिद्ध अभिनेता होते. राजेन्द्र कुमार यांनी आपली चित्रपटातील कारकीर्द जोगन या चित्रपटापासून केली. या चित्रपटात त्यांनी दिलीप कुमार आणि नर्गिस यांच्यासमवेत काम केले आहे. 1957 मधील मदर इंडिया या चित्रपटात त्यांनी नर्गिस यांच्या मुलाची भूमिका केली आणि ती खूप गाजली.
1976 : भारतीय क्रिकेट खेळाडू देबाशिष मोहंती यांचा जन्म.
ओडिसामधील भुवनेश्वर येथे देबाशिष यांचा जन्म झाला. ते अष्टपैलू खेळडू होते.
1919 : माउंट एव्हरेस्टवर सर्वप्रथम चढाई करणारे न्यूझीलंडचे गिर्यारोहक सर एडमंड हिलरी यांचा जन्म
1822: जनुकांची संकल्पना मांडणारा जर्मन जीवशास्त्रज्ञ ग्रेगोर मेंडेल यांचा जन्म
1836 : ज्वरमापीचा शोध लावणारे डॉक्टर सर थॉमस क्लिफोर्ड ऑलबट यांचा जन्म.
1889 : बीबीसीचे सहसंस्थापक जॉन रीथ यांचा जन्म.
1943 : कादंबरीकार, साहित्य समीक्षक आणि तत्त्वचिंतक वामन मल्हार जोशी यांचे निधन
वामन जोशी हे मराठी कादंबरीकार, साहित्यसमीक्षक आणि तत्त्वचिंतक होते. त्यांचा जन्म कुलाबा जिल्हातील तळे या गावी झाला. पुण्याच्या डेक्कन कॉलेजातून तत्त्वज्ञान आणि तर्कशास्त्र हे विषय घेऊन ते एम्.ए. झाले. त्यानंतर त्यांना वि. गो. विजापूरकर कोल्हापूर येथे राष्ट्रीय शिक्षण योजनेखाली चालविलेल्या समर्थ विद्यालयात अध्यापनाचे काम केले. विजापूरकरांच्या बरोबर विश्ववृत या मासिकाच्या संपादनाची जबाबदारीही स्वीकारली.
1937 : रेडिओचे संशोधक गुग्लिएल्मो मार्कोनी यांचे निधन
1951 : जॉर्डनचा राजा अब्दुल्ला (पहिला) यांचे निधन
1965 : क्रांतिकारक बटुकेश्वर दत्त यांचे निधन
1972 : अभिनेत्री गीता दत्त यांचे निधन
1973 : अमेरिकन अभिनेता आणि मार्शल आर्ट तज्ज्ञ ब्रूस ली यांचे निधन
1995: शास्त्रीय गायक शंकरराव बोडस यांचे निधन
2013 : भारतीय राजकारणी खुर्शिद आलम खान यांचे निधन
महत्वाच्या घटना
1402 : तैमूरलंगने तुर्कस्तानमधील अंकारा शहर जिंकले
1807 : निकेफोरे नीएपस यांना जगातील पहिल्या इंजिनसाठी पेटंट दिले गेले.
1828 : मुंबापूर वर्तमान हे मराठी वृत्तपत्र मुंबईत सुरू झाले.
1871 : ब्रिटिश कोलंबिया हा प्रांत कॅनडात विलीन झाला.
1903 : फोर्ड मोटर कंपनीतून पहिली मोटारगाडी बाहेर पडली.
1908 : बडोद्याचे महाराज सर सयाजीराव गायकवाड (तिसरे) यांच्या पुढाकाराने बँक ऑफ बडोदाची स्थापना झाली.
1926 : मेथॉडिस्ट चर्चने स्त्रियांना धर्मगुरू होण्याची परवानगी दिली.
1944 : दुसरे महायुद्ध – क्लाऊस व्हॉन स्टाऊफेनबर्गने केलेल्या प्राणघातक हल्ल्यातुन अॅडॉल्फ हिटलर बचावला.
1949 : इस्त्रायल व सीरीयाने शांतता करार केल्यामुळे १९ महिने सुरू असलेले युद्ध संपले.
1952 : फिनलंडची राजधानी हेलसिंकी येथे १५ व्या ऑलिम्पिक खेळांना सुरूवात झाली.
1960 : सिरिमावो भंडारनायके श्रीलंकेच्या पंतप्रधानपदी
1969 : नील आर्मस्ट्राँग हा चंद्रावर पाऊल ठेवलेला पहिला मानव ठरला
1973 : केनियाचे अर्थमंत्री ज्युलियस कियानो यांनी जाहीर केले की देशातील आशियाई लोकांचे उद्योग-धंदे वर्षअखेरीस सक्तीने बंद करण्यात येतील.
1976 : मंगळावर प्रथमच व्हायकिंग-१ हे मानवरहित अंतराळयान उतरले.
1989 : म्यानमारच्या सरकारने ऑँग सान सू कीला नजरकैदेत टाकले.
2000 : अभिनेते दिलीपकुमार यांना राजीव गांधी राष्ट्रीय सद्भावना पुरस्कार जाहीर.
2015 : पाच दशकांनंतर अमेरिका आणि क्युबा यांच्यामध्ये राजनयिक संबंध पुन्हा सुरू झाले.
1924 : बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना.