(Source: ECI/ABP News/ABP Majha)
19th July 2022 Important Events : 19 जुलै दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना
19th July 2022 Important Events : जुलै महिन्यातील 19 तारखेचं महत्त्व नेमकं काय आहे ते जाणून घ्या.
19th July 2022 Important Events : जुलै महिना सुरु झाला आहे. या दरम्यान, प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व आहे. आज 19 जुलै म्हणजेच थोर भारतीय स्वातंत्र्य सैनिक मंगल पांडे यांचा जन्मदिन. इंग्रजांविरुद्ध क्रांतीचं पहिलं पाऊल उचलणारे क्रांतिकारक म्हणून मंगल पांडे यांचं नाव इतिहासात सुर्वणअक्षरांनी लिहिलं आहे. या व्यतिरिक्त आणखी कोणते महत्वाचे दिवस आहेत हे या माध्यमातून जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात 19 जुलैचे दिनविशेष.
1927 साली थोर भारतीय स्वातंत्र्य सैनिक मंगल पांडे यांचा जन्मदिन.
इंग्रजांविरुद्ध क्रांतीचं पहिलं पाऊल उचलणारे क्रांतिकारक म्हणून मंगल पांडे यांचं नाव इतिहासात सुर्वणअक्षरांनी लिहिलं आहे. आज त्यांची 195 वी जयंती आहे. त्यांनी पुकारलेल्या विद्रोहामुळंच पहिल्या स्वातंत्र्यलढ्याची सुरुवात 1857 साली झाली. त्यांनी 29 मार्च 1857 रोजी इंग्रजांविरुद्ध कोलकात्यातील बराकपूरमध्ये एका अधिकाऱ्यावर हल्ला करत या लढ्याची मशाल पेटवली.
1969 : भारतातील 14 मोठ्या बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले.
1969 : नील आर्मस्ट्राँग, एडवीन ऑल्ड्रिन आणि मायकेल कॉलिन्स या अंतराळवीरांसह अपोलो 11 हे अंतराळयान चंद्राच्या कक्षेत पोहोचले.
1993 : ग्रामीण भागातील महिलांचे जीवनमान सुधारण्यासाठी केलेल्या कार्याबद्दल डॉ. बानू कोयाजी यांना समाजसेवेसाठीचा ’रॅमन मॅगसेसे पुरस्कार’ जाहीर
सन 1980 साली रशियाची राजधानी मॉस्को येथे 22 व्या ऑलम्पिक स्पर्धेला सुरुवात झाली.
सन 2005 साली भारताचे तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी अमेरिकेच्या कॉंग्रेसला संबोधित केलं.
सन 1938 साली पद्मभूषण आणि पद्मविभूषण पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय गणितज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत विष्णू नारळीकर यांचा जन्मदिन.
महत्वाच्या बातम्या :