![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
SCI Recruitment 2023 : सरकारी नोकरीची संधी! अर्ज प्रक्रियेला सुरुवात, 11 डिसेंबर शेवटची तारीख
Shipping Corporation Recruitment 2023 : शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड येथे नोकरीची संधी चालून आली आहे. सरकारी नोकरी मिळवण्याची ही संधी सोडू नका.
![SCI Recruitment 2023 : सरकारी नोकरीची संधी! अर्ज प्रक्रियेला सुरुवात, 11 डिसेंबर शेवटची तारीख Shipping Corporation of India Recruitment 2023 update 11 dec last date for application government job vacancy all details marathi news SCI Recruitment 2023 : सरकारी नोकरीची संधी! अर्ज प्रक्रियेला सुरुवात, 11 डिसेंबर शेवटची तारीख](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/05/35176f47159a0e5c114e4a5cb80946761701788598116349_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Job Majha : सरकारी नोकरीच्या (Government Jobs) शोधात आहात, तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (Shipping Corporation of India Ltd) येथे नोकरीची संधी (Job News) आहे. शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (SCI) ने भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. या भरती अंतर्गत, शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (Shipping Corporation of India Ltd) कडून मास्टर मरीनर्स आणि मुख्य अभियंताच्या पदांसाठी भरती करण्यात येणार आहेत. ज्या उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे. इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज दाखल करू शकतात. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून मुदत संपण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक आहेत, त्यामुळे शेवटच्या तारखेची वाट न पाहता वेळीच अर्झ दाखल करा. या भरतीसाठी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 11 डिसेंबर आहे. उमेदवार www.shipindia.com या अधिकृत वेबसाइटवर अर्झ दाखल करु शकतात.
Shipping Corporation Recruitment 2023 : रिक्त जागांचा तपशील
शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडकडून या भरतीअंतर्गत 43 रिक्त जागांवर भरती करण्यात येणार आहे, त्यापैकी 17 रिक्त पदे मास्टर मरीनर्सपदासाठी आहेत आणि 26 रिक्त पदे मुख्य अभियंता पदासाठी आहेत.
Shipping Corporation Recruitment 2023 : भरतीसाठीची शैक्षणिक पात्रता
या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराने पदव्युत्तर FG COC/MEO वर्ग I COC प्राप्त केल्यानंतर किमान तीन वर्षांचा सागरी वेळ पूर्ण केलेला असावा, त्यापैकी किमान दोन वर्षांचा सागरी वेळ मास्टर किंवा मुख्य अभियंता पदावर असावा.
Shipping Corporation Recruitment 2023 : वयोमर्यादा
या भरतीसाठी पात्र उमेदवारांचे कमाल वय 45 वर्षे असावे. यामध्ये ओबीसी उमेदवारांना 5 वर्षांची आणि SC/ST उमेदवारांना 10 वर्षांची सवलत मिळेल.
Shipping Corporation Recruitment 2023 : अर्ज फी
भरतीसाठी सामान्य, OBC-NCL आणि EWS उमेदवारांना 500 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. SC/ST/PwBD/ExSM यांना फीमध्ये सवलत असून त्यांना 100 रुपये शुल्क भरावे लागेल.
Shipping Corporation Recruitment 2023 : कशी असेल निवड प्रक्रिया?
या भरतीसाठीची निवड प्रक्रिया दोन टप्प्यात आयोजित केली जाईल. पहिल्या टप्प्यात शॉर्ट-लिस्टिंग होईल, यामध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांना दुसऱ्या टप्प्यात मुलाखतीसाठी बोलावलं जाईल आणि त्यावरून निवड केली जाईल.
Shipping Corporation Recruitment 2023 : अधिक माहितीसाठी उमेदवार येथे अधिसूचना पाहू शकतात.
अधिसूचना पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Government Job : सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! स्टेनोग्राफर, क्लर्क पदांवर 4500 हून अधिक पदांवर बंपर भरती
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)