MPPSC Prelims Admit Card 2022 : MPPSC राज्य सेवा आणि राज्य वन सेवा प्रिलिम्स प्रवेशपत्र जारी; असे करा डाऊनलोड
MPPSC Prelims Admit Card 2022 : MPPSC Prelims परीक्षा 19 जून 2022 रोजी राज्यातील 54 केंद्रांवर घेतली जाईल.
MPPSC Prelims Admit Card 2022 : मध्य प्रदेश लोकसेवा आयोग, MPPSC ने राज्य सेवा आणि राज्य वन सेवा प्राथमिक परीक्षा 2021-22 चे प्रवेशपत्र जारी केले आहे. त्यानंतर परीक्षेला बसणारे उमेदवार mppsc.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ते डाउनलोड करू शकता. याशिवाय प्रवेशपत्र डाउनलोड करण्याची थेट लिंकही खाली शेअर केली आहे.
MPPSC राज्य सेवा आणि राज्य वन सेवा परीक्षा 19 जून 2022 रोजी राज्यातील 54 केंद्रांवर घेण्यात येणार आहे. परीक्षेत 2 पेपर असतील, ज्यामध्ये सामान्य अध्ययनाचा पहिला पेपर सकाळी तर, दुसरा पेपर सामान्य अभियोग्यता चाचणीचा असेल.
परीक्षेचा नमुना :
MPPSC प्रिलिम्स परीक्षेतील प्रत्येक पेपर 200 गुणांचा असेल. ज्यासाठी उमेदवारांना 2 तासांचा वेळ दिला जाईल. पेपर 1 मधून सामान्य विज्ञान, इतिहास, भूगोल, अर्थव्यवस्था, पॉलिटी या विषयांचे प्रश्न विचारले जातील. तर पेपर-2 मध्ये कॉम्प्रिहेन्शन, इंटरपर्सनल स्किल्स, लॉजिकल रिझनिंग या विषयांमधून प्रश्न विचारले जातील.
प्रवेशपत्र कसे डाउनलोड करावे?
- MPPSC प्रीलिम्स प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी, उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट, mppsc.gov.in ला भेट देणे आवश्यक आहे.
- त्यानंतर मुख्य पृष्ठावर उपलब्ध असलेले 'अॅडमिट कार्ड डाउनलोड करा' वर क्लिक करा.
- आता 'Admit Card – State Service & State Forest Service Preliminary Examination-2021' या लिंकवर क्लिक करा.
- तुमचा अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख टाका.
- अॅडमिट कार्ड स्क्रीनवर दिसेल.
महत्वाच्या बातम्या :