KVS मध्ये 13404 पदांवर बंपर भरती; अर्ज करण्याची मुदत वाढवली, झटपट अर्ज करा
KVS Recruitment 2022: केंद्रीय विद्यालयातील 13404 विविध पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख वाढवण्यात आली आहे. आता उमेदवार या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात.
Kendriya Vidyalaya Recruitment 2022 Last Date Extended: केंद्रीय विद्यालयातील भरतीशी (Kendriya Vidyalaya Recruitment) संबंधित मोठी बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, KVS मधील रिक्त पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख वाढवण्यात आली आहे. यापूर्वी, केंद्रीय विद्यालयाच्या या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 26 डिसेंबर 2022 होती, ती आता 02 जानेवारी 2023 पर्यंत वाढवण्यात आली आहे. म्हणजेच, आता उमेदवार 2 जानेवारीपर्यंत या पदांसाठी अर्ज करू शकतात. इच्छुक असूनही तुम्हाला जर काही कारणास्तव अर्ज करता आला नसेल, तर आता तुम्ही अर्ज करु शकता. रिक्त पदांवरील भरतीसाठी अर्ज करण्याची मुदत वाढवण्यात आली आहे.
KVSनं जारी केलेल्या नोटीसमध्ये काय लिहिलंय?
Kendriya Vidyalaya नं जारी केलेल्या नोटीसमध्ये असं लिहिलंय की, "KVS प्रशासनानं KVS मधील अधिकारी संवर्ग, अध्यापन आणि शिक्षकेतर पदांसाठी ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 26 डिसेंबर 2022 ते 2 जानेवारी 2023 पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. भरती प्रक्रियेची मुदत वाढली असली तरी त्यासाठी आवश्यक असणाऱ्या वय, पात्रता, अनुभव इत्यादींबाबत इतर अटी आणि शर्ती तशाच राहतील, असंही प्रशासनानं स्पष्ट केलं आहे.
एकूण रिक्त पदे - 13,404 पदं
- असिस्टंट कमिश्नर - 52 पद
- प्राचार्य - 239 पद
- उप प्राचार्य - 203 पद
- पोस्ट ग्रेजुएट शिक्षक (पीजीटी) - 1409 पद
- प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (टीजीटी) - 3176 पद
- प्राथमिक शिक्षक (पीआरटी) - 6414 पद
- पीआरटी (संगीत) - 303 पद
- ग्रंथपाल - 355 पद
- वित्त अधिकारी - 06 पद
- असिस्टंट इंजीनियर (सिव्हिल) - 02 पद
- असिस्टंट सेक्शन ऑफिसर (एएसओ) - 156 पद
- सीनियर सेक्रेटेरिअट असिस्टंट (यूडीसी) - 322 पद
- जूनियर सेक्रेटेरिएट असिस्टंट (एलडीसी) - 702 पद
- हिंदी ट्रान्सलेटर - 11 पद
- स्टेनोग्राफर ग्रेड- II - 54 पद
शिक्षक आणि शिक्षकेतर पदांवर भरती
KVS मध्ये विविध अध्यापन आणि शिक्षकेतर पदांसाठी भरती निघाली आहे. या अंतर्गत एकूण 13404 पदं भरण्यात येणार असून त्यासाठी 05 डिसेंबरपासून अर्ज स्विकारण्याची 26 डिसेंबर ही अंतिम तारीख होती. मात्र आता मुदतवाढ मिळाली असून इच्छुक उमेदवार आता 2 जानेवारी 2023 पर्यंत अर्ज करु शकणार आहेत. या पदांशी संबंधित पात्रता, वयोमर्यादा इत्यादींबद्दल जाणून घेण्यासाठी, तुम्ही अधिकृत वेबसाईटवर दिलेली सूचना पाहू शकता.
कशी केली जाणार उमेदवारांची निवड?
KVS च्या या पदांवर निवड लेखी परीक्षेद्वारे केली जाईल, ज्याची तारीख अद्याप जाहीर केलेली नाही. परीक्षेची तारीख काही दिवसांत प्रसिद्ध होईल आणि त्यापूर्वी प्रवेशपत्र सोडण्याची तारीख स्पष्ट होईल. नवीनतम अद्यतनांसाठी उमेदवारांना KVS च्या अधिकृत वेबसाईटला वेळोवेळी भेट देत राहण्याची विनंती प्रशासनाकडून करण्यात आली आहे. भरती प्रक्रियेसंदर्भातील अधिक माहिती मिळवण्यासाठी इच्छुक उमेदवार kvsangathan.nic.in. या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात.
अनेक तरुण सरकारी नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतात. अनेकदा वेळीच माहिती न मिळाल्यामुळे नोकरीची संधी हातातून जाते. त्यामुळेच नोकरीच्या शोधात असलेल्या तरुण-तरुणींसाठी एबीपी माझा खाजगी आणि सरकारी क्षेत्रातील नोकरीसंबंधातील माहिती जॉब माझा या विशेष कॅटेगरीमध्ये दररोज प्रकाशिक करतं. वेगवेगळ्या कंपन्या, संस्थांतील नोकर भरतीबाबत जाणून घेण्यासाठी एबीपी माझाच्या वेबसाईटला नक्की भेट द्या.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Job Majha : SAIL, बाल विकास प्रकल्पमध्ये मेगा भरती सुरू, असा करा अर्ज