SECR Recruitment 2022 : रेल्वेत 10 वी पाससाठी 1000 हून अधिक पदांसाठी जागा, जाणून घ्या सर्व माहिती
SECR Recruitment 2022 : दक्षिण पूर्व मध्य रेल्वेने नागपुरात अप्रेंटिस पदांसाठी भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. एकूण 1044 पदांची भरती करण्यात येणार आहे.
SECR Recruitment 2022 : दक्षिण पूर्व मध्य रेल्वेने नागपुरात अप्रेंटिस पदांसाठी भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. एकूण 1044 पदांची भरती करण्यात येणार आहे. त्यामध्ये नागपूर विभागातील 980 पदे आणि मोतीबाग वर्कशॉप येथील 64 पदांचा समावेश आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार apprenticeshipindia.org या अधिकृत साइटला भेट देऊन या भरतीसाठी अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 3 जून 2022 आहे.
SECR Recruitment 2022 : महत्त्वाच्या तारखा
ऑनलाइन अर्ज सुरू करण्याची तारीख - 4 मे 2022
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख - 3 जून 2022
SECR Recruitment 2022 : शैक्षणिक पात्रता
या भरतीसाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार मान्यताप्राप्त बोर्डातून किमान 50 टक्के गुणांसह 10वी उत्तीर्ण असावेत.
SECR Recruitment 2022 : वयोमर्यादा
अधिसूचनेनुसार, दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या या पदांच्या भरतीसाठी उमेदवाराचे वय 15 ते 24 वर्षे दरम्यान असावे. तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना उच्च वयोमर्यादेत सवलत मिळेल. असं अधिसुचनेत म्हटलंय.
SECR Recruitment 2022 : निवड प्रक्रिया
गुणवत्तेच्या आधारावर या पदांसाठी उमेदवारांची निवड केली जाईल. ज्या अंतर्गत इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइट secr.indianrailways.gov.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज सबमिट करू शकतात. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत वेबसाइटला भेट देऊन संपूर्ण तपशील ऑनलाइन तपासण्याचा सल्ला दिला जातो.
महत्त्वाच्या इतर बातम्या