Mike Tyson vs Jake Paul : 27 वर्षाचा तरणा पोरगा 'द माईक टायसन'शी भिडला, 338 कोटींच्या बॉक्सिंग सामन्याची जगभरात चर्चा; कोण हारलं कोण जिंकलं?
जगातील महान बॉक्सरपैकी एक असलेल्या 58 वर्षाच्या महान माईक टायसनला 27 वर्षीय बॉक्सर जेक पॉलने ऐतिहासिक सामन्यात पराभूत केले आहे.
Mike Tyson vs Jake Paul Boxing Fight : जगातील महान बॉक्सरपैकी एक असलेल्या माईक टायसनने (Mike Tyson) जवळपास दोन दशकांनंतर शनिवारी बॉक्सिंगच्या रिंगमध्ये पुनरागमन केले. पण या ऐतिहासिक सामन्यात 58 वर्षाच्या महान माईक टायसनला 27 वर्षीय बॉक्सर जेक पॉलने (Jake Paul) पराभूत केले आहे.
A ringside look at #PaulTyson 👀 pic.twitter.com/WZlzvJ7gKX
— Netflix (@netflix) November 16, 2024
माइक टायसन आणि जेक पॉल यांच्यातील लढतीत एकूण आठ फेऱ्या होणार होत्या. प्रत्येक फेरी दोन मिनिटांची होती. पहिल्या फेरीत पॉलला नऊ गुण आणि टायसनला 10 गुण दिले. त्याच वेळी दुसऱ्या फेरीतही पंचांनी पॉलला नऊ गुण आणि टायसनला 10 गुण दिले. मात्र, त्यानंतर तिसऱ्या ते आठव्या फेरीत पंचांनी पॉलला 10-10 गुण दिले, तर टायसनला नऊ गुण दिले. अशा प्रकारे पॉलला 78 आणि टायसनला 74 गुण मिळाले. पॉलने चार गुणांनी ऐतिहासिक सामना जिंकला. पण सामन्यानंतर शेवटी पॉल टायसनसमोर नतमस्तक झाला आणि माइक टायसनला आदर दिला.
Jake Paul bows to Mike Tyson at the end of the match. #PaulTyson pic.twitter.com/FUQGZVyADQ
— Netflix (@netflix) November 16, 2024
या सामन्यापूर्वी दोन्ही खेळाडू आमनेसामने आले होते, ज्यावेळी टायसनने जेक पॉलला कानाखाली मारली होती. त्यानंतर सामन्याची उत्कंठा शिगेला पोहोचवली होती. मात्र, सामन्यानंतर पॉलने टायसनचे त्या थप्पडबद्दल आभार मानले. पहिल्या दोन फेऱ्यांनंतर टायसन थकलेला दिसत होता. वयाने त्याला वेठीस धरले असे वाटत होते, पण तरीही तो आठव्या फेरीपर्यंत आपल्या उभा राहिला. तरुणांसाठी हे खूप प्रेरणादायी होते. मात्र, बॉक्सिंगमध्ये टायसनला पुन्हा एकदा पराभवाचा सामना करावा लागला. सामना संपल्यानंतर टायसननेही पॉलचे अभिनंदन केले आणि त्याला मिठी मारली.
Jake Paul praises Mike Tyson: "He's the GOAT" #PaulTyson pic.twitter.com/AhEBA5Ojoj
— Netflix (@netflix) November 16, 2024
कोणाला किती पैसे मिळाले?
रिपोर्टनुसार, या मॅचसाठी जेकला 40 मिलियन यूएस डॉलर (337 कोटी रुपये) मिळतील. त्याचवेळी, हरले तरीही टायसनला 20 दशलक्ष अमेरिकन डॉलर (168 कोटी रुपये) दिले जातील.
हे ही वाचा -