MPSC Exam : मोठी बातमी! राज्य पूर्व परीक्षा 21 ऑगस्टला होणार, 161 पदांसाठी भरती
State Service Pre Exam : महाराष्ट्र राज्य सेवा (MPSC) आयोगाची 2022 साठीची पूर्व परीक्षा 21 ऑगस्ट 2022 रोजी होणार आहे. या अंतर्गत एकुण 161 पदांसाठी भरती करण्यात येणार आहे.
MPSC State Service Pre Exam : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) राज्य सेवा पूर्व परीक्षेची तारीख जाहीर केली आहे. राज्य सेवा आयोगाची 2022 साठीची पूर्व परीक्षा 21 ऑगस्ट 2022 रोजी होणार आहे. या अंतर्गत एकुण 161 पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून या जाहिराती संदर्भात माहिती दिली आहे. राज्यातल्या 37 केंद्रांवर राज्य सेवा पूर्व परीक्षा होणार आहे. वित्त आणि लेखा सेवा गट अ सहाय्यक संचालक, नगरपालिका- नगरपरिषद मुख्याधिकारी गट अ, राज्य उत्पादन शुल्क विभाग गट ब या आणि बालविकास विभागाच्या पदांसाठी ही पूर्वपरीक्षा घेण्यात येणार आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणाऱ्या या पूर्व परीक्षेत गट 'अ' मध्ये 59 आणि गट ब मध्ये 14 पदांसाठी तसेच इतर 88 पदांसाठी परीक्षा घेतली जाणार आहे. 21 ऑगस्ट 2022 रोजी पूर्व परीक्षा पार पडल्यानंतर जानेवारी 2023 मध्ये मुख्य परीक्षा घेण्यात येणार आहे. पूर्व परीक्षेत उत्तीर्ण झालेले उमेदवार मुख्य परीक्षेसाठी पात्र असतील. 21 जानेवारी ते 23 जानेवारी किंवा त्यानंतर आयोगाकडून मुख्य परीक्षा आयोजित करण्यात येईल.
महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागातील गट अ तसेच गट ब संवर्गातील एकूण 161 पदांच्या भरतीकरिता राज्य सेवा पूर्व परीक्षा 2022 ची जाहिरात (क्रमांक 045/2022) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.https://t.co/FY3qxNJJRw
— Maharashtra Public Service Commission (@mpsc_office) May 11, 2022
इच्छुक उमेदवार https://mpsc.gov.in/ या अधिकृत संकेत स्थळावर जाऊन अर्ज तरु शकतात. 12 मे म्हणजेच आजपासून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्य सेवा पूर्व परीक्षेसाठी इच्छुक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. 1 जून 2022 ही अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख आहेत. तोपर्यंत अधिकृत संकेतस्थावर अर्झ करता येतील. राज्य शासनाच्या अधिसुचनेनुसार 1 मार्च 2020 ते 17 डिसेंबर 2021 या कालावधी दरम्यान अधिक वय असलेले उमेदवारही अर्ज करण्यास पात्र असतील. कोरोनामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून या भरती अंतर्गत नगरपालिकांमधील मुख्याधिकारी, राज्य उत्पादन शुल्क विभागातील सहाय्यक आयुक्त, बालविकास प्रकल्प अधिकारी, तसेच इतर पदांसाठी 161 पदांवर भरती करण्यात येणार आहे.
पदांचा अधिक तपशील खालीलप्रमाणे :
* एकूण पदांची संख्या : 161
सहाय्यक संचालक, महाराष्ट्र वित्त आणि लेखा सेवा : एकूण पदे 09
मुख्याधिकारी, नगरपालिका/नगरपरिषद : 22 पदे
बाल विकास प्रकल्प अधिकारी : 28 पदे
सहाय्यक आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क : 02 पदे
उप अधीक्षक, राज्य उत्पादन शु्ल्क : 03 पदे
कक्ष अधिकारी : 05 पदे
सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी : 04 पदे
निरीक्षक प्रमाणित शाळा व संस्था व अन्य : 88 पदे
महत्त्वाच्या इतर बातम्या
- MPSC Recruitment 2022 : लोकसेवा आयोगामध्ये 10वी उत्तीर्णांसाठी जागा रिक्त, 12 मे पूर्वी अर्ज करा
- NEET PG 2022 : नीट पीजी परीक्षेचं हॉल तिकीट लवकरच होणार जारी; डाऊनलोड कुठून कराल?
- IPPB Recruitment 2022 : बँकेत ग्रामीण डाक सेवक पदांसाठी मोठी भरती; अर्ज प्रक्रिया सुरु, जाणून घ्या सविस्तर
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI