एक्स्प्लोर

Dilip Walse Patil: 'मी शरद पवारांचा मानसपुत्र हे लोक म्हणायचे', पवारांबद्दल बोलताना वळसे पाटील भावूक

Dilip Walse Patil: मी स्वत: कधीही म्हटलं नाही की, मी शरद पवारांचा मानसपुत्र आहे. लोक तसं म्हणायचे असंही यावेळी बोलताना दिलीप वळसे पाटलांनी म्हटलं आहे.

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस नेते आणि मंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) हे शरद पवारांचे (Sharad Pawar) मानसपुत्र मानले जातात. दिलीप वळसे सलग सात वेळा आंबेगाव मतदारसंघातून आमदार झाले आहेत, प्रत्येकवेळी त्यांच्या प्रचारासाठी शरद पवार होते. मात्र, यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये  दिलीप वळसेंच्या (Dilip Walse Patil) विरोधात उभे ठाकलेले महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार देवदत्त निकम यांच्यासाठी शरद पवार (Sharad Pawar) यांनी आंबेगावात सभा घेतली आणि ज्यांनी गद्दारी केली, त्यांना शिक्षा द्यायची असते. महाराजांसोबत ज्यांनी गद्दारी केली त्यांना कधी सोडलं का? त्यामुळं आपल्यासोबत गद्दारी केली, त्यांना सुट्टी नाही. त्यानंतर आता या मतदारसंघाकडे संपुर्ण राज्याचं लक्ष्य लागलं आहे. अशातच एबीपी माझाशी संवाद साधताना शरद पवारांबाबत (Sharad Pawar) बोलताना दिलीप वळसे पाटील भावूक झाल्याचं दिसून आलं. यावेळी त्यांनी अनेक गोष्टींवर भाष्य केलं. 

शरद पवारांनी कौटुंबीक संबंध नव्हते, असं म्हटलं त्याबाबत एबीपी माझाशी बोलताना दिलीप वळसे पाटील म्हणाले,  'मी स्वत: कधीही म्हटलं नाही की, मी शरद पवारांचा मानसपुत्र आहे. लोक तसं म्हणायचे. सार्वजनिक समारंभामध्ये कुटुंबं एकत्र आली, म्हणजे कौटुंबीक संबंध होते असं होतं नाही. शरद पवारांच्या पत्नी प्रतिभा वहिनी भिमाशंकरला दर्शनाला आल्या की आमच्या घरी यायच्या. मी ग्रॅज्यूएट झाल्यावर पंचवीस वर्षांचा असताना शरद पवारांचा पी.ए म्हणून काम सुरु केलं. त्यानंतर आमदार म्हणून काम करण्याची संधी मिळाली. चाळीस वर्षे घरामध्ये जाणं येणं होतं. जर शरद पवार म्हणत असतील तर कौटुंबीक संबंध नसतील, असंही ते यावेळी म्हणाले आहेत.

जर एखादी व्यक्ती चाळीस वर्षे....

शरद पवार आणि माझे वडील एकाच वेळी 1967 ला आमदार झाले. शरद पवार म्हणाले की, त्यावेळी माझे वडील त्यांच्या मागे पहाडासारखे उभे राहिले होते. शरद पवार पहिल्यांदा मुख्यमंत्री झाल्यावर मिसेस पवार, मिसेस शिंदे, आमच्या घरी आल्या . तेव्हापासुन येणं सुरु होतं. माझ्या मुलीचे सुप्रिया सुळेंसोबत कौटुंबीक संबंध नव्हते. राजकीय संबंध होते. यशवंतराव चव्हाण सेंटरला त्या एकत्र काम करत होत्या, असंही ते यावेळी उपहासाने म्हणालेत. शरद पवारांनी कौटुंबीक संबंध नव्हते असं म्हटल्याने वेदना झाल्या, जर एखादी व्यक्ती चाळीस वर्षे ये-जा करत असेल. तर त्याला कसले संबंध म्हणायचं हे लोकांनी ठरवायचं आहे, असंही यावेळी वळसे पाटील म्हणालेत. यावेळी बोलताना वळसे पाटील भावून झाल्याचं दिसून आले. 

शरद पवारांना सोडण्याचा निर्णय एकट्याने घेतला नाही...

मी शरद पवारांना सोडण्याचा निर्णय एकट्याने घेतला नाही तर तो सामुदायिक निर्णय होता. 42 आमदारांची बैठक झाली आणि त्यात हा निर्णय झाला. मला ईडी, सीबीआय किंवा कोणत्याही तपास यंत्रणेची कुठलीही नोटीस आली नाही. आल्याचं दाखविल्यास मी उमेदवारी मागे घेईन. माझ्या जवळच्या लोकांना नोटीस आल्या हे खरं आहे‌. आमच्यावर कोणताही दबाव नव्हता, असंही त्यांनी पुढे म्हटलं आहे.

शरद पवारांच्या त्या वक्तव्याचा माझ्या कुटुंबाला देखील त्रास... 

शरद पवारांनी असं म्हटल्याने माझ्या कुटुंबाला देखील त्रास झाला. मी, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ वगैरे जवळचे असल्याने शरद पवारांचा आमच्यावर राग असेल. शरद पवार आणि आमचे संबंध पुन्हा पुर्वीसारखे होतील का हे शरद पवार सांगू शकतील, असं ते म्हणालेत. सभेबाबत बोलताना वळसे पाटील म्हणाले, अजित पवारांची सभा आमच्याकडे नको हे आम्हीच त्यांना सांगितले. सभेसाठी मोठी तयारी करावी लागते आणि त्यात वेळ जातो.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल सामन्यात नातू झळकला, शरद पवारांनी टीव्हीवर 'सामना' बघितला; आजी, आजोबांना अत्यानंद
आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल सामन्यात नातू झळकला, शरद पवारांनी टीव्हीवर 'सामना' बघितला; आजी, आजोबांना अत्यानंद
मुंबईत भाजपचा स्ट्राईक रेट नंबर 1, ठाकरेंचाही भारी, राष्ट्रवादीचा सर्वात कमी, शिंदेंच्या शिवसेनेचा किती?
मुंबईत भाजपचा स्ट्राईक रेट नंबर 1, ठाकरेंचाही भारी, राष्ट्रवादीचा सर्वात कमी, शिंदेंच्या शिवसेनेचा किती?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 जानेवारी 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 जानेवारी 2025 | बुधवार
सोनम वांगचुक तुरुंगात जमिनीवर झोपत आहेत, बॅरेकमध्ये चालण्यासाठी पुरेशी जागाही नाही; केसमध्ये दम नसल्याने सॉलिसिटर जनरल तारीख पर तारीख मागत आहेत; पत्नी गीतांजलींचा आरोप
सोनम वांगचुक तुरुंगात जमिनीवर झोपत आहेत, बॅरेकमध्ये चालण्यासाठी पुरेशी जागाही नाही; केसमध्ये दम नसल्याने सॉलिसिटर जनरल तारीख पर तारीख मागत आहेत; पत्नी गीतांजलींचा आरोप

व्हिडीओ

Sanjay Raut On Mumbai Mayor : नगरसेवकांना लपवावं लागत असेल तर कायदा-व्यवस्था ढासललीय, एकनाथ शिंदेंना टोला
Girish Mahajan Majha Katta : सुधाकर बडगुजर प्रकरण ते नाशिकचं तपोवन, गिरीश महाजन 'माझा कट्टा'वर
PMC Election : पुण्याची 22 वर्षीय सई थोपटे सर्वात तरुण नगरसेवक Exclusive
BMC 22 years Corporator : BMC वॉर्ड नं 151 मधून 22 वर्षांची तरुणी झाली नगरसेवक! कसा होता प्रवास?
Uttar Pradesh Bijnor च्या मंदिरात कुत्र्याची अखंड प्रदक्षिणा,भटका श्वान की दैवी संकेत?Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल सामन्यात नातू झळकला, शरद पवारांनी टीव्हीवर 'सामना' बघितला; आजी, आजोबांना अत्यानंद
आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल सामन्यात नातू झळकला, शरद पवारांनी टीव्हीवर 'सामना' बघितला; आजी, आजोबांना अत्यानंद
मुंबईत भाजपचा स्ट्राईक रेट नंबर 1, ठाकरेंचाही भारी, राष्ट्रवादीचा सर्वात कमी, शिंदेंच्या शिवसेनेचा किती?
मुंबईत भाजपचा स्ट्राईक रेट नंबर 1, ठाकरेंचाही भारी, राष्ट्रवादीचा सर्वात कमी, शिंदेंच्या शिवसेनेचा किती?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 जानेवारी 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 जानेवारी 2025 | बुधवार
सोनम वांगचुक तुरुंगात जमिनीवर झोपत आहेत, बॅरेकमध्ये चालण्यासाठी पुरेशी जागाही नाही; केसमध्ये दम नसल्याने सॉलिसिटर जनरल तारीख पर तारीख मागत आहेत; पत्नी गीतांजलींचा आरोप
सोनम वांगचुक तुरुंगात जमिनीवर झोपत आहेत, बॅरेकमध्ये चालण्यासाठी पुरेशी जागाही नाही; केसमध्ये दम नसल्याने सॉलिसिटर जनरल तारीख पर तारीख मागत आहेत; पत्नी गीतांजलींचा आरोप
Video: एकनाथ शिंदेंकडून अडीच वर्षे महापौरपदाची मागणी; भाजपची पहिली प्रतिक्रिया, चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
Video: एकनाथ शिंदेंकडून अडीच वर्षे महापौरपदाची मागणी; भाजपची पहिली प्रतिक्रिया, चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
भाजपच्या 84 मध्ये पाचने वाढ, त्यात 35 बाहेरून आलेले 37 अमराठी आणि 10-12 आमदार खासदारांच्या नात्यागोत्यातील; सुषमा अंधारेंनी मुंबईतील भाजप नगरसेवकांची कुंडलीच मांडली
भाजपच्या 84 मध्ये पाचने वाढ, त्यात 35 बाहेरून आलेले 37 अमराठी आणि 10-12 आमदार खासदारांच्या नात्यागोत्यातील; सुषमा अंधारेंनी मुंबईतील भाजप नगरसेवकांची कुंडलीच मांडली
Daryl Mitchell Ind vs Nz 3rd ODI : कुणालाही न जमलेलं करून दाखवलं! भारताविरुद्ध डॅरिल मिशेलचा वर्ल्ड रेकॉर्ड, क्रिकेट विश्व अचंबित
कुणालाही न जमलेलं करून दाखवलं! भारताविरुद्ध डॅरिल मिशेलचा वर्ल्ड रेकॉर्ड, क्रिकेट विश्व अचंबित
BJP Leader Raj K purohit passes away: भाजप नेत्याचं निधन, मनसेच्या बाळा नांदगावकरांची काळजाचा ठाव घेणारी पोस्ट, म्हणाले, 'माझा हक्काचा मित्र आज निघून गेला'
भाजप नेत्याचं निधन, मनसेच्या बाळा नांदगावकरांची काळजाचा ठाव घेणारी पोस्ट, म्हणाले, 'माझा हक्काचा मित्र आज निघून गेला'
Embed widget