Job Majha : भारतीय विमानतळ प्राधिकरण मुंबई आणि महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीत विविध पदांवर भरती
Job Majha : जिल्हा रुग्णालय जालना, भारतीय विमानतळ प्राधिकरण मुंबई आणि महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीत विविध पदांवर भरती जाहीर झाली आहे.
Job Majha : नोकरीच्या शोधात असलेल्या तरूणांसाठी आनंदाची बातमी आहे. जिल्हा रुग्णालय जालना, भारतीय विमानतळ प्राधिकरण मुंबई आणि महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीत विविध पदांवर भरती जाहीर झाली (Job Majha) आहे. या पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. यातील जिल्हा रुग्णालय जालना येथील पदांसाठी थेट मुलाखत होणार आहे. तर इतर भरतीसाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
Job Majha : भारतीय विमानतळ प्राधिकरण मुंबई
पोस्ट : कनिष्ठ कार्यकारी
शैक्षणिक पात्रता : इंजिनिअरिंगमध्ये पदवी
एकूण जागा : 596
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 जानेवारी 2023
अधिकृत वेबसाईट : www.aai.aero
Job Majha : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. पुणे
पोस्ट : इलेक्ट्रिशियन, वायरमन
शैक्षणिक पात्रता : 12 वी पास, NCVT नवी दिल्ली शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधून इलेक्ट्रिशियन, वायरमनमध्ये उत्तीर्ण
एकूण जागा : 37
वयोमर्यादा : 30 वर्षांपर्यंत
नोकरीचं ठिकाण : पुणे
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 6 जानेवारी 2022
अधिकृत वेबसाईट : www.mahadiscom.in
Job Majha : जिल्हा रुग्णालय, जालना
पोस्ट : वैद्यकीय अधिकारी
शैक्षणिक पात्रता : MBBS/ पदव्युत्तर पदवी
एकूण जागा : 18
थेट मुलाखत होणार आहे.
मुलाखतीचा पत्ता : जिल्हा शल्य चिकित्सक, सामान्य रुग्णालय जालना, समर्थ नगर, जालना- ४३१ २१३
मुलाखतीची तारीख : 20 डिसेंबर 2022
अधिकृत वेबसाईट : jalna.gov.in
अनेक तरुण सरकारी नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतात. अनेकदा वेळीच माहिती न मिळाल्यामुळे नोकरीची संधी हातातून जाते. त्यामुळेच नोकरीच्या शोधात असलेल्या तरुण-तरुणींसाठी एबीपी माझा खाजगी आणि सरकारी क्षेत्रातील नोकरीसंबंधातील माहिती जॉब माझा या विशेष कॅटेगरीमध्ये दररोज प्रकाशिक करतं. वेगवेगळ्या कंपन्या, संस्थांतील नोकर भरतीबाबत जाणून घेण्यासाठी एबीपी माझाच्या वेबसाईटला नक्की भेट द्या.
महत्वाच्या बातम्या