एक्स्प्लोर

Indian Navy Recruitment 2024 : भारतीय नौदलात शॉर्ट सर्व्हिस कमिशनमध्ये 250 जागांवर भरती, 'या' तारखेपर्यंत अर्ज करता येणार

Indian Navy Recruitment : भारतीय नौदलात शॉर्ट सर्व्हिस कमिशनमध्ये 2025 च्या बॅचमध्ये 250 जागांवर भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.

नवी दिल्ली : भारतीय नौदलात नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी आहे. भारतीय नौदलात शॉर्ट सर्व्हिस कमिशन कोर्स 2025 द्वारे विविध पदांच्या 250 जागा भरल्या जाणार आहेत. पात्र, उमेदवारांनी अर्ज दाखल करावेत, असं आवाहन करण्यात आलं आहे. 

पात्र असलेल्या अविवाहित पुरुष आणि अविवाहित महिला उमेदवारांनी 29  सप्टेंबरपूर्वी अर्ज दाखल करावेत, असं आवाहन करण्यात आलेलं आहे. 

कोणत्या केडर, ब्रँचमध्ये भरती?

जनरल सर्व्हिस (जीएसएक्स)/  हायड्रो केडर,  पायलट, नावल एअर ऑपरेशन्स ऑफिसर, एअर ट्राफिक कंट्रोल लॉजिस्टिक्स,  नावल अर्मामेंट इन्सपेक्टोरेट, शिक्षण, इंजिनिअरिंग ब्रँच, इलेक्ट्रिकल ब्रँच या केडरासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. 

किती जागांवर भरती

जनरल सर्व्हिस (जीएसएक्स)/  हायड्रो केडर 56 जागा,  पायलट 24 जागा, नावल एअर ऑपरेशन्स ऑफिसर 21 जागा, लॉजिस्टिक्स 20 जागा, एअर ट्राफिक कंट्रोल 20 जागा,  नावल अर्मामेंट इन्सपेक्टोरेट 16, शिक्षण 15 जागा, इंजिनिअरिंग ब्रँच 36, इलेक्ट्रिकल ब्रँचच्या 42 जागा भरल्या जाणार आहेत. या केडरसाठी पुरुष आणि महिला उमेदवार अर्ज दाखल करु शकतात. 

 शैक्षणिक पात्रता 

जनरल सर्व्हिस (जीएसएक्स)/  हायड्रो केडर: 60 टक्के गुणासंह बीई/ बीटेक पदवी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे.
  
पायलट, नावल एअर ऑपरेशन्स ऑफिसर, एअर ट्राफिक कंट्रोल:60 टक्के गुणासंह बीई/ बीटेक पदवी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे.
 
लॉजिस्टिक्स: 60 टक्के गुणासंह बीई/ बीटेक पदवी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे.याशिवाय एमएपीए प्रथम श्रेणीतून उत्तीर्ण आवश्यक आहे. बीएससी, बीकॉम आणि बीएससी आयटी यामध्ये प्रथम श्रेणीतून उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. याशिवाय पीजी डिप्लोमा फायनान्स, लॉजिस्टिक्स आणि सप्लाय चेन मॅनेजमेंटमध्ये पूर्ण झालेला आवश्यक आहे. 

नावल अर्मामेंट इन्सपेक्टोरेट, शिक्षण, इंजिनिअरिंग ब्रँच, इलेक्ट्रिकल ब्रँच यामधील पदांसाठी अर्ज करण्यासाठी भारतीय नौदलाच्या वेबसाईटला भेट देऊन अधिक माहिती घ्या. 

शॉर्ट सर्व्हिस कमिशनमध्ये ज्या उमेदवारांची निवड होईल त्यांना भारतीय नौदलात 10 वर्ष  नोकरी करता येईल. याशिवाय प्रत्येकी दोन वर्ष अशी दोन वेळा मुदतवाढ दिली जाईल. यासाठी उमेदवाराची सेवा, अनुभव, कामगिरी, वैद्यकीय पात्रता आणि संबंधित उमेदवाराची इच्छा याचा विचार केला जाईल. ज्या उमेदवारांची निवड होईल त्यांना पहिली दोन वर्ष प्रोबेशनचा कालावधी पूर्ण करावा लागेल.

लेफ्टनंट पदी निवड होणाऱ्या उमेदवारांना मूळ वेतन 56100 रुपयांपासून पगार मिळेल. याशिवाय इतर भत्ते देखील मिळतील. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 सप्टेंबर अशी आहे. 

इतर बातम्या :

FDA Recruitment 2024 : अन्न व औषध प्रशासन विभागात भरती, किती पगार मिळणार? अर्ज कुठे करायचा? जाणून घ्या

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

नोकरीच्या शोधात असणाऱ्या युवकांसाठी मोठी बातमी, रेल्वेमध्ये 1 हजार 421 पदांसाठी भरती सुरु, कसा कुठे कराल अर्ज?
नोकरीच्या शोधात असणाऱ्या युवकांसाठी मोठी बातमी, रेल्वेमध्ये 1 हजार 421 पदांसाठी भरती सुरु, कसा कुठे कराल अर्ज?
NEET मध्ये अपयशी झाली, तरीही जिद्द नाही सोडली, वयाच्या 21 व्या वर्षीच मिळवल्या पाच सरकारी नोकऱ्या, शुभांगीवर कौतुकाचा वर्षाव
NEET मध्ये अपयशी झाली, तरीही जिद्द नाही सोडली, वयाच्या 21 व्या वर्षीच मिळवल्या पाच सरकारी नोकऱ्या, शुभांगीवर कौतुकाचा वर्षाव
नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी गुड न्यूज, देशातील 7 राज्यात 12 लाख नवीन नोकऱ्या मिळणार, महाराष्ट्रात किती?  
नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी गुड न्यूज, देशातील 7 राज्यात 12 लाख नवीन नोकऱ्या मिळणार, महाराष्ट्रात किती?  
महाराष्ट्रातील युवकांसाठी नोकरीची मोठी संधी! SBI मध्ये तब्बल 9 हजार 766 पदांसाठी भरती सुरु, कसा कुठे कराल अर्ज?
महाराष्ट्रातील युवकांसाठी नोकरीची मोठी संधी! SBI मध्ये तब्बल 9 हजार 766 पदांसाठी भरती सुरु, कसा कुठे कराल अर्ज?

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
Prashant Kishor : आता सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्यावर केस करावी, प्रशांत किशोर यांची वंदे मातरमच्या वादावर भूमिका  
सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्या केस करावी : प्रशांत किशोर
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
Embed widget