एक्स्प्लोर

FDA Recruitment 2024 : अन्न व औषध प्रशासन विभागात भरती, किती पगार मिळणार? अर्ज कुठे करायचा? जाणून घ्या

FDA Recruitment 2024 : अन्न व औषध प्रशासन विभागानं वरिष्ठ तांत्रिक सहायक आणि विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ या पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे.

मुंबई : सरकारी नोकरीची प्रतीक्षा करणाऱ्यांसाठी मोठी अपडेट आहे. महाराष्ट्र सरकारच्या अन्न व औषध प्रशासनाच्या कार्यशाळांमधील विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात आलेली आहे. विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ आणि वरिष्ठ तांत्रिक सहायक या पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. मुंबई, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर येथील प्रयोगशाळांमधील पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. वरिष्ठ तांत्रिक सहायक पदाच्या 37 जागा आणि विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ या पदाच्या 19 जागांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. 

अन्न व औषध प्रशासनानं या पदांसाठी अर्ज दाखल करण्यासाठी एक महिन्यांचा कालावधी दिला आहे. 23 सप्टेंबर ते  22 ऑक्टोबर दरम्यान अर्ज दाखल करता येतील. या पदांसाठी ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे. जे उमेदवार या पदांसाठी अर्ज करण्यास इच्छुक असतील त्यांना अन्न व औषध प्रशासनाच्या वेबसाईटवर अर्ज दाखल करता येतील. 

विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारानं औषध निर्माणशास्त्र शाखेची पदवी आणि रसायन शास्त्र किंवा जीव-रसायनशास्त्रातील  पदव्युत्तर पदवी असं आवश्यक आहे.मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी विज्ञान शाखेची द्वितीय श्रेणीतील पदवी प्राप्त केल्यानंतर उमेदवाराकडे औषधी द्रव्ये विश्लेषणाचा दीड वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. 

वरिष्ठ तांत्रिक सहाक पदासाठी अर्ज करणाऱ्यांकडे विज्ञान शाखेतील द्वितीय श्रेणीतील पदवी असणं आवश्यक आहे. औषध निर्माण शास्त्राचे पदवीधारक विद्यार्थी अर्ज दाखल करु शकतात. 

या दोन्ही पदांसाठी अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवारांना खुल्या प्रवर्गासाठी  एक हजार रुपये तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना 900 रुपयांचे शुल्क भरावं लागणार आहे. विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ पदावर निवड झालेल्या उमदेवारांना 38600-122800 वेतनश्रेणीनुसार पगार मिळेल. तर, वरिष्ठ तांत्रिक सहायक पदावर निवड झालेल्या उमेदवाराला 35400-112400  वेतनश्रेणीनुसार पगार मिळेल. 

या पदांसाठी अर्ज कुठे करायचा? 

महाराष्ट्राच्या अन्न व औषध प्रशासनाच्या वेबसाईटला भेट देऊन उमेदवार या पदांसाठी अर्ज दाखल करु शकतात.  या पदांसाठी अर्ज करण्यापूर्वी भरतीप्रक्रियेसंदर्भातील मूळ जाहिरात आणि नियम व अटी उमेदवारांनी वाचणं आवश्यक आहे.  अन्न व औषध प्रशासन विभागानं आता अर्ज दाखल करण्याच्या तारखा जाहीर केल्या आहेत. ऑनलाईन परीक्षा आणि प्रवेशपत्र कधी जाहीर होणार यासंदर्भातील घोषणा नंतर केली जाणार आहे. 

इतर बातम्या : 

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur News: कोल्हापुरात बंद घरामध्ये जिलेटिनचा मोठा स्फोट, भिंतींच्या अक्षरशः ठिकऱ्या उडाल्या; सुर्वे नगरमध्ये मध्यरात्री नेमकं काय घडलं?
कोल्हापुरात बंद घरामध्ये जिलेटिनचा मोठा स्फोट, भिंतींच्या अक्षरशः ठिकऱ्या उडाल्या; सुर्वे नगरमध्ये मध्यरात्री नेमकं काय घडलं?
Eknath Shinde Shivsena: एकनाथ शिंदेंची शिवसेनेच्या चार मंत्र्यांना फायनल वॉर्निंग, काम करा नाही तर.... मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी काय घडलं?
एकनाथ शिंदेंची शिवसेनेच्या चार मंत्र्यांना फायनल वॉर्निंग, काम करा नाही तर.... मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी काय घडलं?
Eknath Shinde Shivsena: 'तुम्ही काम सुधारा, नाहीतर मला खांदेपालट करावा लागेल'; एकनाथ शिंदेंनी वॉर्निंग दिलेले 'ते' चार मंत्री कोण?
'काम सुधारा, नाहीतर मला खांदेपालट करावा लागेल'; एकनाथ शिंदेंनी वॉर्निंग दिलेले 'ते' चार मंत्री कोण?
Satish Pulekar On Nana Patekar: नाना पाटेकरांचा विषय काढताच सतीश पुळेकर बोलायचेच थांबले, मनातील दुखऱ्या नसेला धक्का लागला, म्हणाले ;'एवढी चांगली मैत्री संपली...'
नाना पाटेकरांचा विषय काढताच सतीश पुळेकर बोलायचेच थांबले, मनातील दुखऱ्या नसेला धक्का लागला, म्हणाले ;'एवढी चांगली मैत्री संपली...'

व्हिडीओ

Mumbai Police Salary Scam | पोलिसात ‘घुसखोरी’ पगारात चोरी | ABP Majha Special Report
Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur News: कोल्हापुरात बंद घरामध्ये जिलेटिनचा मोठा स्फोट, भिंतींच्या अक्षरशः ठिकऱ्या उडाल्या; सुर्वे नगरमध्ये मध्यरात्री नेमकं काय घडलं?
कोल्हापुरात बंद घरामध्ये जिलेटिनचा मोठा स्फोट, भिंतींच्या अक्षरशः ठिकऱ्या उडाल्या; सुर्वे नगरमध्ये मध्यरात्री नेमकं काय घडलं?
Eknath Shinde Shivsena: एकनाथ शिंदेंची शिवसेनेच्या चार मंत्र्यांना फायनल वॉर्निंग, काम करा नाही तर.... मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी काय घडलं?
एकनाथ शिंदेंची शिवसेनेच्या चार मंत्र्यांना फायनल वॉर्निंग, काम करा नाही तर.... मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी काय घडलं?
Eknath Shinde Shivsena: 'तुम्ही काम सुधारा, नाहीतर मला खांदेपालट करावा लागेल'; एकनाथ शिंदेंनी वॉर्निंग दिलेले 'ते' चार मंत्री कोण?
'काम सुधारा, नाहीतर मला खांदेपालट करावा लागेल'; एकनाथ शिंदेंनी वॉर्निंग दिलेले 'ते' चार मंत्री कोण?
Satish Pulekar On Nana Patekar: नाना पाटेकरांचा विषय काढताच सतीश पुळेकर बोलायचेच थांबले, मनातील दुखऱ्या नसेला धक्का लागला, म्हणाले ;'एवढी चांगली मैत्री संपली...'
नाना पाटेकरांचा विषय काढताच सतीश पुळेकर बोलायचेच थांबले, मनातील दुखऱ्या नसेला धक्का लागला, म्हणाले ;'एवढी चांगली मैत्री संपली...'
KDMC Hospital Health: चिमुरड्याला इंजेक्शन दिलं अन् डॉक्टरांनी सुई कमरेतच ठेवली; केडीएमसीच्या रुग्णालयातील धक्कादायक प्रकार
चिमुरड्याला इंजेक्शन दिलं अन् डॉक्टरांनी सुई कमरेतच ठेवली; केडीएमसीच्या रुग्णालयातील धक्कादायक प्रकार
Pune Nashik Highway Accident: भीषण अपघात! भरधाव कंटेनर डिव्हायडर तोडून विरुद्ध दिशेच्या ट्रकला धडकला; पुण्याकडे येणारी वाहतूक ठप्प; पुणे-नाशिक महामार्गावरील घटना
भीषण अपघात! भरधाव कंटेनर डिव्हायडर तोडून विरुद्ध दिशेच्या ट्रकला धडकला; पुण्याकडे येणारी वाहतूक ठप्प; पुणे-नाशिक महामार्गावरील घटना
Chhaya Kadam On Hindi Bigg Boss: मराठमोळ्या छाया कदम हिंदी बिग बॉसमध्ये झळकणार? म्हणाल्या, 'हिंदी बिग बॉसकडून ऑफर आलीय...'
मराठमोळ्या छाया कदम हिंदी बिग बॉसमध्ये झळकणार? म्हणाल्या, 'हिंदी बिग बॉसकडून ऑफर आलीय...'
Mhada house Lottery Mumbai: मोठी बातमी: म्हाडाच्या मुंबईतील 2640 घरांची लॉटरी जाहीर होण्याची तारीख अखेर ठरली, ऑनलाईन सोडत कधी आणि कुठे पाहता येणार?
मोठी बातमी: म्हाडाच्या मुंबईतील 2640 घरांची लॉटरी जाहीर होण्याची तारीख अखेर ठरली, ऑनलाईन सोडत कधी आणि कुठे पाहता येणार?
Embed widget