GSO Recruitment 2022 : वैद्यकीय अधिकाऱ्यांसह अनेक पदांसाठी रिक्त जागा, 'या' तारखेपर्यंत अर्ज करा
GSO Recruitment 2022 : जनरल सर्व्हिस ऑर्गनायझेशन (GSO), कल्पक्कम यांनी वैद्यकीय अधिकारी, तांत्रिक अधिकारी आणि इतर पदांसाठी अर्ज मागवले आहेत.
GSO Recruitment 2022 : सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. जनरल सर्व्हिस ऑर्गनायझेशन (GSO), कल्पक्कम यांनी वैद्यकीय अधिकारी, तांत्रिक अधिकारी आणि इतर पदांसाठी अर्ज मागवले आहेत. या पदांसाठी अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून, अर्ज करण्याची अंतिम तारीख 6 जून आहे. उमेदवार www.igcar.gov.in या अधिकृत वेबसाइटवरून ऑनलाईन अर्ज दाखल करु शकतात. तसेच, अर्जाची सॉफ्ट कॉपी डाऊनलोड करू शकतात.
रिक्त जागांचा तपशील
जनरल सर्व्हिस ऑर्गनायझेशनने जारी केलेल्या या भरती मोहिमेद्वारे 25 रिक्त पदं भरण्यात येणार आहेत. ज्यामध्ये वैद्यकीय अधिकारी पदासाठी 6 जागा, तांत्रिक अधिकारी पदासाठी 1 रिक्त जागा, परिचारिका पदासाठी 5 रिक्त, वैज्ञानिक सहाय्यक पदासाठी 7 रिक्त जागा, फार्मासिस्ट पदासाठी 1, 5 रिक्त पदं आहेत. ही जागा तंत्रज्ञ पदासाठी आहे.
वयोमर्यादा
जनरल सर्व्हिस ऑर्गनायझेशनने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे किमान वय 18 वर्षं असावं.
अर्ज शुल्क
वैद्यकीय अधिकारी/तांत्रिक अधिकारी पदासाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवारांना 300 रुपयांचं अर्ज शुल्क भरावं लागणार आहे. परिचारिका/वैज्ञानिक सहाय्यक पदांसाठी अर्जाची फी 200 रुपये आहे. फार्मासिस्ट आणि तंत्रज्ञ या पदांसाठी उमेदवारांना 100 रुपये अर्ज शुल्क भरावं लागणार आहे. इच्छुक उमेदवारांनी अर्ज प्रो-फॉर्मची सॉफ्ट कॉपी एक्सेल फॉर्ममध्ये न बदलता भरावी लागेल. सॉफ्ट कॉपी उमेदवाराला igcar.gov.in या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध होईल. अर्ज भरल्यानंतर, उमेदवार त्यांचा अर्ज careergso@igcar.gov.in वर मेल करू शकतात.
अनेक तरुण सरकारी नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतात. अनेकदा वेळीच माहिती न मिळाल्यामुळे नोकरीची संधी हातातून जाते. त्यामुळेच नोकरीच्या शोधात असलेल्या तरुण-तरुणींसाठी एबीपी माझा खाजगी आणि सरकारी क्षेत्रातील नोकरीसंबंधातील माहिती जॉब माझा या विशेष कॅटेगरीमध्ये दररोज प्रकाशिक करतं. वेगवेगळ्या कंपन्या, संस्थांतील नोकर भरतीबाबत जाणून घेण्यासाठी एबीपी माझाच्या वेबसाईटला नक्की भेट द्या.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- IPPB Recruitment 2022 : बँकेत ग्रामीण डाक सेवक पदांसाठी मोठी भरती; अर्ज प्रक्रिया सुरु, जाणून घ्या सविस्तर
- Job Majha : पनवेल महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती सुरू, असा करा अर्ज
- HBCSE recruitment 2022 : होमी भाभा सेंटर फॉर सायन्स एज्युकेशनमध्ये मोठी भरती; संधी सोडू नका, लगेचच अर्ज करा!
- Bank Recruitment 2022 : बँकेत नोकरीची उत्तम संधी, पदवीधरांनी आजच अर्ज करावा, जाणून घ्या सविस्तर